हॅलो महाराष्ट्रचे सकलेन मुलाणी यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

Saklen Mulani

कराड | राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांचे स्मृतीदिनाचे औचित्य साधून परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने हॅलो महाराष्ट्रचे सकलेन मुलाणी यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड यांनी दिली आहे. कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे या पुरस्काराचे उद्या सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे. प्रसार माध्यम क्षेत्रात करत … Read more

कार्पोरेट चाणक्य डॉ. राधाकृष्णन पिल्लईंनी सांगितली… यशस्वी जीवनासाठी चाणक्य नीती

Shivam Foundation Gharewadi

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील घारेवाडी (ता. कराड) येथे शिवम् आध्यत्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या 22 व्या युवा हृदय संमेलनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. डॉ.राधाकृष्णन पिल्लई (कार्पोरेट चाणक्य), प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख, कराड अर्बन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. … Read more

कराड उत्तरमध्ये विकासासाठी भाजपा कटिबद्ध : रामकृष्ण वेताळ

Ramakrishna Vetal

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी करवडी गावातील जनतेने भारतीय जनता पार्टीच्या कामावर विश्वास ठेवल्याने येथे विविध कामे होत आहेत. भविष्यातही करवडीसह संपूर्ण कराड उत्तरमध्ये विकासासाठी कटिबद्ध आहे. असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी केले. पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार यांच्या निधीतून मंजूर कामाच्या भूमिपूजन आणि उद्घाटन प्रसंगी श्री. वेताळ बोलत होते. यावेळी … Read more

जयवंत शुगर्सची डिस्टीलरी ठरली राज्यात सर्वोत्कृष्ट

Jaywant Sugars

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिले जाणारे यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये सन 2021-22 या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा पुरस्कार धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला जाहीर करण्यात आला आहे. साखर क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेद्वारे … Read more

नारळाच्या झाडावरून पडून युवकाचा मृत्यू

कराड | कोयना वसाहत (ता. कराड) येथील गोपाळवाडी येथे नारळाच्या झाडावरून पडून 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. या घटनेने गोपाळवाडीसह परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराड- मलकापूर शहरालगत कोयना वसाहत ग्रामपंचायत आहे. या गावच्या हद्दीत राहुल प्रकाश चव्हाण हा युवक गोपाळवाडीत कुटुंबियांच्यासह वास्तव्यास आहे. तो लाहोटीनगर येथे शुक्रवारी नारळाच्या … Read more

शताब्दी महोत्सव : कराडचे शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूल स्थापनेला 100 वर्षे पूर्ण

Tilak High School Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण क्षेत्रात उच्च गुणवत्ता, संस्कार व देशभक्तीचे धडे देणारी शिक्षण संस्था म्हणून ‘शिक्षण मंडळ कराड’ या शिक्षण संस्थेची ख्याती आहे. आज शिक्षण मंडळ संस्थेस व टिळक हायस्कूलच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने संस्था व टिळक हायस्कूल च्यावतीने शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन … Read more

कराड- पाटण शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी दिनेश थोरात बिनविरोध

Karad- Patan Teachers Society

कराड | कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमन पदी गुरुजन एकता पॅनलचे दिनेश थोरात यांची तर व्हाईस चेअरमन पदी अनुसया पवार यांची बिनविरोध निवड झाली. गुरूजन एकता पॅनेलने सत्तांतर करत एकहाती विजय मिळवला होता. यामध्ये सर्वात जास्त 1 हजार 551 मतांनी विजयी झालेले दिनेश थोरात यांना चेअरमन पदाचा बहुमान मिळाला. निवडणूक निर्णय अधिकारी संदिप … Read more

निवडणुकीत हणबरवाडी- धनगरवाडी योजनेच्या श्रेयवादासाठी विरोधक येतात : आ. बाळासाहेब पाटील

Balasaheb Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी  कराड उत्तर मतदार संघात काही मंडळी या निवडणूका आल्या की श्रेयवादासाठी पुढे येतात. सन 2009, 2014 आणि 2019 अगोदर याच गोष्टी पहायला मिळाल्या. परंतु ही योजना पूर्ण व्हावी, यासाठी पाठपुरावा केला नाही. या योजनेसाठी पूर्ण पाठपुरावा मी स्वतः केला आहे. ज्या भागातील लोकांना या योजनेचा लाभ होणार आहे, त्यांना माहिती आहे. … Read more

राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार प्रकाश जाधव यांना जाहीर

Prakash Jadhav Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी अखिल भारतीय धोबी महासंघाच्या वतीने प्रतिवर्षी सामाजिक कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा देशपातळीवर पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यावर्षी परीट समाजाचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. आजपर्यंतच्या एकूण कार्याची दखल घेत प्रकाश जाधव यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अखिल भारतीय … Read more

शेतकऱ्यांचा MSEB ला इशारा : सुधारा…अन्यथा प्रहार स्टाईल आंदोलन

Prahar Sangatana Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील शेतकऱ्यांची कृषी पंपाच्या वीजबिलांची वसुली मनमानी पध्दतीने न करता मीटरचे रीडिंग घेऊन करावी. शेतीची बिले अन्यायकारकरित्या दिली जात आहेत. सध्या विज न वापर करता बिल भरावे लागत आहे. तेव्हा यामध्ये सुधारणा व्हावी, अन्यथा लोकशाही मार्गाने प्रहार स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेचे सातारा जिल्हा सचिव शिवाजी … Read more