लव्ह जिहादचा प्रश्न राजकीय भूमिकेतून : दिलीप वळसे- पाटील

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी आंतरधर्मीय- आंतरजातीय विवाह संबधित समिती स्थापन करणे हा अतिशय चुकीचा विचार आहे. राजकीय भूमिकेमधून लव्ह जिहाद सारखा प्रश्न निर्माण करून आज त्यामध्ये नविन कायदा निर्माण करण्याबाबत चर्चा होते. ती या देशाच्या राज्यघटनेशी सुसंगत नाही. घटना अशा कोणत्याही गोष्टीला परवानगी देत नाही. या निर्णयामुळे समाजा- समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम होत असल्याचा आरोप … Read more

मलकापूरात जनतेच्या आरोग्याशी खेळ तरीही लोकप्रतिनिधी गप्प का? : प्रशांत गावडे

Malkapur Prashant Gawde

कराड | मलकापूर शहरालगत असलेल्या हायवेच्या सर्विस रोडला अतिशय धोकादायक पद्धतीने इंटरनेट कंपनीचे काम सुरू आहे. मनमानीपणे पध्दतीने रस्ते उकरणे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल, अशापध्दतीने काम सुरू आहे. मनुष्यवस्तीत प्रचंड मोठ्या कर्णकर्कश आवाजाचा जनरेटर लावून ध्वनिप्रदूषण सुरू आहे. अशा परिस्थितीत मलकापूर नगरपरिषद म्हणते काम आमच्या अधिकार क्षेत्रात नाही. तिकडे हायवेकडे तक्रार करा असे सांगितले जात … Read more

मुलीचा 16 व्या वर्षात लागणारा विवाह पोलिस, अंगणवाडी सेविकांनी रोखला

कराड | चरेगाव (ता. कराड) येथील जोतिबाच्या मंदिरात चाफळ विभागातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा 16 व्या वर्षात लावण्यात येणारा विवाह उंब्रज पोलिसांनी व चाफळ भागातील 1 तलाठी, अंगणवाडी सेविकांनी रोखला. अल्पवयीन विवाह प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. चाफळ भागातील अंगणवाडी सेविकांनी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पवयीन मुलीचा विवाह रोखल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत पोलिसांनी … Read more

कराडला शस्त्रास्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी : उद्या मुख्य दिवस

Victory Day Celebrations Karad

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी विजय दिवस समारोहाचा आकर्षण असलेल्या शस्त्रास्त्र प्रदर्शनास येथील लिबर्टी मजदूर मंडळाच्या मैदानावर प्रारंभ झाला. या प्रदर्शनात सैन्यदलाची जवळुन लांब मारा करणारी, जमिनीवरुन आकाशात मारा करणारी शस्त्रे, विविध बंदुका, रडार व अन्य शस्त्रे येथील लिबर्टी मजदुर मंडळाच्या मैदानावर शस्त्रास्त्र प्रदर्शनात सहभागी झाली आहेत. ती पाहण्यासाठी अबालवृध्दांची गर्दी होत आहे. कर्नल संभाजीराव पाटील … Read more

डेळेवाडीत राष्ट्रवादी विरोधात पालकमंत्री व उंडाळकर गट : सत्तांतर कि पुन्हा सत्ताधारी?

Gram Panchyat Election

कराड प्रतिनिधी |विशाल वामनराव पाटील डेळेवाडी (ता. कराड) येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना मानणाऱ्या गटात लढत होत आहे. डेळेवाडीत निवडणूकीत 6 जागांसाठी दुरंगी सामना होणार आहे. तर सरपंच पदासाठी अर्ज दाखल न झाल्याने पद रिक्त राहणार आहे. सत्ताधारी गटाकडून प्रभाग 1 मधून माजी … Read more

फुटबाॅल मॅच : कोल्हापूरच्या आर. एस. बॉईजचा 4-0 ने राॅयल एफसीवर विजय

Football Match Tambave

कराड | तांबवे (ता. कराड) येथील कोयनाकाठ चॅरिटेबल ट्रस्टच्या फुटबॉल टीमतर्फे आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत आर. एस. बॉईज कोल्हापूरच्या संघाने अंतिम सामन्यात 4-0 असा विजय इस्लामपूरच्या रॉयल एफसी संघावर मिळवला. या सामन्यात मुंबई, पुणे येथील संघाना पराभूत करत कोल्हापूरच्या व इस्लामपूरच्या संघाने अंतिम सामन्यात धडक मारली. येथील स्वातंत्र्यसैनिक आण्णा बाळा पाटील विद्यालयाच्या क्रीडांगणावर तीन दिवस … Read more

कराडला शोभायात्रेने विजय दिवस समारोहास प्रारंभ

Karad Vijay Divas

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विजय दिवस समारोहात आज शोभा यात्रेने उत्साहात प्रारंभ झाला. विजय दिवस चौकातील विजय स्तंभास अभिवादन केल्यानंतर शोभा यात्रेस भाई गंगाराम गुजर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, सहाय्यक पोलीस निरीक्षक, गट शिक्षणाधिकारी सन्मती देशमाने, माजी नगराध्यक्षा श्रीमती शारदा जाधव, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, राष्ट्रवादीच्या सरचिटणीस संगीता साळुंखे यांच्या उपस्थितीत त्यास प्रारंभ … Read more

शिरवडे- मसूर ग्रामीण रस्ता क्रं. 318 खुला करा : शेतकऱ्यांची मागणी

Shirwade-Masoor Rural Road

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिरवडे- मसूर ग्रामीण मार्ग क्रं. 318 हा गेल्या तीन ते चार महिन्यापासुन हेतु परस्पर बंद करण्यात आला आहे. याबाबत सरपंचांना तोंडी तक्रार दिली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी निवेदन दिले, तरी यंत्रणा हलेना अशावेळी आंदोलनाचा इशारा देताच यंत्रणा पळू लागली. शिरवडे येथील 400 ते 500 शेतकऱ्यांची शेती असलेला रस्ताच बंद केला आहे. … Read more

कराडच्या उपजिल्हा रूग्णालयात तोतया डाॅक्टरला अटक

Cottage Hospital Karad

कराड | येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर म्हणून फिरणाऱ्या तोतयाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सुहास दिलीप गोरवे (वय- 27, रा. दुशेरे, ता. कराड) असे त्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. याबाबत उपजिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक निलेश शंकर माने यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

कराडला बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या युवकास अटक

Karad Police

कराड | बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या युवकास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. त्याच्याकडून पिस्तुलासह तीन गोळ्या हस्तगत करण्यात आल्या. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. पंकज मुकेश पाटील (वय- 20, रा. भोई गल्ली, रविवार पेठ, कराड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील आझाद चौकात एक युवक कमरेला पिस्तूल … Read more