कराडच्या प्रितीसंगम घाटाजवळ कृष्णा नदीपात्रात मगरीचे दर्शन

Krishna River Thembu

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडच्या प्रितीसंगम घाटापासून काही अंतरावर मगरीचे दर्शन स्थानिक नागरिकांना झाले. गोटे व सैदापूरकर गावच्यामध्ये असलेल्या कृष्णा नदीपात्रात पोहणारी मगर मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. आटके, टेंभू, खोडशी गावानंतर आता टेंभू- सैदापूरकरांना नदीपात्रात मगरींचे दर्शन झाले. कोयना- कृष्णा नदीत दिवसेंन दिवस मगरींची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे या मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी … Read more

येरवळे- विंग- घारेवाडी उपसा जलसिंचन संस्थेची निवडणूक बिनविरोध : चेअरमनपदी वसंतराव शिंदे

Gharewadi Upsa Irrigation

कराड | येरवळे- विंग- घारेवाडी उपसा जलसिंचन संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. संस्थेच्या चेअरमनपदी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, विंग गावचे माजी सरपंच बबनराव उर्फ वसंतराव शिंदे यांची तर व्हाईस चेअरमन पदी जयवंत गणपती खबाले यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी शिवाजीराव सपकाळ यांनी काम पाहिले. … Read more

संपत्तीसाठी वृध्दाला बंगल्यात कोंडले : उंब्रजला मुलगा, सून, नातू, नात सूनेसह 9 जणांवर गुन्हा

Umbraj Police

कराड | स्वतःच्या बापाला संपत्ती नावावर करून घेण्यासाठी मुलगा, सून, नातू, नात सुनेसह अन्य 5 ते 6 जणांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबर मारहाण केली. तसेच संपत्तीचे बेकायदेशीरपणे कुलमुखत्यार पत्र व बक्षीस पत्र करून घेतल्याची तक्रार उंब्रज (ता. कराड) येथील प्रल्हाद गणपती घुटे (वय- 83) यांनी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा … Read more

ओगलेवाडी येथे रेल्वे स्टेशनजवळ 25 ते 30 एकरातील ऊस आग

Sugarcane Fire

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड – विटा मार्गावरील ओगलेवाडी येथील डुबलवस्ती- पाटणकर मळा येथे ऊसाला आग लागल्याची घटना घडली. रेल्वे स्टेशन रोडजवळ दुपारी लागलेल्या आगीत 25 ते 30 एकर ऊस जळाला. या आगीचे कारण स्पष्ट झाले नसून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील मलकापूर येथे गेल्या आठवड्यात परिसरात 20 … Read more

कराड शहरात काही तासात 4 टन कचरा गोळा

Garbage Collected In Karad city

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरात दिवाळी व लक्ष्मीपूजन निमित्त झालेला फटाक्यांचा कचऱ्याची स्वच्छता करून संपूर्ण कराड शहर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काही तासात स्वच्छ केले. या काळात शहरातून एकूण 4 टन कचरा काढण्यात आला. सदरचा कचरा घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर देऊन त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. कराड शहर स्वच्छतेबाबत नेहमीच जागरूक असते. देशातील टाॅप थ्री … Read more

खोडशीतील 10 फूटी मगर प्राणी अभ्यासकांनी पकडली

crocodile Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खोडशी गावात दोन दिवस दहशत मजवणाऱ्या मगरीला अखेर कराड मधील प्राणी अभ्यासकांना पकडण्यात यश आले आहे. काही दिवसांपासून तालुक्यातील टेंभू, आटके ते पाचवड फाटा या परिसरात स्थानिक शेतकर्‍यांसह ग्रामस्थांना मगरीचे दर्शन होत आहे. या घटना ताज्या असतानाच खोडशी गावानजीक असणार्‍या बंधार्‍यातही मगरीचा वावर असल्याचे स्पष्ट झाले होते. गेल्या 15 दिवसांपासून … Read more

कराड बाजार समितीत शिराळ्यातीला गूळाला 3 हजार 801 रूपये दर

Karad Bazar Samiti Jaggery

कराड | कराड शेती उत्पन्न बाजार समितीत दिपावलीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर नविन गूळ विक्रीचा शुभारंभ झाला. पहिल्याच सौद्यात सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील शेतकऱ्याला पहिल्याच साैद्यात 3 हजार 801 रूपयांचा उंच्चाकी दर प्रति क्विंटलला मिळाला. कराड बाजार समितीचे माजी उपसभापती विजयकुमार कदम, जयंतीलाल पटेल, जगन्नाथ लावंड, सचिव बी. डी. निंबाळकर यांच्या उपस्थितीत गुळ सौदा झाला. शिवाजी रामचंद्र … Read more

कराड शहरात लक्ष्मी वखारीला मध्यरात्री भीषण आग

Burn Mill Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भेदा चाैकातील लक्ष्मी साॅ मिल या वखारीला भीषण आग लागली. मध्यरात्री 2 वाजता लागलेली ही आग पहाटे 6 वाजता आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले. या आगीत लाकडांसह बखारीतील मशीनरीही जळून खाक झाल्या आहेत. या घटनेत वखार मालकाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली … Read more

केसे पाणी पुरवठा संस्था निवडणूक : अटीतटीच्या लढतीत सत्ताधाऱ्यांना चिठ्ठीने दिली सत्ता, काका- बाबा गटाला धक्का

Kese Water Supply Corporation Election

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील तालुक्यातील केसे येथील भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची झाली. अटीतटीच्या या लढतीत सत्ताधारी आणि विरोधकांचे उमेदवारांना एका- एका मताने विजय- पराभव अनेकांना पहायला मिळाला. चार तास चाललेली अन् दोन वेळा फेर मतमोजणी घेण्यात आली. तर चिट्टीच्या साथीने व नशिबाने साथ दिल्याने सत्ताधारी गटाला सत्ता राखण्यात यश … Read more

ऐन दिवाळीत शिमग्याची वेळ : कराडात शिवशंकर नागरी सह. पतसंस्थेला टाळे, पोलिसांना निवेदन

Shivshankar Nagari Co. Credit Union

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी ऐन दिवाळीत कराड शहरातील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासद ठेवीदारांवर शिमगा करण्याची वेळ संस्थेने आणली आहे. गेल्या काही दिवसापासून ही पतसंस्था बंद असल्याचे निदर्शनास आल्याने संस्थेच्या ठेवीदार व सभासद हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर संस्थेचे ठेवीदार यांनी कराड शहर पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना आपल्या मागण्यांचे … Read more