कराडजवळ भीषण अपघात; मिनी बस पुलावरून तारळी नदीत कोसळून 5 जण ठार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील उंब्रजजवळ भीषण अपघात झाला आहे. मिनी बस पुलावरून तारळी नदीत कोसळली आहे. या अपघातात पाच जण ठार तर सात जण जखमी झाले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली असून दिवाळीच्या पहाटे हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रजजवळ  तारळी नदीच्या पुलावरुन … Read more

उदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक भेट; अन्…

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक – निंबाळकर व राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले   सातारच्या शासकीय विश्रामगृहामधील कक्ष क्रमांक १ मध्ये रामराजे थांबले होते. त्यावेळी उदयनराजे यांनी तेथे जाऊन त्यांची भेट घेतली व दोघांमध्ये दिलखुलास गप्पा झाल्या. रामराजे व उदयनराजे यांच्यामध्ये गेली अनेक महिने वितुष्ट होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी दोघांमधील … Read more

मंञी महोदयांमुळेच २० वर्षे हणबरवाडी धनगरवाडी योजना रखडली – मनोज घोरपडे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मंञी महोदयांनी हणबरवाडी धनगरवाडी योजनेबद्दल खोटी जाहिरात चालवली असून २० वर्षे ही योजना तुमच्यामुळेच रखडलेली आहे असा पलटवार कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे यांनी प्रसिद्धी पञकाव्दारे केला आहे. घोरपडे यांनी यावेळी राज्याचे सहकार व पनण मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर ताशेरे ओढलेत. गेली २० वर्षे योजना भाजपाने रखडवली असे म्हणता पण … Read more

लॉकडाऊनमुळे धंद्याला फटका बसल्याने कराड तालुक्यातील व्यावसायिकांची आत्महत्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लॉकडाऊनमधील काळात व्यवसायला मोठा फटका बसल्याने वसंतगड येथील व्यावसायिकाने राहत्या घराजवळील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मारूती एकनाथ चव्हाण (वय- 55, सध्या रा. वसंतगड, मूळ रा. पश्‍चिम सुपने, ता. कराड) असे आत्महत्या केलेल्याचे नांव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी, पश्‍चिम सुपने येथील मारूती चव्हाण … Read more

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची लेट पण थेट प्रतिक्रिया (Video)

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. खडसे यांच्या पक्षांतरानंतर राजकिय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. अनेक राजकिय नेत्यांनी खडसेंच्या पक्षांतरावर चांगली वाईट टिपण्णी केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर आपले मत व्यक्त … Read more

‘के बायो मास्क’ च्या संशोधनात कृष्णा अभिमत विद्यापीठातील संशोधकांनी दिले मोठे योगदान…..

सकलेन मुलाणी | कराड प्रतिनिधी कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाच्या वतीने संशोधित व निर्माण करण्यात आलेला विविध वैशिष्ट युक्त असा ‘के बायो मास्क’ तयार करण्यात आला असून आज या मास्क बद्दल विद्यापीठाचे अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अगरवाल, डॉ. जयंत पवार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.या प्रसंंगी कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे … Read more

सातारा : दुकानांची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत तर आठवडी बाजार उघडण्यास परवानगी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शासनाकडील कोविड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या सुधारीत सुचना व पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार असलेल्या अधिकारान्वये  सातारा जिल्हयात दि. 15/10/2020 रोजीचे 00.00 वाजले पासून ते दिनांक 31/10/2020 रोजीचे 24.00 वा. पर्यंत खालीलप्रमाणे आदेश देत आहे. सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात खालील बाबींना … Read more

डॉ. रणजीत पाटील यांनी स्विकारला कराडच्या पोलीस उपअधीक्षकपदाचा कार्यभार; सुरज गुरव यांची पुणे येथे पदोन्नतीसुरज गुरव यांची पुणे येथे पदोन्नती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी संघटीत गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवलेल्या कराडचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांची अखेर पुणे येथे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. सुरज गुरव यांच्या जागी डॉ. रणजीत पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी शनिवारी दुपारी पदभार स्विकारला. डॉ. रणजित पाटील खोपोलीहून बदली होऊन कराड येथे येत आहेत. ते … Read more

आम्ही चुकलो नाही, नगराध्यक्षा चुकल्या..त्यांनी राजीनामा देण्याची तयारी ठेवावी – राजेंद्र यादव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणाचे ठराव एकमताने मंजूर होवूनही त्यावर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे स्वाक्षरी का करत नाहीत, हा त्यांचा प्रश्न आहे. जनशक्ती म्हणून स्वच्छ सर्वेक्षणात आम्ही नेमहीच पुढे राहणार आहोत. त्यात आमची चुक होणार नाही. जर चुक झालीच तर आमच्या आघाडीच्या नगरसेवकांचे आम्ही राजीनामे देवू. असा इशार जनशक्ती आघाडीचे गट नेते राजेंद्र … Read more

WhatsApp ग्रुपवर नगराध्यक्षा रोहिणी शिंदेंची बदनामी? कराड पोलिसांत लेख तक्रार दाखल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे समाज माध्यमांवर बदनामी होत असल्याने “दक्ष कराडकर” या व्हाट्सअप ग्रुपवर गुन्हा दाखल करण्याची लेखी तक्रार पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्याकडे स्वतः नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी दिले आहे. यावेळी उमेश शिंदे, मुकुंद चरेगावकर, एकनाथ बागडी उपस्थित होते. गेली ४ वर्षे कराड नगरपरिषदेची लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून … Read more