कराडजवळ भीषण अपघात; मिनी बस पुलावरून तारळी नदीत कोसळून 5 जण ठार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील उंब्रजजवळ भीषण अपघात झाला आहे. मिनी बस पुलावरून तारळी नदीत कोसळली आहे. या अपघातात पाच जण ठार तर सात जण जखमी झाले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली असून दिवाळीच्या पहाटे हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यातील उंब्रजजवळ  तारळी नदीच्या पुलावरुन मिनीबस सुमारे ५० फुट खाली कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जण जागीच ठार झाले असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मिनीबस  वाशीवरुन गोव्याकडे निघाली होती. अपघातात तीन पुरुष एक महिला व तीन वर्षाचा मुलगा असे पाचजण ठार झाले आहेत.

तारळी नदीच्या दोन्ही पुलाच्या मध्यभागी असणाऱ्या रिकाम्या चौकोनातून ही मिनीबस सुमारे ५० फुट  खाली कोसळली. यातील एक जखमी प्रवाशी बाहेर निसटल्याने हा अपघात पोलीस आणि स्थानिक नागरिकांना कळाला त्यानंतर नागरिक पोलिसांनी येथे धाव घेवून मदत कार्य सुरू केले आहे.

You might also like