साताऱ्यात युवतीचे अपहरण प्रकरणी चाैघांवर गुन्हा

Shahupuri Satara Police

सातारा | युवतीची लग्नासाठी कोणतीही इच्छा नसताना तिचे शहर परिसरातून जबरदस्तीने ओमीनी गाडीतून अपहरण करणे तसेच जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवत तिला जातीवरून अपमानीत केले. या प्रकरणी युवतीने दिलेल्या फिर्यादीवरुन शाहूपुरी पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली माहिती अशी, प्रवीण बजरंग बावळेकर, प्रवीणची आई (पूर्ण नाव माहित … Read more

पाकिस्तानी सैनिकांकडून भारतीय बोटीसह 6 मच्छिमारांचे अपहरण, गोळीबारात एकाचा मृत्यू

गांधीनगर । सीमेनंतर आता पाकिस्तानने भारताविरोधात समुद्र किनारी भागात कारवाई केली आहे. रविवारी पाकिस्तानी नौसैनिकांनी एका भारतीय बोटीसह 6 भारतीय मच्छिमारांचे अपहरण केले. यादरम्यान पाकिस्तानकडूनही अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची माहिती मच्छिमारांनी दिली आहे. यामध्ये एका मच्छिमाराचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. ही घटना IMBL जवळ घडल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या … Read more

धक्कादायक! महिलेचं अपहरण करून 14 जणांकडून बलात्कार

Rape

पाटणा : वृत्तसंस्था – एका 32 वर्षीय महिलेवर 14 जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. या नराधमांनी आधी महिलेचं अपहरण केलं आणि यानंतर तिला नदीच्या किनाऱ्यावर घेऊन गेले. इथे आरोपींनी सर्व हद्द पार करत महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर आरोपींनी पोलिसांना पाहताच आपले कपडे तिथेच सोडले आणि … Read more

मुलगी नाही म्हणून सासू-सुनेने मिळून चिमुकलीचे केले अपहरण

kidnap girl

औरंगाबाद | मुलगा व्हावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आणि त्यासाठी समाजातील अनेकजण नको ते प्रयत्न करतात. प्रत्येकाला वंशाचा दिवा हवा असतो. प्रत्येकजण मुलीला नाकारतात मात्र औरंगाबादेत पोटची मुलगी नाही म्हणून सासू आणि सुनेने तीन वर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वनमाला मुन्नालाल शर्मा (वय 52) व राधा रवी शर्मा (वय 27) दोघी (रा. … Read more

चार वर्षीय चिमुकलीचे भीक मागण्यासाठी केले अपहरण; आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

kidnap girl

औरंगाबाद | चितेगाव येथून एका चार वर्षीय मुलीचे भीक मागण्यासाठी अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर पोलिसांनी दोन दिवसात तपास लावून मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला शुक्रवारी अटक केली आहे. जानवी अनिलकुमार कुसवाह (रा. चिपळूण, ह.मु. रेल्वेस्टेशन औरंगाबाद) असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. यासंदर्भात जयश्री चव्हाण (वय 25, रा. चितेगाव ता. पैठण) यांनी दिलेल्या … Read more

धक्कादायक ! घरात डांबून सलग 9 दिवस अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rape

झारखंड : वृत्तसंस्था – झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका नराधमाने एका अल्पवयीन मुलीला 9 दिवस घरात डांबून बलात्कार केला आहे. या मुलीने आरोपीच्या ताब्यातून कशीबशी आपली सुटका करून पोलिसांत धाव घेतली आणि आपल्याबाबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला शोधून त्याला अटक केली आहे. काय आहे प्रकरण झारखंडमध्ये … Read more

धक्कादायक ! जन्मदात्या पित्याने 6 वर्षाच्या चिमुकलीला मारून लपवला मृतदेह, अशा प्रकारे झाला खुलासा

murder

माद्रिद : वृत्तसंस्था – माद्रिद या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका पित्याने आपल्या 6 वर्षाच्या चिमुकलीची हत्या करून तिचा मृतदेह जमिनीपासून तब्बल 3000 फुट खाली लपवला आहे. हि मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी तिचा मृतदेह समुद्राच्या तळाशी सापडला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी वडिलांनी काही दिवसांपूर्वी आपल्या … Read more

विवाहीत आत्याला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले, त्यानंतर घडले असे काही…

murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील आझमगढमधील पवई गावात एका 14 वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आपल्या मुलाच्या खुनामागे कोणाचा हात आहे हे जेव्हा पालकांना समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या हत्येमागचा मुख्य सूत्रधार हि या मुलाची सखी आत्या आहे. मृत मुलाचे नाव सत्यम असे आहे. या प्रकरणातील आरोपी आत्या हि … Read more

महिला शिक्षका 11 वी च्या विद्यार्थ्याला घेऊन ‘फरार’, लॉकडाऊनमुळे घरातच घेत होती क्लास

love affair

पानिपत : वृत्तसंस्था – पानिपत या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एक शिक्षिका क्लासला येणाऱ्या एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला घेऊन फरार झाली आहे. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महिला शिक्षिकेवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि शिक्षिका सध्या कोरोना आणि टाळेबंदीमुळं शाळा बंद … Read more

तुर्कीच्या मालवाहू जहाजावर हल्ला, समुद्री चाच्यांनी नाविकाला मारले, 15 जणांचे अपहरण

नवी दिल्ली । पश्चिम आफ्रिकेच्या (West Africa) किनारपट्टीवर समुद्री जहाजांनी मालवाहू (Turkey) जहाजांवर हल्ला केला असून त्यात एक नाविक ठार तर अन्य 15 जणांचे अपहरण झाले आहे. रविवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. तुर्की सागरी संचालनालयाने बातमी दिली की, एम / व्ही मोझार्ट या जहाजाच्या क्रू सदस्यांनी सुरुवातीला स्वत: ला सुरक्षित ठिकाणी लॉक केले होते परंतु … Read more