येत्या 3 ऑगस्टपर्यंत राज्यातील ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

heavy rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या आठवडयात राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र या दोन दिवसात पावसाचा जोर कमी झाला होता. आता पुन्हा ३ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पुन्हा कोसळणार असल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावे असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात … Read more

.. तर 1 रुपयाही निधी देणार नाही; राणेंची ग्रामस्थांना धमकी??

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त विधानामुळे आधीच राज्यातील राजकीय वातावरण बिघडलं असतानाच आता भाजप आमदार नितेश राणे यांच्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर गावाला निधी देणार नाही अशी थेट धमकीच राणेंनी ग्रामस्थांना दिली आहे. १८ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या … Read more

कोकणात प्रेमसंबधातून युवकावर हल्ला : कराडातील 4 युवकांना अटक

Kankavali Police

कणकवली | कोकणातील जानवली- आदर्शनगर येथील एका युवकावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी कराड तालुक्यातील चार युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चाैघेही 20 ते 25 वयोगटातील असून हा हल्ला प्रेमसंबधातील वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आज या संशयितांना कणकवली न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. याबाबतची माहिती अशी, जानवली- आदर्शनगर येथील शिवानंद दत्तात्रय जंगम (वय- 23) या युवकावर … Read more

चाकरमान्यांसाठी खुशखबर!!! एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त 2310 जादा बसेस

ST Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी खुशखबर आहे. यंदाच्या गणेश उत्सवासाठी एसटी महामंडळाकडून 2310 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गेल्या २ वर्षांच्या कोरोना काळानंतर यंदाचा गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने हा निर्णय घेत गणेश भक्तांना खुश केलं आहे. 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत एसटी … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या बेकायदा बंगल्यावर हातोडा

दापोली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या मुरूड दापोली येथे बेकायदा उभारलेल्या बंगल्यावर जेसीबीने हातोडा मारत कारवाई सुरू केलेली आहे. अनाधिकृत बंगल्याचे बांधकाम तोडण्यास सुरूवात केली असल्याचे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी व्हिडिअो ट्विट केला आहे. करून दाखविले ! मिलींद नार्वेकर चा बंगलो तोडला आता पुढचा नंबर मंत्री अनिल परब रिसॉर्टचा असे … Read more

मान्सूनचे आगमन : मुंबई- गोवा मार्गावर निवळी घाटात दरड कोसळली तर कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पाणीपातळी वाढली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मान्सून पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. रत्नागिरी, सिंदुधुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला जोरदार झोडपले आहे. पुढील तीन दिवस मान्सून पावसाचा जोर वाढणार आहे. निवळी घाटात दरड कोसळल्याने मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक थांबली होती. दरड हटविण्याचे काम हाती घेतले असून वाहतूक एकेरी सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला रात्रभर पावसाने झोडपून … Read more

गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय मग, टोल भरण्याची गरज नाही; मंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

मुंबई । गणेशोत्सवासाठी (ganesh festival) कोकणात जाण्याकरिता आता टोल (toll) भरण्याची गरज नाही. राज्य सरकारने चाकरमान्यांना गणेशोत्सव सुरू होण्याच्या २ दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात २ दिवस टोलमधून सवलत दिली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, कोकण विभागातील पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्तांची व्हीडीओ … Read more

खुशखबर! गणेशोत्सवाला कोकणात एसटीने जाणाऱ्यांना ई-पासची गरज नाही

मुंबई । अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून प्रवाशांसाठी काही खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. कोकणात जाण्यासाठी एसटीने प्रवास करताना ई-पासची गरज लागणार नाही. मात्र खासगी वाहनाने प्रवास करताना ई-पास अनिवार्य असणार आहे. कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना १२ तारखेपूर्वी कोकणात पोहोचावं लागणार आहे. ज्यांना १२ तारखेनंतर कोकणात जायचं … Read more

तुम्हाला खरं नाही वाटणार पण हा लाकडापासून बनवलेला ट्रक आहे; लाॅकडाउनमध्ये सुताराची कलाकूसर

रत्नागिरी । कोरोनामुळे लॉकडाऊन झाले, पण याचाही अनेकांनी सदुपयोग करून घेतला आहे. रत्नागिरीतील सुतार समाजातील कारागीर संतोष यशवंत माचकर आणि त्यांचे सुपुत्र रोहित संतोष माचकर यांनी या लॉकडाऊनच्या काळात हुबेहुब म्हणजे अगदी जसाच्या तसा लाकडी “ट्रक” (लॉरी) तयार केला आहे. यातून या माचकर पितापुत्रांच्या कामातील उच्च दर्जाचे कसब दिसून येत आहे. ओरिजिनल ट्रकला जे बाह्य … Read more

मदत न पोहचायला कोकण हा काही गडचिरोली किंवा नंदुरबार नव्हे! – देवेंद्र फडणवीस

मुंबई । मदत न पोहचायला कोकण हा काही गडचिरोली किंवा नंदुरबार नव्हे. मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असूनही कोकणात अजून निसर्ग चक्रवादळातील वाताहतीनंतर मदत पोहोचू शकलेली नाही अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गेल्या महिन्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात रायगड आणि रत्नागिरी … Read more