चंदगड मध्ये मोठी राजकीय उलथापालथ ; भाजप समर्थक अपक्ष उमेदवाराला राष्ट्रवादीचा पाठिंबा

मतदानाला अवघे तीन दिवस राहिले असतानाच अनेक मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड मतदारसंघात तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंदगड मधून काँग्रेस आघाडीकडून राजेश पाटील तर महायुतीकडून संग्राम कुपेकर हे रिंगणात आहेत. या दोघांविरोधात भाजप समर्थक अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी शड्डू ठोकला आहे.

कार्यकर्त्यासारखा झटणारा फक्त एकच ‘सत्यजित’ – धैर्यशील माने

‘दिवसातले २४ तास घरचा तसेच कोणताही विचार न करता उपलब्ध असणारा तसेच २८८ पैकी एवढा झटणारा आमदार जर कोण असेल तर तो सत्यजित पाटील आहे’ असे वक्तव्य हातकणंगले आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ‘पोस्टल मतदान’ प्रक्रिया सुरू

विधानसभेसाठी कोल्हापुरातील शासकीय कर्मचारी, पोलीस,होमगार्ड,सुरक्षारक्षक यांच्या मतदानाची प्रक्रिया आज पार पडली. कोल्हापूरातील दहाही मतदान केंद्रासाठी हे मतदान झाले. सकाळी ११ ते ५ ही या मतदानाची वेळ होती. बॅलेट पेपरवर हे मतदान घेण्यात आले असून पोस्टल मते म्हणून ते नोंदवण्यात आले आहेत.

इचलकरंजीत तब्बल पावणे दोन कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबनूर येथे सुरू असलेल्या स्थिर पोलीस पथकाकडून तपासणी मध्ये एका कारमधून तब्बल पावणे दोन कोटीचे सोन्या – चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आयकर विभागाकडून याबाबत अधिक चौकशी सुरू असून यामुळे शहर आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजपात असल्याचा महाडिकांना पडला विसर; राष्ट्रवादीला मतदान करा म्हणून केले आवाहन

आपले चुलत बंधू अमोल महाडीक यांच्या प्रचारार्थ गोकुळ शिरगाव येथे घेतलेल्या सभेदरम्यान मतदान करण्याचा आवाहन करताना ‘धनंजय महाडिक यांनी चक्क घड्याळ निशाणीसमोरील बटन दाबण्याचे’ उपस्थितांना आवाहन केले. मात्र आपली चूक झाली हे लक्षात येताच त्यांनी ‘कमळ चिन्हा’चा उल्लेख करताच सभास्थळी एकच मोठा हशा पिकला. दरम्यान शरीराने भाजपा मध्ये गेलेल्या धनंजय महाडिकांच्या हृदयात मात्र ते म्हणतात त्या प्रमाणे शरद पवारच असल्याची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.

‘पेडन्यूज प्रकरणात बारकाईने लक्ष ठेवा’- सूचना खर्च निरीक्षक आर. नटेश

कोल्हापूर प्रतिनिधी । ‘विधानसभा निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांकडून पेडन्यूज होण्याची शक्यता असल्याने पेडन्यूज प्रकरणात बारकाईने लक्ष ठेवा आणि भारत निवडणूक आयोगाच्या याबाबत असलेल्या सूचनांची काटेकोर अमंलबजवणी करा,’ अशा सूचना खर्च निरीक्षक आर. नटेश यांनी दिल्या. खर्च निरीक्षक श्री. नटेश यांनी जिल्हास्तरीय माध्यम कक्षास भेट देऊन कक्षाकडील कामकाजाची माहिती घेतली. प्रसार माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा … Read more

‘माझ्या विकासाच्या स्वप्नाला साथ द्या’ – आदित्य ठाकरे

मुंबईमध्ये कोल्हापूर भवनाची उभारणी करणार आणि पहिल्याच वर्षी रखडलेला आजरा तालुक्यातील आंबेओहळ प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गडहिंग्लज येथे केली. येथील म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या प्रांगणात शिवसेनेचे कागल विधासभेचे उमेदवार संजय घाटगे आणि चंदगड विधानसभेचे उमेदवार संग्रामसिंह कुपेकर यांच्या एकत्रित प्रचाराचा शुभारंभ ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना ठाकरे यांनी ‘माझे साथी आणि सोबती’ म्हणून दोघांना निवडून विधानसभेत पाठवा असे आवाहन उपस्थितांना केले.

कोल्हापुरात गांजा विक्रीला निवडणुकीच्या काळात अच्छे दिन, महिलेसह एकास अटक

राजर्षी शाहू नाक्याजवळ गस्त घालत असताना गांजा विक्री करणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली असून त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. सुनीता किरण अवघडे आणि अमर सदाशिव पाटील अशी संशयितांची नावे आहेत. सायंकाळी सव्वासात वाजता ही कारवाई करण्यात आली.

यंदाच्या नवरात्रोत्सव काळात अंबाबाईचे साडे दहा लाख भाविकांनी घेतले दर्शन

यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सव काळात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे, पर्यटक व स्थानिक साडेदहा लाख भाविकांनी दर्शन घेतले. मांगल्यपूर्ण वातावरण सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाची सोमवारी खंडेनवमीच्या पूजेने सांगता झाली.मंगळवारी विजयादशमीनिमित्त अंबाबाईची रथात बसलेल्या रुपात सालंकृत पूजा बांधण्यात येणार आहे. सोमवारी, खंडेनवमी दिवशी अंबाबाई मंदिरातील पारंपरिक शस्त्रांचे पूजन करण्यात आले. देवीची आयुधे, परंपरागत शस्त्रांना अभिषेक करण्यात आला. लव्हाळे, झेंडूची फुले वाहण्यात आली. त्यानंतर काशी अन्नपूर्णा रुपात अंबाबाईची जडावी सालंकृत पूजा बांधण्यात आली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे संचलन

कोल्हापूर प्रतिनिधी। राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने आज शाहूपुरी येथे विजयादशमीचे संचलन केले. पालकमंत्री तसेच महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सुमारे पाचशे स्वयंसेवक संचलनात सहभागी झाले होते. आज सकाळी पावणेआठ वाजता संचलनास सुरवात झाली. कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेज या परिसरातून या संचालनालय सुरुवात झाली. शाहूपुरी परिसरातून शिस्तबद्ध रित्या हे संचलन पार पडले. संचलनात फुलांनी सजवलेल्या … Read more