हसन मुश्रीफांनी निकाला आधीच उधळला गुलाल !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीचं मतदान सोमवारी किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडले. मतदानानंतर आता सगळ्यांचं लक्ष निकालाकडे लागलेलं असताना पुण्यासह राज्यात काही उमेदवारांनी मतदान संपल्यानंतर फटाके फोडून जल्लोष केला. निकाला तीन दिवस बाकी असतानाच उमेदवारांनी फटाके फोडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर विजयाची घाई झालेल्या उमेदवारांनी फटाके फोडत जल्लोष केला. दरम्यान कोल्हापुरात काहीही घडू शकते याचा प्रत्यय काल पुन्हा एकदा आला आहे. विधानसभा निवडणुकीचे मतदान संपत नाही तोवर कागल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना गुलाल लावून कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला आहे. निकलाआधीच कार्यकर्त्यांनी त्यांचा विजयी जल्लोष केला.

यावेळी कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीफ यांना अक्षरश: खांद्यावर घेऊन गावभर वरात काढली. कार्यकर्त्यांच्या उत्साहात मुश्रीफांनी ही दाद देत उदयनराजेंची स्टाईल करत आपली कॉलर ही उडवली. सध्या त्यांचा हा विजयी रॅली चा व्हिडिओ आणि कॉलर उडविण्याची स्टाईल जिल्ह्यात चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शिवसेनेचे संजय घाटगे आणि बंडखोर अपक्ष उमेदवार समरजित घाटगे रिंगणात उभे आहेत. येत्या २४ तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment