कोल्हापूरात स्ट्रीट लाईटसाठी दलित महासंघाने केलं ‘यमराज’ आंदोलन

कोल्हापूर प्रतीनिधी । सतेज औंधकर गांधीनगर मेन रोडवरील वळीवडे कॉर्नर ते चिंचवाड रेल्वे फाटकापर्यंत स्ट्रीट लाईटच्या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. आंदोलनस्थळी एक कार्यकर्ता दुचाकीवरून पडून मृत्युमुखी पडल्याचे भासवतो तर दुसरा कार्यकर्ता यमराजाच्या रूपात म्हशीवरून येतो. या आगळ्यावेगळ्या निदर्शनांमुळे संपूर्ण गांधीनगर बाजारपेठेचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे व … Read more

गांधीनगर सुधारित पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता द्यावी-आ.ऋतुराज पाटील

कोल्हापूर प्रतीनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील 20 गावांसाठीच्या 224 कोटींच्या सुधारित गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या प्रशासकीय मान्यता द्यावी अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी पाणीपुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्यासोबत मुंबई येथे झालेल्या बैठकीत केली.यावेळी योजनेबद्दल सविस्तर आढावा घेण्यात आला. 15 दिवसांनी याबद्दल पुन्हा बैठक घेण्यात येईल असे मंत्री ना.पाटील यांनी सांगितले. बैठकीत बोलताना … Read more

देवस्थान जमिनीचा शर्तभंग; तावडे फाउंडेशनकडून जागा ताब्यात

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने शेती करण्यासाठी दिलेल्या जमिनीवर विनापरवाना इमारत बांधल्याप्रकरणी मोरेवाडी येथील आर. एल. तावडे फाउंडेशनकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने गुरुवारी जागा ताब्यात घेतली. एकूण तीन एकर जागेपैकी सात हजार चौरसफूट जागेत इमारत बांधून खंडकरी जमिनीच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेल्याचे देवस्थान समितीला आढळून आले. मंडल अधिकारी स्वरूप … Read more

प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा- जिल्हाधिकरी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोणत्या गोष्टिमुळे आपत्ती ओढवू शकते याचा विचार करून प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकरी दौलत देसाई यांनी आज दिल्या.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व आपत्ती व्यवस्थापन समितीची छत्रपती शिवाजी सभागृहात बैठक आज झाली. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, बांधकाम विभागाचे अधीक्षक … Read more

पुलाची शिरोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्रास आनंदीबाई जोशी पुरस्कार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आनंदीबाई जोशी पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या हस्ते संपुर्ण टीमचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष सतिश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, अरुण इंगवले, राजवर्धन निंबाळकर, प्रविण यादव, मनिषा कुरणे … Read more

संवेदना जागरच्या माध्यमातून एचआयव्ही जनजागृतीचे प्रभावी काम- जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक आणि किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि.ने संवेदना जागर 2020 च्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एचआयव्ही एड्स जनजागृतीचे प्रभावीपणे काम केले आहे. त्या सर्व पथकाचे मी अभिनंदन करतो, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज काढले. संवेदना जागर 2020 चा सांगता सोहळा आणि किर्लोस्कर सामाजिक बांधिलकी पुरस्कार वितरण … Read more

आधार प्रमाणिकरणाची विभागीय आयुक्तांकडून पाहणी; 38 हजार 200 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणानंतर दोन दिवसात त्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा होईल, असा दिलासा वरणगे येथे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिला. करवीर तालुक्यातील वरणगे येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण प्रक्रियेची विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आज प्रत्यक्ष पहाणी करुन माहिती घेतली. यावेळी … Read more

कोल्हापूर विभागीय आयुक्त डॉ. म्हैसकरांनी शिवभोजन केंद्राला भेट देत घेतला आढावा

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शिवाज या शिवभोजन केंद्राला आज भेट देवून दर्जा आणि स्वच्छता याची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, तहसिलदार शीतल मुळे-भामरे यावेळी उपस्थित होत्या. शिवाज शिवभोजन केंद्रातील भोजनाचा दर्जा, स्वच्छता याची पाहणी करून डॉ. म्हैसेकर यांनी उपस्थित लाभार्थ्याशी … Read more

कोल्हापूर मोक्का न्यायालयातून आरोपीने ठोकली धूम..

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर मोक्का गुन्ह्याखाली अटकेत असलेला आरोपी श्रीधर अर्जून शिंगटे (रा. इंचनाळ, ता. गडहिंग्लज) हा आज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातून पळून गेला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शिंगटे याच्याविरूद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी कोल्हापूरातील राजारामपूरी, जुना राजवाडा, गडहिंग्लज आणि आजरा पोलिस ठाण्यात त्याच्याविरूद्ध विविध गुन्हे दाखल … Read more

डॉ. आनंदीबाई गौरव पुरस्काराने संस्था, स्वयंसेविका, अधिकारी-कर्मचारी सन्मानित

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज पाटील जनतेची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा आहे. त्यामुळे चांगल्या रितीने जनतेची सेवा करावी. निश्चितच परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी केले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत डॉ. आनंदीबाई गोपाळ जोशी पुरस्कार 2018-19, गोवर-रूबेला मोहीम यशस्वी केल्याबद्दल सत्कार आणि जागतिक लोकसंख्या दिन कामगिरीच्या आधारे बक्षीस योजनेंतर्गत संस्था, एन.जी.ओ. … Read more