उद्योजकांच्या समस्यांबाबत 15 दिवसांत मंत्रालयात बैठक- उद्योगमंत्री सुभाष देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर उद्योजकांच्या समस्यांबाबत ग्रामविकास, नगरविकास, उद्योग विभाग, उद्योग संस्थांचे प्रतिनिधी यांची एकत्रित 15 दिवसात मंत्रालयात बैठक घेऊन निश्चितपणे त्यावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उद्योगमंत्री देसाई यांनी शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री … Read more

कोल्हापूरजवळ अपघातात जिल्ह्यातील 3 युवकांचा दुर्दैवी मृत्यू; दुचाकीने जात होते पन्हाळा दर्शनासाठी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर -रत्नागिरी महामार्गावरील नलवडे बंगल्याजवळील ग्रीनपार्क हॉटेलसमोर भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सरोज तानाजी पोवार (वय २०, रा.मोरेवाडी, ता.करवीर), शिवरंजक साताप्पा मरेन्नवार (वय १८रा.निमशिरगाव,ता.हातकणलंगले), आकाश तानाजी कदम (वय २०,१५ वी गल्ली, जयसिंगपूर) अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोन … Read more

कोल्हापूरात जंगलात गस्त घालणाऱ्या वनरक्षकावर हल्ल्याचा प्रयत्न; खैर जातीच्या लाकडासह हत्यार जप्त

खैराच्या लाकडाची तस्करी करणाऱया टोळीने वनविभागाच्या गस्ती पथकाच्या कर्मचाऱयांवर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. मध्यरात्री पेरीड गावच्या वनहद्दीत ही घटना घडली. वनरक्षक राजाराम बापू राजीगरे हे जखमी झाले आहेत. मलकापूर वनपरिक्षेत्राचे नंदकुमार नलवडे यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात फिर्याद दिली आहे.

तंजावरमध्ये मराठी संस्कृतीच्या पाऊलखुणा भक्‍कम – प्रा.डॉ. नंदकुमार मोरे

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर मराठ्यांनी दक्षिणेत दोनशे वर्षांहून अधिक काळ राज्य केले. त्यामुळे तेथील चित्र, शिल्प, संगीत, नाट्य, साहित्य आदींवर मराठीचा ठसा आहे. विशेषतः तंजावरमध्ये मराठी संस्कृतीच्या पाऊलखुणा आजही घट्ट आहेत, असे प्रतिपादन मराठी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या … Read more

कोल्हापूरमध्ये संवेदना जागर २०२० एलजीबीटी कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर आम्हाला व्यक्त होवू द्या..आम्ही तुमच्यातलेच आहोत.. आम्हाला गरज आहे तुमच्या आधाराची..अशी साद नुकत्याच झालेल्या संवेदना जागर 2020 एलजीबीटी कार्यशाळेमध्ये सायरा खानवेलकर आणि विशाल पिंजानी यांनी घातली. किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि. सामाजिक बांधिलकी उपक्रम, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, अभिमान यांच्या संयुक्त विद्यमाने सीपीआर येथे संवेदना जागर 2020 अंतर्गत एलजीबीटी … Read more

कोल्हापूरमध्ये ज्योतिषी श्वेता जुमानी यांच्या विरोधात अंनिसच तीव्र आंदोलन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर अंकशास्त्रनुसार भविष्य सांगणाऱ्या श्वेता जुमानी यांच्या विरोधात कोल्हापूरात आंदोलन करण्यात आलंय. पुरोगामी कोल्हापूरातून श्वेता जुमानी चले जाव, आकड्याचा खेळ बंद कराच्या जोरदार घोषणा करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. आजपासून पुढचे दोन दिवस श्वेता जुमानी कोल्हापूरातील कदमवाडी रोडवरील एका हॉटेलमध्ये थांबणार आहेत. त्याच हॉटेलच्या समोर हातात लक्षवेधी पोस्टर … Read more

कोल्हापूरमधील केर्ली,सातार्डे येथील दोन खासगी सावकारांविरोधात गुन्हे दाखल

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर सहकार विभागाने गेल्या आठवड्यात नऊ खासगी सावकारांची घरे, दुकाने आणि त्यांच्या कार्यालयावर छापे टाकले होते. त्यापैकी दोघा खासगी सावकारांवर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. केर्ली (ता. करवीर) येथील शहाजी विलास पाटील आणि सातार्डे (ता. पन्हाळा) येथील विनायक सुभाष लाड यांचा यामध्ये समावेश आहे. २८ जानेवारी रोजी सहकार विभागाच्यावतीने … Read more

पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शालेय शैक्षणिक शुल्कासाठी अभियंत्याकडून 30 हजारांची मदत

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर वडिलांकडून मिळालेला दातृत्वाचा वारसा जपत गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याची परंपरा महावितरणच्या कार्यकारी अभियंता राजेंद्र हजारे यांनी पुढे चालू ठेवली आहे. मंगळवारी (दि. 4) त्यांनी पूरग्रस्त शिरोळ तालुक्यातील 5 शालेय विद्यार्थ्यांचे प्रत्येकी 6 हजार प्रमाणे 30 हजार रुपये शालेय शैक्षणिक शुल्क भरले आहे. राजेंद्र हजारे यांचे वडील कै. लक्ष्मण राऊ हजारे … Read more

‘कडकनाथ’प्रकरणी कोल्हापुरात जोरदार निदर्शने

कोल्हापूर, प्रतिनिधी, सतेज औंधकर – कडकनाथ कोंबडी पालन फसवणूक प्रकरणातील प्रमुख संशयित, सागर खोत याला अटक करावी, या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, या मागणीसाठी कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीतर्फे शासकीय विश्रामगृहात हातात कोंबड्या घेऊन निदर्शने केली. समितीमधील सदस्यांनी कडकनाथ कोंबड्या हातात घेऊन घोषणाबाजी करत उपस्थितांचे लक्ष वेधले. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी या … Read more

महावितरण कर्मचाऱ्यांना मनोरंजनातून मिळाली ऊर्जा; ‘ऊर्जा-2020’ कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर दररोजच्या कामातून येणारे ताण-तणाव कमी करण्यासाठी महावितरण कोल्हापूर परिमंडलाने 31 जानेवारी रोजी सायंकाळी ‘ऊर्जा – 2020’ हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यास वीज कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाने वीज कर्मचाऱ्यांचा नुसता ताण-तणावच दूर केला नाही तर त्यांना नवी ऊर्जा सुद्धा दिली. महावितरणने यंदापासून वीज … Read more