Saturday, March 25, 2023

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या जबाबदारीत आणखी वाढ

- Advertisement -

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्याकडील जबाबदारीत आज आणखी वाढ झाली आहे.

- Advertisement -

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या सतेज पाटील यांच्याकडे आता सातारा, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या तीन जिल्ह्यातील संपर्कमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने आज जिल्हानिहाय पालकमंत्री व संपर्कमंत्री यांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये सतेज पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळं सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांची संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.