लॉकडाऊनमुळे Swiggyने केला ११०० कर्मचाऱ्यांना रामराम!; काही दिवसांत आणखी कर्मचारी कपात होणार

मुंबई । लॉकडाऊनमुळं अनेक व्यवसाय ठप्प पडले आहेत. त्यामुळं या व्यवसायांशी जोडले गेलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. अनेक कंपन्या व्यवसाय बंद किंवा कमी झाल्यानं कर्मचारी कपात करत आहेत. लॉकडाऊनमुळे Swiggy या ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीने ११०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत विविध शहरांतील Swiggyच्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात होईल. … Read more

वाधवान कुटुंबियांना लॉकडाऊनमध्ये प्रवासासाठी शिफारस पत्र देणारे अमिताभ गुप्ता पुन्हा पदावर रुजू

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात वाधवान कुटुंबीयांना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करण्यासाठी शिफारस पत्र दिल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता पुन्हा आपल्या पदावर रुजू झाले आहेत. एप्रिल महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे आंतरजिल्हा प्रवासास बंदी होती. मात्र, पोलिसांनी अडवल्यानंतर अमिताभ गुप्ता यांचे शिफारस पत्र दाखवत वाधवान यांनी कुटुंबातील २३ जणांस खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास … Read more

मास्क न घातल्यास ४२ लाखांचा दंड आणि ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; ‘या’ देशात कडक नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग सध्या कोरोना या साथीच्या रोगाशी लढा देत आहे, प्रत्येक देश या साथीतून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत आहे, परंतु अद्यापही या रोगावर कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही, अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणेच आवश्यक आहे असे सर्वांना सांगितले जात आहे. म्हणूनच, आपणही सावधगिरी बाळगून या रोगापासून दूर रहावे आणि घराबाहेर … Read more

IPL भरवण्याबाबत BCCI ने केले ‘हे’ मोठे विधान…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये सरकारकडून क्रीडा संकुल आणि स्टेडियम ​​सशर्तपणे उघडण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र असे असूनही, बीसीसीआयने सध्याच्या परिस्थितीत आयपीएल आयोजित करण्याबाबत विचार करणे हे फार घाईचे ठरणार असल्याचे म्हटले आहे. सरकारने रविवारी ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली. लॉकडाऊन असूनही, देशभरातील क्रीडा संकुले आणि स्टेडियम प्रेक्षकांविना उघडता … Read more

‘EMI’ वसुली आणखी ३ महिने स्थगित होण्याचे संकेत

नवी दिल्ली । लॉकडाउनमध्ये उद्योग व्यवसाय ठप्प झाल्याने रिझर्व्ह बँकेने तीन महिन्यांसाठी कर्ज वसुली स्थगित करण्याचे निर्देश दिले होते. मार्च, एप्रिल आणि मे असे ३ महिने बँकांनी कर्ज हप्ते वसुली स्थगित केली आहे. दरम्यान, लॉकडाउन ३१ मेपर्यंत वाढवल्याने आता कर्ज हप्ते स्थगितीचा कालावधी आणखी तीन महिने वाढवला जाईल, असे ‘एसबीआय’ने आपल्या अहवालात म्हटलं आहे. तसे … Read more

स्थलांतरित मजुरांवर हरियाणा पोलिसांचा लाठीहल्ला, जीव वाचवण्यासाठी मजूर संसार रस्त्यावर टाकून पळाले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हरियाणातील यमुनानगर परिसरात गावी परतत असणाऱ्या स्थलांतरित कामगारांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांचा लाठीमार चुकवण्यासाठी लोकांनी आसपासच्या शेतांचा आधार घेतला, मात्र त्या शेतांतूनही पाठलाग चालूच ठेवत पोलिसांनी कामगारांना नाकीनऊ आणलं. देशभरातून कधी पायपीट करून, कधी मिळेल त्या साधनाने आपल्या गावी पोहोचणाऱ्या स्थलांतरित कामगारांवर होणारा अन्याय या काही दिवसांत आपल्याला काही नवीन नाही. रोज नव्याने … Read more

घरी परतण्याच्या तिकीट नोंदणीसाठी गाझियाबादमध्ये लोकांची झुंबड, गर्दी नियंत्रणाबाहेर..!!

घरी परतण्यासाठी रेल्वे बुकिंग करायला आलेल्या हजारो लोकांनी गाझियाबादमध्ये फिजिकल डिस्टनसिंगचा फज्जा उडवला आहे.

Corona Impact | काठमांडूतून पहिल्यांदाच दिसला २०० किमी दूर असणारा एव्हरेस्ट पर्वत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिमालयातील सुंदर शिखरे पाहणे हा एक अतिशय आनंददायक अनुभव आहे. जगभरातील अनेक लोकं हिमालयातील ही मनोहारी शिखरं पाहायला जात असतात. मात्र असंख्य असे लोक देखील आहेत ज्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात हिमालयातील ही शिखरे पाहता येत नाहीत. सध्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे जगभरातील देशात लॉकडाऊन सुरु आहेत, ज्यामुळे वातावरणातील प्रदूषणाची पातळी खूपच कमी … Read more

राज्यात केंद्रीय पोलीस दलाच्या १० तुकड्या दाखल; केंद्रानं केली राज्य सरकारची मागणी पूर्ण

मुंबई । राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, लॉकडाऊनचा काळ आणि पोलीस यंत्रणेवर वाढता ताण या सर्व परिस्थितीमुळे राज्य सरकारने केंद्र सरकारला राज्यात केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या पाठवण्याची मागणी केली होती. केंद्रानं राज्य सरकारची मागणी मान्य केली असून केंद्रीय पोलीस दलाच्या १० तुकड्या महाराष्ट्रात दाखल झाल्या आहेत. या सर्व तुकड्या सोमवारीच राज्यातील विविध ठिकाणी सेवेत रुजू … Read more

औरंगाबादेत शीघ्र कृती दलाची तुकडी दाखल ; गर्दीचे नियमन करण्यास होणार मदत

औरंगाबाद प्रतिनिधी l लॉकडाऊनच्या काळात पोलिसांच्या मदतीला आता शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे 120 जणांची एक तुकडी शहरात दाखल झाली आहे. त्यामुळे आता विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना चांगलीच चपराक बसणार आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. जिल्हा प्रशासन वारंवार नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना करीत आहेत. मात्र तरी देखील नागरिक ठीक-ठिकाणी … Read more