दिलासादायक ! सोलापूरात अवघ्या 22 दिवसाच्या बाळाने केली कोरोनावर मात

सोलापूर प्रतिनिधी l कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या सोलापुरातुन एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील अवघ्या 22 दिवसाच्या एका चिमुकलीने कोरोनवर मात केली आहे. 26 एप्रिल रोजी या मुलीचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात जन्म झाला होता. घरी गेल्यानंतर बाधितांच्या संपर्कात आल्याने या चिमुकलीची आई आणि चिमकुलीस कोरोनाची लागण झाली. अवघ्या 11 दिवसाची असताना या मुलीस शासकीय रुग्णालयात … Read more

अर्थमंत्री सीतारामन यांचा ‘निर्मला अक्का’ असा उल्लेख करत आव्हाडांनी हाणला टोला, म्हणाले..

नवी दिल्ली । काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधींनी मजुरांची भेट घेऊन विचारपूस केल्यावर त्यांना  ड्रामेबाज म्हणणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून टोला हाणला आहे. एखाद्याविषयी माणुसकी आणि संवेदना व्यक्त करणं ही ड्रामेबाजी असेल तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे’ असा टोला आव्हाड … Read more

Lockdown 4.0 । देशात आता ३ नाही तर एकूण ५ झोन; जाणून घ्या बफर अन कंटेनमेंट झोनबाबत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यासाठी आता केंद्र सरकारने देशाचे तीनऐवजी पाच झोनमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता देशात रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन व्यतिरिक्त ‘बफर झोन आणि कंटेनमेंट झोन’चा समावेश करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकार या दोन नवीन झोनबाबत लवकरच … Read more

‘या’ तारखांना होणार सीबीएसई बोर्डाच्या १० वी, १२ वीच्या परीक्षा

नवी दिल्ली । कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने दहावी, बारावीच्या प्रलंबित परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जारी केले आहे. २९ प्रमुख विषयांच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षा १ ते १५ जुलै २०२० दरम्यान होणार आहेत. कोणता पेपर कधी, कोणत्या सत्रात याविषयीची सविस्तर माहिती बोर्डाने दिली आहे. याचसोबत कोणत्या परीक्षा … Read more

मुंबईतून थेट यूपीतील आपल्या गावात पोहोचला नवाजुद्दीन सिद्दीकी; १४ दिवस होम क्वारंटाईन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला मुजफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाना येथे आपल्या घरी पोहोचताच होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तो मुंबईहून नुकताच मुझफ्फरनगरला आला आहे. आता तो आपल्या कुटुंबासमवेत १४ दिवस क्वॉरंटाईन राहील. या अभिनेत्याची आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची वैद्यकीय तपासणी देखील केली गेली आहे. ज्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. महाराष्ट्र सरकारचे परवानगीपत्र … Read more

आता रेड झोनमध्येही ई-कॉमर्स कंपन्यांना सेवेची परवानगी; ऑटो, टॅक्सीलाही सूट

नवी दिल्ली । लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी केंद्राकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार, ई-कॉमर्स कंपन्यांना सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकारकडून बरीच मोकळीक देण्यात आली आहे. नव्या निर्देशानुसार, ई-कॉमर्स कंपन्यांना अत्यावश्यक वस्तूंसहीत इतर वस्तूंच्या सामानाची डिलिव्हरी करण्यास सूट मिळाली आहे. ग्रीन, ऑरेंजसहीत ई-कॉमर्स कंपन्या रेड झोनमध्येही वस्तू पोहचवू शकणार आहेत. केवळ कन्टेन्मेंट झोनमध्ये ई कॉमर्स कंपन्यांना … Read more

कामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा

भारतीय कामगार कायद्यांना गंभीर बदलाची  आवश्यकता आहे. पण सुधारणेच्या सबबीखाली सरकारकडून करण्यात आलेल्या अध्यादेशाच्या घोषणा म्हणजे संपूर्णपणे कामगारांवरील प्राणघातक  हल्ल्यांना मुक्तपणे सोडून देणे. त्यांचे कामाचे तास वाढविणे म्हणजे अक्षरशः त्यांचे शरीर, स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा तोडणे होय.

Lockdown 4.0 | काय सुरु आणि काय बंद राहणार? पहा केंद्राची नवी नियमावली

Narendra Modi

नवी दिल्ली । देशातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. केंद्राकडून याबाबत नवीन नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मेट्रो, रेल्वे, विमानसेवा बंदच राहणार आहे. तसंच कॉलेज, शाळा, सिनेमागृह, धार्मिक प्रार्थनास्थळंदेखील बंदच राहणार आहेत. राजकीय कार्यक्रमांवरील बंदीही कायम राहणार आहे. आंतरराज्य तसंच आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला … Read more

देशातील लोकडाऊन ३१ मे पर्यंत वाढला; केंद्राची नवीन नियमावली जाहीर

नवी दिल्ली । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात घोषित केलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्यापासून सुरू होतोय. हा लॉकडाऊन ३१ मेपर्यंत असेल, अशी माहिती केंद्र सरकारने दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली होती. त्यांनतर लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिलीय. https://hellomaharashtra.in/breaking-news-marathi/lockdown-4-0-central-government-new-rule-and-regulations/ लॉकडाऊनचा चौथा टप्पा हा नव्या स्वरूपाचा … Read more

अबब !! चक्क पंतप्रधानांनाच रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या रेस्टॉरंटमध्ये नेते मंडळीनी स्टार्सनी तसेच व्हीआयपींनी हजेरी लावावी यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. त्यांच्यासाठी काही खास आदरातिथ्याचे आयोजनही केले जाते. मात्र, एका देशात एका रेस्टॉरंटमध्ये चक्क देशाच्या पंतप्रधानांनाच प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हे घडले न्यूझीलंड या देशामध्ये. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांना राजधानी वेलिंग्टनमधील एका रेस्टॉरंटमध्ये शनिवारी चक्क … Read more