काल मोदींनी फक्त एक हेडलाइन आणि एक कोर पान दिलं- पी. चिदंबरम

मुंबई । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे. लॉकडाउनमुळे खीळ बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी काल २० लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा केली. मोदींनी जाहीर केलेले पॅकेज म्हणजे फक्त एक ‘हेडलाइन आणि … Read more

LockDown 4 | 18 मे पासून पुढे सुरु – चौथ्या लॉकडाऊनसाठी नव्या सुधारणांची नरेंद्र मोदींची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आत्मनिर्भर करण्यासाठी २० लाख कोटींच्या भव्यदिव्य पॅकेजची घोषणा केली. हे आर्थिक पॅकेज कुटिरोद्योग, ग्रामीण भारताची व्यवस्था सुधारण्यासाठी आणि भारताच्या विकासासाठी असणार असून हे पॅकेज कष्टकऱ्यांसाठी आहे, देशातील मध्यमवर्गीयांसाठी आहे आणि देशाची औद्योगिक धुरा सांभाळणाऱ्यांसाठी सुद्धा असल्याचं नरेंद्र मोदींनी आज स्पष्ट केलं. देश पुढं जाण्यासाठी या पॅकेजची … Read more

कोरोना संकटात आत्मनिर्भर भारताचा नरेंद्र मोदींकडून पुनरुच्चार

नवी दिल्ली । देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या लॉकडाऊनच्या मध्यात देशवासीयांशी पुन्हा एकदा संवाद साधला. कोरोना संक्रमणाशी लढताना जगभराने मागील ४ महिने लढा दिला असून जगभरात ४२ लाख लोकांना याचा संसर्ग झाला, ज्यामध्ये पावणेतीन लाख लोकांचा मृत्यू झाला. भारतातही यामुळे बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला असून त्या सर्वांप्रति मी श्रद्धांजली … Read more

राज्य सरकारी कर्मचारी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार एका दिवसाचं वेतन

मुंबई । करोना संकटामुळंं आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारच्या मदतीसाठी सरकारी कर्मचारी धावून आले आहेत. मे महिन्यातील एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता जवळजवळ सर्वच सेवा, उद्योग ठप्प आहेत. त्याचा … Read more

लाॅकडाऊनमध्ये तुम्हीपण घेऊ शकता मोदी सरकारच्या या योजनेचा फायदा; मिळेल ३.७५ लाखांची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनने ग्रस्त झाल्यानंतर आपापल्या गावात पोहोचलेल्या बर्‍याच तरुणांना यापुढे शहरात यायचे नाहीये आणि म्हणूनच ते खेड्यांमध्येच आपल्यासाठी योग्य असा रोजगार शोधत आहेत. अशाच तरूणांसाठी मोदी सरकारची सेल्फ हेल्थ कार्ड बनवण्याच्या योजनेचा उपयोग झाला आहे. या योजनेद्वारे गाव पातळीवर एक मिनी सेल्फ टेस्टिंग लॅब स्थापित करुनही उत्पन्न मिळू … Read more

तब्बल ५० दिवसानंतर मारुती सुझुकी तयार करणार पहिली गाडी

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रातील उत्पादन बंद होते. यात चार चाकी गाड्यांचा देखील समावेश होता. आता मारूतीने ५० दिवसानंतर पहिली गाडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठ्या चारचाकी गाड्यांची निर्मिती करणाऱ्या मारुती सुझुकी इंडियाने आपल्या मानेसर येथील कारखान्यातून निर्मितीचे काम सुरू केले आहे. कंपनीने आजच … Read more

राज्यात आत्तापर्यंत ८१९ पोलीस कोरोनाबाधित, ७ जणांचा मृत्यू – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई । कोरोनाच्या लढाईत फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या पोलिसांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आत्तपार्यंत ८१९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करुन आत्तापर्यंत ४ कोटींचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख … Read more

महिलेने ५०० कि.मी. पायी चालल्यानंतर एका झाडाखाली दिला बाळाला जन्म

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात एका परप्रांतीय महिलेने मध्य प्रदेशपासून ५०० कि.मी. अंतर प्रवास करून एका झाडाखाली बाळाला जन्म दिला. सदर महिलेसह आणखी एक डझन लोक अनेक दिवसांपासून मध्य प्रदेशातील धार येथून चालत होते आणि ५२० कि.मी. अंतरावर गेल्यानंतर तिला सोमवारी बालाभेत गावात बाळंतपणाचा त्रास झाला. प्रवासाला निघाली तेव्हा ती साडेआठ महिन्यांची … Read more

लॉकडाउनमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकीत; महामंडळाला हवेत ३०० कोटी

मुंबई । लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्रात सध्या अविरतपणे परप्रांतीय मजूर, विद्यार्थी यांची ने आण करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार मात्र धोक्यात आहेत. लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचं दर दिवशी २१ कोटींचं नुकसान होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला ३०० कोटींची मदत द्या, नाही तर एसटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल-मे महिन्यांचे पगार देणं कठीण होईल, अशी मागणी इंटकने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली … Read more

आंतरराष्ट्रीय नर्स डेनिमित्त विराट कोहलीने नर्सेसचे मानले आभार म्हणाला,”या कठीण काळात साथ दिल्याबद्दल धन्यवाद”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग सध्या कोरोनाव्हायरस या साथीच्या आजाराने झगडत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक देशाने स्वत:ला लॉकडाऊनमध्ये टाकले आहे आणि शाळा-कार्यालयापासून ते संपूर्ण क्रीडा विश्‍व थांबले आहे. परंतु डॉक्टर व परिचारिका हे मात्र सध्या स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णालयात जात आहेत. आज आंतरराष्ट्रीय नर्स डे आहे, या निमित्ताने भारतीय कर्णधार विराट कोहलीने सर्व … Read more