मुंबई-पुण्यातील लॉकडाऊन दोन आठवडे लांबणार?

मुंबई । मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची तसंच मृतांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या दोन शहरांमधील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल मंगळवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर लॉकडाऊन १५ एप्रिल रोजी उठणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबई-पुण्यातील कोरोनाबाधितांचे वाढते आकडे पाहता या शहरातील लॉकडाऊन आणखी दोन आठवडे वाढवावा असं मत … Read more

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी ‘हे’ युरोपीयन देश हटवणार आहेत लॉकडाउन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युरोपमधील काही देश कोरोनाव्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन उठवणार आहेत आहेत. एकीकडे युरोपमधील काही देशांमध्ये कोरोनाचा तीव्र संसर्ग होत आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रिया, डेन्मार्क आणि झेक प्रजासत्ताक त्यांच्यावर लादलेल्या लॉकडाऊनमध्ये सूट देणार आहेत. पुढील आठवड्यापासून या देशांमध्ये टप्प्याटप्प्याने सूट देण्यात येणार आहे. यामुळे या देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. साउथ … Read more

सरकारचा मोठा निर्णय- २.८२ कोटी पेन्शनधारकांना १,४०० कोटी रुपये जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ च्या जागतिक साथीमध्ये केंद्र सरकारने गरिबांना मोठा दिलासा दिला आहे. वृद्धावस्था, विधवा व अपंग पेंशनधारकांना सरकार एक हजार रुपये अतिरिक्त देणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती दिली. केंद्रीय कृषिमंत्री म्हणाले, मोदी सरकारने वृद्धापकाळासाठी, विधवा व अपंग निवृत्तीवेतनधारकांना सर्वसाधारण पेन्शन व्यतिरिक्त १००० रुपयांच्या पूर्वजातीय रकमेपैकी ५०० च्या … Read more

साजिद नाडियाडवालाने ४०० कर्मचाऱ्यांना दिला मदतीचा हात,पीएम फंडलाही करणार मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात सध्या भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. २०० हुन अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही कोरोनाने सोडलं नाही. याला अटकाव घालण्यासाठी मोदी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. मात्र याचा आर्थिक परिणाम विविध क्षेत्रात रोजंदारीवर काम … Read more

“नागरिकांचे जीवच गेले तर ते परत आणायचे कसे ?”शिवराज सिंह चौहान यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात सध्या भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. २०० हुन अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांला आपले प्राण गमवावे लागले आहेत.सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत कोणालाही कोरोनाने सोडलं नाही. याला अटकाव घालण्यासाठी मोदी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. आता हा लॉकडाउन संपण्याचा काळ जस जसा जवळ … Read more

करोनामुळं देशभरात तब्बल ५२ टक्के नोकऱ्या जातील?

नवी दिल्ली । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. या लॉकडाउनमुळे देशातील बरेच व्यवहार ठप्प आहेत. याचा मोठा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॉकडाउनचा सर्वात मोठा फटका हा देशाअंतर्गत रोजगाराला बसणार असल्याचं सीआयआय केलेल्या एका सर्व्हेक्षणात म्हटलं गेलं आहे. कोरोनामुळं लागू केलेल्या लॉकडाउनमुळे देशातील ५२ … Read more

कोल्हापूर जिल्ह्यात लोकडाऊनच्या काळात मद्य तस्करी, ६६ ठिकाणी कारवाई

कोल्हापूर प्रतिनिधी। सतेज औंधकर लॉक डाउनच्या काळातही जिल्ह्यात मद्य तस्करी सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या बारा दिवसांत जिल्ह्यात ६६ ठिकाणी कारवाई करून साडे आठ लाख रुपयांचे मद्य जप्त केले. मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या ३० जणांना अटक केली असून, चार वाहने जप्त केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २५ … Read more

कोरोनाचा सोने च‍ांदीच्या किंमतींवर काय परिणाम? जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत.६ एप्रिल २०२० (सोमवार) रोजी २२ कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅमच्या जवळपास ४१,९७० रुपयांवर पोहोचले आहेत. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम सुमारे ४४,२७० रुपये आहे. त्याचबरोबर चांदीचे दर प्रति किलो सुमारे ४०,३७०रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. आज सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड चढ-उतार झाले आहेत. बिझनेस … Read more

आंबेडकर जयंती साजरी करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं ‘हे’ आवाहन

मुंबई । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. सरकारकडून लोकांना घरातच बसण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर जयंती आणि फुले जयंती साजरी करण्याबाबत एक महत्वाचं आवाहन राज्यातील जनतेला केला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदा आंबेडकर आणि फुले … Read more

१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू आहे. अजून सात दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे गेल्या १४ दिवसांपासून घरात असलेले नागरिक लॉकडाउन संपण्याची वाट बघत आहेत. मात्र, देशातील लॉकडाउन शिथिल करण्यात येणार असला, तरी महाराष्ट्रातील लॉकडाउन आणखी लांबणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच तसं स्पष्ट केलं आहे. “१५ एप्रिलपासून लॉकडाउन संपूर्णपणे … Read more