कोरोना आणि लॉकडाऊनचा किरकोळ विक्रेत्यांवर वाईट परिणाम होणार: रिपाेर्ट

नवी दिल्ली । मागील वर्षी कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर लावण्यात आलेल्या मोठ्या लॉकडाउन (Lockdown) नंतर हळूहळू सावरणारे किरकोळ विक्रेते पुन्हा एकदा देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे अस्वस्थ झाले आहेत, कारण अनेक राज्यात बाजार रात्री 9 वाजता बंद करण्यात येत आहे. काही संपूर्ण लॉकडाऊन आहे तर काही वीकएंड लॉकडाउन आहे. त्याच वेळी, रॉकीरेज एडलविस सिक्योरिटीज (Edelweiss Securities) … Read more

मद्यप्रेमींना दिलासा, आता घरपोच दारु मिळणार, पाहा काय आहेत नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दिवसेंदिवस राज्यातील कोरोना परिस्थिती भीषण होत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकार संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याच्या विचारात आहे. ८ दिवस कि १४ दिवसाचे लॉकडाऊन करायचे हा निर्णय आज होणार आहे. राज्यात सध्या कडक निर्बंध आणि कडक वीकेंड लॉकडाऊन लागू आहे. या वीकेंड लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टी बंद ठेवण्याचा निर्णय … Read more

राज्यात 100 टक्के लॉकडाऊन लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, विरोधीपक्षनेतेही सहमत

मुंबई : राज्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांची ऑनलाइन कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर सलग 10 दिवस किंवा 21 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. दरम्यान या बैठकीमध्ये कडक लॉकडाउन लागण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी … Read more

नाभिक समाजाने स्वतःच्या घरासमोर शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले

औरंगाबाद | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यातील सलून दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयास महाराष्ट्र नाभिक महामंडळाने तीव्र विरोध दर्शवून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. आंदोलनाचा एक भाग म्हणून शनिवारी शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. लोकशाही मार्गाने, जमावबंदी आदेशाचे पालन करून जिल्ह्यात विविध ठिकाणी समाजबांधवांनी आंदोलन केल्याची माहिती नाभिक … Read more

रेमडेसीव्हिरची निर्यात थांबवा, पुढील महिन्यात एक लाख डोसची गरज : राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुढील महिन्यात एक लाख रेमडेसीव्हिरची गरज भासणार आहे. हा आकडा वाढू शकतो. त्यामुळे रेमडेसीव्हिरची निर्यात तात्काळ थांबवा, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठकीत केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनीटोपेंनी मागणी केली. राज्यातील कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यासाठी … Read more

FY21 मध्ये देशातील इंधनाचा वापर 9.1 टक्क्यांनी कमी झाला, 1998-99 नंतर पहिल्यांदाच झाली घसरण

नवी दिल्ली । गेल्या आर्थिक वर्षात देशात इंधन वापरामध्ये (Fuel Consumption) 9.1 टक्क्यांची मोठी घसरण नोंदली गेली. दोन दशकांहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच इंधन वापर वार्षिक आधारावर घसरला आहे. मागील वर्षी कोरोनाव्हायरस साथीच्या (Coronavirus Pandemic) आजाराला आळा घालण्यासाठी जोरदार लॉकडाउन (Lockdown) लादण्यात आला होता. शुक्रवारी पेट्रोलियम मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाने (Petroleum Planning and Analysis … Read more

विकेंड लॉकडाऊनदरम्यान पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी कडक तपासणी

औरंगाबाद | शहरात सध्या शनिवार आणि रविवार या दोन दिवस कडक स्वरूपाचा लॉकडाऊन असल्याने प्रत्येक चौकात पोलिसांनी बॅरिकेट्स लावून नाकाबंदी सुरू केलेली आहे. प्रत्येक नागरिकांची कसून चौकशी केल्यानंतरच सोडण्यात येत आहे, तर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या टवाळखोरांवर पोलीस कारवाई करीत आहेत. गेल्या महिनाभरापासून शहरात शनिवारी आणि रविवारी कडक स्वरूपाचा लॉकडाऊन आहे. मात्र या लॉकडाऊनला न जुमानता … Read more

Lockdown Impact: महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीमुळे नवीन चित्रपटांचे प्रदर्शन थांबले

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे राज्यातील चित्रपट निर्मात्यांनी अनेक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. यात बर्‍याच मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्ट नुसार बॉक्स ऑफिसच्या एकूण कलेक्शन मधील 50 टक्के हिस्सा एकट्या महाराष्ट्रातून येतो. म्हणूनच, हे पाऊल इंडस्ट्रीला मोठा धक्का मानले जात आहे. कारण इतर शहरांमध्येही मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांमध्ये येणार्‍या लोकांच्या संख्येत … Read more

399 रुपयांमध्ये घ्या Covid-19 Care@Home, होम क्वारंटाईनमध्ये एक्सपर्ट घेतील तुमची काळजी

नवी दिल्ली । देशात पुन्हा एकदा कोरोनाची (corona) लाट पसरली आहे, गेल्या 24 तासांत एक लाख 45 हजार नवीन प्रकरणे समोर आली आहेत, तर ऍक्टिव्ह प्रकरणांची (Active cases) संख्याही 10 लाखांच्या पुढे गेली आहे. अनेक राज्यात नाईट कर्फ्यू तर काही राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. परिस्थिती अशी आहे की, मध्य प्रदेशात केवळ पाच दिवस ऑफिसेस … Read more

लॉकडानदरम्यान औरंगाबादेत कडकडीत बंद, वाहनधारकांची मात्र रस्त्यांवर वर्दळ

औरंगाबाद | राज्यात वाढलेला कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी प्रशासनाकडून विकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शहरात विकेंड लॉकडाऊनचे पालनदेखील केले जात आहे. आज नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी विकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संपूर्णपणे बंद पाळला. वाढत्या कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आता शहरवासीयदेखील सरसावल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील बहुतांश भागांत अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार … Read more