कोरोनाचे निदान झालेल्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचे निधन 

मुंबई । मुंबई महापालिकेच्या विशेष अभियांत्रिकी विभागाचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या माहीम येथील राहत्या घरी मध्यरात्री त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शिरीष दीक्षित यांचे कोरोना चाचणीचे अहवाल सकारात्मक आले होते. मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजले नसून त्यांचा मृतदेह सायन रुग्णलयात … Read more

मुंबईत आतापर्यंत १८७१ पोलिसांना कोरोनाची लागण, तर २१ जणांचा मृत्यू

मुंबई । मुंबईत आतापर्यंत १८७१ पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत ८५३ पोलिसांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर २१ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. याचबरोबर राज्य राखीव पोलीस दलाच्याही ८२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे अशीही माहिती समोर आली आहे. या पोलिसांना लॉकडाऊन काळात मुंबईत बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलं. सध्या … Read more

मुंबईतील लाॅकडाउन नियमावलीत बदल; BMC ने जारी केले ‘हे’ नवे निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रातील मुंबई शहरात झालेला आहे. येथे कोरोना-संक्रमित रुग्णांची संख्या ही ५० हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा ही १७०० वर पोहोचला आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी इथे लॉकडाऊन नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने लॉकडाऊनशी संबंधित काही सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्यामध्ये … Read more

लॉकडाऊनमध्ये मजुरांनी ‘पार्ले-जी’ बिस्किटांवर शमवली भूक; कंपनीनं विक्रीचा 82 वर्षांचा विक्रम मोडला!

मुंबई । लॉकडाऊनदरम्यान शहरातून गावाला जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी पार्ले-जी बिस्कीटं संजिवनी देणारी ठरली. लॉकडाऊन काळात आर्थिक संकटात सापडलेल्या मजुरांना परवडणाऱ्या पार्ले-जी बिस्किटांवरच आपली भूक शमवावी लागली. याचाच परिणाम म्हणून पार्ले-जीची एवढी विक्री झाली की मागील ८२ वर्षांचा विक्रम मोडला आहे. केवळ ५ रुपयांचा पार्ले-जी बिस्किटाचा पुडा शेकडो-हजारो किमी पायपीट करणाऱ्या मजुरांच्या भुकेला आधार होतं. काहींनी … Read more

आम्ही विना वेतन काम करु म्हणत तरुणीची शिक्षक भरतीची मागणी; रोहित पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले अनेक दिवस राज्यातील नोकरभरती प्रक्रिया लांबली आहे. निवडणूक आचारसंहिता, राष्ट्रपती राजवट, राज्यावर आलेले संकट आणि सध्या सुरु असणारे कोरोना संकट यामुळे साधारण फेब्रुवारी २०१९ पासून नोकरभरतीची प्रक्रिया या विविध कारणांनी लांबली आहे. महाविकास आघाडीच्या काळात महापोर्टल बंद करून सुधारित पद्धतीने महापोर्टल कडचा डाटा दुसऱ्या पोर्टल कडे हस्तांतरित करण्याचे काम सुरु … Read more

कोरोना रुग्णांवर आता घरच्या घरी उपचार; जाणून घ्या सरकारची नियमावली

मुंबई । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र यामध्ये लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर घरच्या घरी उपचार करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. याबाबत सरकारने एक नियमावलीही सादर केली आहे. राज्यात अनलॉक सुरु झाला आणि सरकारने अनेक नियम शिथिल केले. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता … Read more

सोलापुरात करोनाचे आणखी आठ बळी; ३३ नवे रूग्ण

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहरात आज आठ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला. तर ३३ नव्या रूग्णांची भर पडली. एकूण करोना बळींची संख्या आता ११५ झाली आहे. तर करोनाबाधितांची एकूण संख्या १ हजार २२१ वर पोहोचली आहे. तर जिल्हा ग्रामीणमध्ये आज दुपारपर्यंत दोन नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे तेथील एकूण रूग्णसंख्या ८२ झाली आहे. यात सहा मृतांचा … Read more

शिक्षक पती पत्नीच्या घरात चोरी; कराड तालुक्यात चोरट्यांचेही अनलाॅन १.० सुरु

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मलकापूर ता. कराड गावच्या हद्दीत बंद घराचे कुलूप कशानेतरी तोडून आत प्रवेश करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व सॅमसंग कंपनीचा टीव्ही व रोख रक्कम असा एकूण 21 हजार 500 रूपयाचा मुद्देमाल चोरणार्‍या दोन चोरट्याना कराड शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस … Read more

म्हणुन फडणवीसांनी मानले शिवसेनेचे आभार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात अभिनेता सोनू सूद याने स्थलांतरितांना घरी पोहोचविण्यासाठी गाड्यांची उपलब्धता करून दिली होती. यानंतर माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर त्याचे भरभरून कौतुक झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘सोनू सूदचा भाजपने प्यादा म्हणून वापर करून त्याला समाजसेवकाचा मुखवटा लावला’ असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला उत्तर … Read more

सोनू सूद भाजपचे आहेत असं जर शिवसेना म्हणत असेल तर आम्हाला आनंदच- फडणवीस

मुंबई । अभिनेता सोनू सूद याच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुरूच आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर मत मांडलं आहे. ‘सोनू सूद भाजपचे आहेत असं जर शिवसेना म्हणत असेल तर आम्हाला आनंदच आहे. असं असलं तरी सोनू सूद यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर एक … Read more