पुरूषोत्तम जाधवांचा शिवसेनेत प्रवेश, उदयनराजे भोसलेंच्या विरोधात लढवणार लोकसभा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजपाचे नेते पुरूषोत्तम जाधव यांनी आज मुंबई येथे मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. पुरुषोत्तम यांच्या घरवापसीमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांत जल्लोषाचे वातावरण असून सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला जाणार असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने २०१४ साली सातारची जागा आरपीआय पक्षाला दिल्याने पुरुषोत्तम जाधव यांनी सेनेला सोडचिठ्ठी दिली … Read more

कोणता झेंडा घेऊ हाती? अहमदनगरच्या नगरसेवकांसमोर पेच!

अहमदनगर | अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे महापालिकेच्या नगरसेवकांच्या मनात द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे़. कोणता झेंडा घेऊ हाती अशाच काहिशा चक्रात नगर मधील नगरसेवक अडकले आहेत. अहमदनगर शहरातील एक गठ्ठा मते कोणाच्या पदरात पडणार यावर नगरचा खासदार ठरणार असल्याने नगरसेवकांची मोट बांधण्याचे आव्हान स्थानिक नेत्यांसह उमेदवारांसमोर उभे ठाकले आहे. लोकसभेची सर्वाधिक मते नगर … Read more

पार्थ पवार या मतदार संघातून लोकसभा लढणार, राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबई येथील पत्रकार परिषदेत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यावेळी पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आल्याची माहीती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबत उलट सुलट चर्चा सुरु होत्या. … Read more

मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांच्या मातोश्री भेटीने जिल्ह्याच्या राजकीय वर्तूळात थरकाप

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई लोकसभेच्या आचारसंहिता चे बिगूल वाजताच राज्यभर राजकीय वातावरण तापायला लागले आहे. अमरावती मध्ये राष्ट्रवादीच्या नवनीत कौर राणा विरुद्ध शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्यात जोरदार लढत होणार असल्याचे बोलले जात आहे. अशात आनंदराव अडसूळ यांनी मुंबई येथे मेळघाटचे माजी आमदार राजकूमार पटेल यांच्यासह शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने जिल्ह्याच्या  राजकीय … Read more

श्रीनिवास पाटलांनी बांधला उदयनराजे भोसलेंना फेटा, दिड तास चर्चा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलानी कराड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची गुरुवारी कराड येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजे भोसले यांना फेटा बांधला. पाटील आणि उदयनराजेंच्या या भेटीमुळे जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधान आले असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीनिवास पाटील … Read more

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तृथीयपंथी उमेदवार रिंगणात

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे. शिवसेनेचे माजी नेते पुरुषोत्तम जाधव आणि माथाडी नेते नरेंन्द्र पाटील उदयनराजेंविरोधात लोकसभा लढवणार असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. आता यामध्ये आणखी एका उमेदवाराची भर पडली असून तृथीयपंथीयांचा उमेदवार म्हणुन प्रशांत वारेकर निवडणुक रिंगणात … Read more

साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुर्नविचार करा, रोहित पवारांची आजोबांना भावनिक साद

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपण आगामी लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले. यानंतर पवार यांच्या कार्यकर्त्यांत त्यांच्या या निर्णयाबद्दल नाराजीचा सूर व्यक्त होत होता. पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात होती. यापार्श्वभुमीवर पवार यांचे नातू आणि पुणे जि.प. सदस्य रोहित पवार यांनी “साहेब आपण … Read more

राहुल गांधी यांच्या त्या मिठी मारण्यावर काय म्हणाले नरेंद्र मोदी वाचा.

Rahul Gandhi hugging Narendra Modi

नवी दिल्ली | १६ व्या लोकसभेचा कार्यकाल आज संपत आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचे लोकसभेतील शेवटचे भाषण झाले. ‘गळ्यात पडणे’ आणि ‘गळ्याला गळा लावून भेटणे’ दोहोतला फरक मला लोकसभेत समजला अशाप्रकारे त्यांनी राहुल गांधी यांच्यावर खोचक टीका केली. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभेत मिठी मारली होती. या संदर्भाने त्यांनी ही … Read more

माढातून लोकसभा लढवण्याबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Untitled design

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आगामी लोकसभा निवडणूक लढवणार का? याबाबत राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. शरद पवार माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची कुजबुज कार्यकर्त्यांत सुरु असताना आता खुद्द पवार यांनीच याबाबत मोठे विधान केले आहे.  “मी माढा लोकसभा मतदार संघातून आगामी निवडणूक लढावी असा आग्रह … Read more

आंबेनळी अपघातातील मृतांना लोकसभेत श्रध्दांजली

Thumbnail 1533190252615

नवी दिल्ली | पोलादपूर जवळ आंबेनळी घाटात २८ जुलै रोजी घडलेल्या बस अपघातातील मृतांना आज लोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. संसदीय शिष्टाचारा नुसार आज सकाळी अकरा वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताना लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवला. त्यानंतर लोकसभेच्या सर्व सदस्यांनी मृतकांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी दोन मिनिटे उभे राहून मौन पाळले. दिनांक २८ … Read more