उदयनराजे भोसले यांच्या विरोधात तृथीयपंथी उमेदवार रिंगणात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे. शिवसेनेचे माजी नेते पुरुषोत्तम जाधव आणि माथाडी नेते नरेंन्द्र पाटील उदयनराजेंविरोधात लोकसभा लढवणार असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. आता यामध्ये आणखी एका उमेदवाराची भर पडली असून तृथीयपंथीयांचा उमेदवार म्हणुन प्रशांत वारेकर निवडणुक रिंगणात उतरणार आहेत.

‘कायद्याने तृतीयपंथीयांना स्वतंत्र नागरिकत्व बहाल केले आहे. आता विकासाची धोरणं बनविण्याच्या प्रक्रियेतही तृथीयपंथीयांचा सहभाग हवा’ असे म्हणुन प्रशांत वारेकर यांनी सातारा लोकसभा मतदार संघातूब निवडणुक लढणार असल्याचं बुधवारी जाहिर केलं. यावेळी ‘प्रस्थापित समाजानं आमचं अस्तित्व कायम नाकारलं. हाडामासाची माणसं असूनही केवळ आमच्या नैसर्गिक भावनांचा कौल ऐकून आमचं जगणं समाजाला नको होतं’ असं म्हणत वारेकर यांनी प्रस्थापितांवर टिका केली.

दरम्यान, ‘गेल्या काही दशकांतील आमची लढाई यशस्वी झाली आहे. आता आम्हाला कायद्यानेच स्वतंत्र अस्तित्व बहाल केले आहे. मात्र तरिही कायद्याने दिलेले हे अस्तित्वही नाकारण्याचे अनुभव आम्हाला आले. त्यामुळे आमच्या हक्कांसाठी निवडणूक रिंगणात उतरण्याचं मी ठरविलं आहे.’ असे मत वारेकर यांनी पत्रकारांशी बोलताना नोंदवले.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे – 

पवारांची जादू, उदयनराजे व शिवेंद्रराजे एक दिलाने निवडणूक लढवणार

नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजेंनी खाल्ली एकत्र मिसळ, उदयनराजेंना बसणार झणझणीत ठसका?

उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ

आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले

पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवेन – श्रीनिवास पाटील

Leave a Comment