माणगंगा नदीतून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या 6 जणांवर गुन्हा नोंद

Mhaswed Police

सातारा | म्हसवड येथील माणगंगा नदी पात्रातून सुरु असलेल्या चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांवर म्हसवड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एक पिकअप व पाऊण ब्रास वाळू असा सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सहा जणांविरोधात म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, म्हसवड येथील माणगंगा नदी पात्रातून चोरटी वाळू … Read more

अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाची जीभ कापून खून

Mhaswed Police

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पळशी (ता.माण) येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या भांडणात कातकरी कुटुंबातील एकाची जीभ कापून व कुदळीने हल्ला करत खून झाल्याची घटना घडली. कुशा चंदर जाधव (वय- 45) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, संशयित आरोपी बाळू गणपत जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यात कुशाची पत्नी मंगल जाधव … Read more

वडीलांचे छत्र हरवल्यानंतरही स्वराने गाठली गुणांची शंभरी..!

सातारा | दहिवडी (ता.माण) येथील रयत शिक्षण संस्थेचे परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालयात इयत्ता दहावीत विद्यार्थिनी कु.स्वरा दिपक टकले शिकत होती. बोर्ड परिक्षाच्या तोंडावर तिचे वडील दीपक टकले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला होता. अशा परिस्थितीतही कु. स्वराने मोठ्या धैर्याने स्वत:ला सावरत जिद्दीने अभ्यास करत पैकीच्या पैकी गुण मिळवले. स्वराने … Read more

वादळी वाऱ्यासह पाऊस : मायणीत भिंत कोसळल्याने 6 जखमी, गाड्याचेंही नुकसान

सातारा | सातारा जिल्ह्याला रविवारी वादळी वाऱ्यासह झोडपले. या पावसामुळे मायणी येथे बाजार पटांगण शेजारी खाजगी मालकाच्या बंद घराची भिंत कोसळून 6 जण जखमी झाले आहेत. तर मायणीतच बसस्थानकात एक मोठे झाड कोसळल्याने अनेक दुचाकीचे नुकसा झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजूनही काही दिवस सातारा जिल्ह्यात पावसा सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, खटाव, माण तालुक्याला वादळी … Read more

पावसाचा पहिला बळी : म्हैस सोडायला गेलेल्या 23 वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मान्सूनपूर्व पावसाचा माण तालुक्याला जोरदार तडाखा बसला. विजेच्या कडकडाटासह आलेल्या वादळी पावसात गोट्यातील म्हैस सोडायला गेलेल्या 23 वर्षीय युवकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. हिंगणी (ता. माण) येथील शुभम सरतापे (वय- 23) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या दुर्घटनेत म्हैशीचाही विजेचा शाॅक लागल्याने मृत्यू झाला. वादळी पावसाने माण तालुक्यातील पहिला … Read more

मटण खाऊ घालत नाही म्हणून वृध्द वडिलांचा कुऱ्हाडीने खून

दहिवडी | माण तालुक्यातील कासारवाडी येथे स्वतः च्या मुलाने वृध्द पित्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. मला मटण का खाऊ घालत नाही या कारणावरून चिडून जावून मुलाने खून केला. या घटनेने माण तालुक्यात खळबळ माजली आहे. पांडुरंग बाबुराव सस्ते (वय- 70 ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर नटराज सस्ते असे खून करणाऱ्या मुलाचे नाव … Read more

म्हसवड- मायणी रस्त्यावर कार व दुचाकीच्या धडकेत एकजण जागीच ठार

Accident

दहिवडी | म्हसवड-मायणी रस्त्यावर दिडवाघवाडी (ता. माण) येथे कार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला. तर एकजण जखमी झाला. हा अपघात सोमवारी सकाळी 7.30 सुमारास झाला. बापू बाबा पुकळे असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, सोमवारी सकाळच्या सुमारास बापू बाबा पुकळे हे दुचाकीने विरकरवाडीवरुन- पुकळेवाडीकडे निघाले … Read more

माणमध्ये पुन्हा वाळूचोरांचा सुळसुळाट सुरू : प्रशासन झोपेंच्या सोंगेत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके माण तालुक्यात काही दिवसांपूर्वी वाळूचोरीला आळा बसला होता. मात्र, मौजे पळशी हद्दीतील वाळूचोर पुन्हा एकदा जोमात आले असून छुप्या पद्धतीने वाळूउपसा करत आहेत. आयएएस प्रशिक्षण कार्यकाळात माणचे तहसीलदार पद भूषवताना वाळूमाफिया तसेच खडी क्रशर धारकांच्या मनात धडकी भरवणाऱ्या कारवाया करणारे रिचर्ड यानथन हे माणमधून जाताच माणमध्ये पुन्हा एकदा वाळूचोरीचा मुद्दा … Read more

16 वर्षीय अल्पवयीन मुलीला 32 वर्षाच्या युवकाने फूस लावून पळविले

Dahiwadi Police

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके थदाळे ( ता. माण ) येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्या प्रकरणी मुलीची आई व मामा यांनी आज संशयित विरोधात दहिवडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. थदाळे येथील शेतमजूर करणाऱ्या कुटुंबातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला त्यांच्या जवळच्या नातेवाईक असलेल्या 32 वर्षीय युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे … Read more

हर हर महादेवचा गजर : शिंगणापूरच्या मुंगी घाटात लाखो शिवभक्तांची मादियाळी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शिवभक्तांच्या ‘हर हर महादेव’च्या सोबत ‘म्हाद्या धाव’ चा गजर करत अवघा मुंगी घाट दुमदुमून गेला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्ष यात्रा भाविकांच्या अनुपस्थित पार पडली. मात्र, शंभू महादेवाच्या चरणी विक्रमी गर्दीने शिंगणापूर (ता. माण) परिसर गजबजून गेला. शिवभक्तांसह हजारो वाहनांच्या गर्दीने सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. चैत्र पंचमीपासून शिव-पार्वती हळदी, विवाह … Read more