महाबळेश्वर दवबिंदूने गोठले : थंडीचा कडाका वाढला, पारा 6 अंशावर

सातारा | पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका आज अचानक वाढला आहे. महाराष्ट्राचे मिनी काश्मिर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचा पारा तब्बल 6 अंशावर आल्याने महाबळेश्वरच्या अनेक भागात दवबिंदू गोठले आहेत. वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. वेण्णा लेक परिसरात ज्या ठिकाणी बोट उभ्या केल्या जातात त्या जेटीवर, गाड्यांच्या टपांवर मोठ्या प्रमाणात दवबिंदू … Read more

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे – मकरंद पाटील

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर येथील हिरडा विश्रामगृहात तीन तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आमदार मकरंद पाटील यांनी आज आढावा बैठक घेतली. यावेळी “पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना नदी, नाले, ओढे, रस्ते यांच्या दुरुस्तीसाठी काम एक फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. एक ही दिवस वाया न घालविता सर्वांनी प्रामाणिकपणे जबाबदारीने काम … Read more

महाबळेश्वर- तापोळा रोडवर स्वच्छता मोहिमेत काचेच्या बाटल्या सर्वाधिक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद व नेस्ले प्रणित हिलदारी अभियाना अंतर्गत 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त महाबळेश्वर शहरातील तापोळा रोडवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सदर स्वच्छता मोहिमेद्वारे तापोळा रोडवरील रस्त्याच्या आजूबाजूला पडलेला एकूण 45.245 किग्रॅ कचरा गोळा करण्यात आला. यात 18.44 किग्रॅ काचेच्या बाटल्या, 12.315 किग्रॅ पुठ्ठा, 6.805 किग्रॅ चिप्स, बिस्कीटची … Read more

महाबळेश्वर गारठले : तापमानाचा पारा शून्यावर

महाबळेश्वर प्रतिनिधी | सादिक सय्यद महाराष्ट्राच नंदनवन असलेल्या महाबळेश्वरला थंडीचा कडाका वाढलेला आहे. आज बुधवारी दि. 12 रोजी महाबळेश्वरचा पारा शुन्यावर गेल्याने वेण्णालेक व लिंगमळा येथे हिमकण पडायला सुरवात झाली आहे. महाबळेश्वरला वाढलेल्या थंडीमुळे कश्मिरच्या हिमकण दुलईचा अनुभव पर्यटक व नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/893682541326965 गतकाही दिवसापासून महाबळेश्वर शहर व परीसरात थंडीचा कडाका वाढला आहे. … Read more

Video : महाबळेश्वरच्या बाजारपेठेत रानगव्याची थाटात एंन्ट्री, वनविभाग सतर्क

महाबळेश्वर | सांगली शहरात गेल्या आठवड्यात आलेल्या रानगव्याच्या एंन्ट्रीनंतर आता आता थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे मंगळवारी मध्यरात्री दि. 3 रोजी 1 वाजण्याच्या सुमारास घुसला होता.  सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत मध्यरात्री जंगली रानगव्याने फेरफटका मारला. मध्यरात्री गव्याने बाजारपेठेत आल्याने त्याचे चित्रीकरणही कैद झाले आहे. महाबळेश्वर बाजारपेठेत गवा हा सुमारे तासभर परिसरात फिरत होता. … Read more

महाबळेश्वरमध्ये महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

सातारा | महाबळेश्वर शहरात असलेल्या गणेश हौंसिंग सोसायटीत थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. या दोन्ही जखमी कर्मचाऱ्यांवर वाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संशयितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. आमशी व विवर, महाबळेश्वर येथे वास्तव्याला असणारे महावितरणचे दोन कर्मचारी … Read more

महाबळेश्वरमध्ये पर्यटक युवतीचा मध्यरात्री विनयभंग

Mhableshwe Police

महाबळेश्वर | महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड परिसरातील एका खाजगी बंगल्यात पुणे येथून आलेल्या पर्यटक कुटुंबियां समवेत लहान मुलाचे संगोपनाचे काम करणाऱ्या एका मदतनीस युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. बंगल्यातील केअर टेकरने विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून विजय कुमार प्रजापती (वय- 26) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

शेतकरी अडचणीत : महाबळेश्वर, जावळीत पावसाच्या माऱ्याने स्ट्राॅबेरी शेताच्या बांधावर फेकली

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. या पावसाच्या माऱ्यामुळे सडलेली आणि नरम पडलेली स्ट्रॉबेरी अक्षरशः बांधावर फेकून द्यावी लागली आहे. महाबळेश्वरच्या शिवारात सध्या स्ट्राॅबेरीचा सिझन चालू आहे, मात्र अवकाळीच्या तडाख्याने स्ट्राॅबेरी फेकून देण्याची वेळ उत्पादकांवर आलेली आहे. महाबळेश्वरच्या शिवारात फिरताना सध्या स्ट्रॉबेरीचा खच पडलेला … Read more

उद्घाटन कार्यक्रम : महाबळेश्वरला सत्ताधारी- विरोधकांच्या वादात पोलिसाची एंन्ट्री कुणामुळे?

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर नगरपरिषदेने बी. ओ. टी तत्वावर बांधलेले भारतरत्न ए.पी. जे अब्दुल कलाम व्यापारी संकुल या वस्तूचे उद्घाटन आज 9/12/21 रोजी करण्याचे योजले असताना पालिकेच्या 13 नगरसेवकांनी हे उद्घाटन उधळून लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी पालिकेला त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले होते. त्या घोष्टींची पूर्तता करून सदरचा अहवाल … Read more

पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवणाऱ्या पतीला जन्मठेप

महाबळेश्वर | घरगुती कारणातून चिडून जावून पत्नीला पेटवून देवून तिचा खून केल्याप्रकरणी पती राजेश उर्फ राजू गणपत शिंदे (वय- 30 रा. खांबील पोकळे ता . महाबळेश्वर) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मंगला धोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायाधिशांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपीला जन्मठेप व 5 हजार रुपये दंड तो न भरल्यास 6 … Read more