निवडणुकीनंतरच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीवर जानकर संतापले, म्हणाले..

मुंबई । राज्यातल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक होऊ घातल्या आहेत. अशावेळी ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी विरोध केला आहे. गावच्या प्रस्थापितांच्या हातात रिमोट जाईल, आणि घोडेबाजारही थांबणार नाही, अशा शब्दात जानकरांनी संताप व्यक्त केला. (Gram Panchayat Election Sarpanch Lottery after polls) … Read more

‘मी फडणवीसांवर नाराज असलो तरी…’; ‘पवार’ भेटीनंतर जानकरांची खदखद

बारामती । राज्यातील महायुतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. ‘माझं आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भांडण आहे. पण मी त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे मी भाजपसोबतच राहणार,’ असल्याचं जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. जानकर आज बारामतीत एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. … Read more

आणखी एक पक्ष महायुतीकडून महाविकास आघाडीच्या वाटेवर? जानकारांनी घेतली पवारांची भेट

मुंबई । राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा झालेला दारूण पराभव आणि महाविकास आघाडीला मिळालेलं घवघवीत यश यामुळे भाजपच्या नेतृत्वातील महायुतीत खळबळ उडाली आहे. त्यामुळे महायुतीत अडगळीत पडलेल्या मित्र पक्षांनी नवी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय … Read more

गुराखी ते कॅबिनेट मंत्री! महादेव जानकरांची थक्क करणारी कहाणी

Untitled design

व्यक्तीविषेश | संपत मोरे गेल्या सालच्या मे महिन्यात मी माण तालुक्यात एका स्टोरीच्या निमित्ताने तालुक्यात फिरत असताना मी पळसावडे नावाच्या गावात गेलो, तिथं गेल्यावर गावात राष्ट्रीय समाज पक्षाचा बोर्ड दिसला. मी चौकशी केली तर मला समजलं हे गाव महादेव जानकर यांचं आहे. ‘जानकर साहेबांनी आमच्या सांगली लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवली होती. तेव्हा त्यांचं भाषण मी … Read more

Breaking | महादेव जानकर ‘या’ कारणामुळे पडणार महायुतीतून बाहेर?

विशेष प्रतिनिधी | दौंड व जिंतूर मतदार संघ राष्ट्रीय समाज पक्षाला सोडण्यात आला होता. मात्र या मतदार संघातील उमेदवारांना भाजपचे एबी फोर्म दिले गेल्याने नाराज असलेले महादेव जानकर यांनी मुंबई येथील पक्ष कार्यालयात प्रमुख पदाधिकारर्‍यांची तातडीची बैठक बोलावली होती. सदर बैठकीत महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. मित्रपक्षांच्या जागांवर आपले उमेदवार … Read more

माणची जागा आमची शान, फलटणची जागा आमची जान आहे – महादेव जानकर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी रासप विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेबरोबर राहणार असून फलटण उत्तर कोरेगाव मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही माणची जागा आमची शान आहे. फलटणची जागा आमची जान आहे ही निवडणूक आमच्या प्रतिष्ठेची आहे असे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केले येथील महाराजा मंगल कार्यालयात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे … Read more

सरकार कसं असतं हे माहितीच नव्हतं – मंत्री महादेव जानकर

सोलापूर प्रतिनिधी |शासनाने इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले. त्याचबरोबर सरकारने धनगर समाज बांधवांना ही महामंडळाच्या माध्यमातून हजार कोटीं रुपये उपल्ब्ध करुन दिले. असं म्हणत ‘सरकार कसं असतं हे आम्हालाच माहिती नव्हतं’ त्यामुळे धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटला नसल्याचे राज्याचे दुग्धविकास आणि पशुपालन मंत्री महादेव जानकर यांनी कबुली दिली. मंगळवेढा येथे … Read more

सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार ? सामनातून शिवसेनेची जाणकारांवर टीका

 टीम, HELLO महाराष्ट्र |सामनातील अग्रलेखात शिवसेनेने महादेव जानकारांनी घेतलेल्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यांवर चाललेच तोंडसुख घेतले आहे. अग्रलेखात शिवसेनेने रासपाच्या मेळाव्यावर तसेच संजय दत्त यांच्या कथित रासपा प्रवेशावर भाष्य केलं आहे. संजय दत्त जानकरांच्या पक्षात प्रवेश करणार असतील तर शाहरुख खान, अक्षय कुमार हे रामदास आठवले यांच्या पक्षात प्रवेश करतील आणि सलमान खान वैगेरे मंडळी आंबेडकर-ओवेसींच्या … Read more

बचत गटांना जनावरांसाठी प्राधान्याने चारा डेपो देण्यात येईल – पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर

Mahadev Jankar

लातूर । सतिश शिंदे राज्यात बहुतांश तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या भागातील जनावरांसाठी लागणारा चारा डेपो महिला बचत गटांना प्राधान्याने चारा डेपो देण्यात येतील, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केली. लोदगा ता.औसा येथील पशु सर्वरोग निदान शिबीर व पशुसंवर्धन दवाखाना उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास कृषिमुल्य … Read more

राज्यामध्ये लवकरच ‘मुख्यमंत्री पशुधन योजना’ सुरु करणार- पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर

Mahadev Jankar

नवी दिल्ली | सतिश शिंदे राज्यातील पशुधनात वाढ करण्यासाठी, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी ‘मुख्यमंत्री पशुधन योजना’ महाराष्ट्रात लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी येथे ‘ॲग्रो वर्ल्ड – २०१८’ परिषदेत दिली. येथील पुसा परिसरातील एनएएससी कॉम्पेल्कस मध्ये भारतीय कृषी … Read more