पूर्व विदर्भातील तेली समाजाची नाराजी ‘भाजपा’ला भोवणार ?

राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (कामठी), तुमसरचे आमदार चरण वाघमारे आणि माजी खासदार सुरेश वाघमारे या पूर्व विदर्भात बहुसंख्येने असलेल्या तेली समाजाच्या नेत्यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने विधानसभा निवडणुकीत तेली समाजाच्या नाराजीला भाजपला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी मधील दत्तात्रय भरणे विरोधक गटाचा हर्षवर्धन पाटलांना पाठिंबा

इंदापूर विधानसभा मतदार संघामध्ये विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवारीला विरोध केलेल्या गटाने थेट भाजप उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनाच पाठिंबा जाहीर केला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांचा पाठिंबा देणाऱ्यांत समावेश असल्याने राष्ट्रवादीसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या पाच वर्षांत जगदाळे यांनीच हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातील तालुका खरेदी विक्री संघासह कृषी उत्पन्न बाजार समिती राष्ट्रवादीकडे खेचून आणली होती.

बीड मधील लढतींचे चित्र स्पष्ट, महायुती मधील गेवराईची बंडखोरी वगळता ‘बंड थंड’

गेवराई वगळता बीड जिल्ह्यात ‘महायुती’मधील सर्व बंडखोर नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे बीड मधील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरांनी आपली तलवार म्यान केल्यामुळे पाच मतदार संघात दुरंगी लढत होणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. तर गेवराई मतदारसंघात शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. या मतदारसंघात भाजप – राष्ट्रवादी आणि अपक्ष अशी तिरंगी लढत होईल

कराड मध्ये पृथ्वीराज चव्हाणांना धक्का! १४ नगरसेवकांनी दिला भाजपला पाठींबा

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. कराड नगरपालिकेच्या १४ नगरसेवकांनी पृथ्वीराज चव्हाणांची साथ सोडत भाजप उमेदवार अतुल भोसले यांना पाठिंबा दिला आहे. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

संग्राम देशमुखांची निवडणुकीच्या रिंगणातून पुन्हा एकदा माघार, राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह

सांगली प्रतिनिधी। जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीतून दुसऱ्यांदा माघार घेतल्यामुळे कार्यकर्ते कमालीचे निराश व संतप्त झाले आहेत. सलग दुसऱ्यांदा त्यांनी तयारी करुन रिंगणातून माघार घेतल्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे सन २०२४ पर्यंत कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेवण्याचे आव्हान ते कसे पेलणार? यावरच त्यांचे पुढील राजकारण … Read more

महाराष्ट्रात शत्रुघ्न सिन्हा करणार विरोधकांना ‘खामोश’

एकेकाळी भाजपची स्टार शॉटगन असणारे शत्रुघ्न सिन्हा आता काँग्रेसच्या बाजूने विरोधकांना खामोश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुक प्रचाराच्या राजकीय शिमग्यात विरोधाकांना प्रचारात नामोहरम करण्यासाठी शत्रुघ्न सिन्हांच्या रूपाने काँग्रेसला त्याच्यासाठी नवा चेहरा मिळाला आहे.

पुण्यात दसऱ्यानंतर धडाडणार ‘ठाकरी’ तोफा; उद्धव, राज यांच्या एकाच दिवशी सभा

राज ठाकरे यांची ९ ऑक्टोबरला पुण्यात टिळक चौकात (अलका चौक) तर त्याच वेळी उद्धव ठाकरे यांची पिंपरीत संध्याकाळी ७ वाजता सभा होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं असताना हे दोन ठाकरे बंधू आपल्या सभांमधून कुणाला लक्ष्य करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

प्रणिती शिंदे यांचे ‘रुपाभवानी’च्या चरणी विजयासाठी साकडे

सोलापूर प्रतिनिधी । राज्यात सध्या नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने देवीची उपासना करत आहे. काँग्रेसच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांनी तब्बल ५ किलोमीटर चालत जाऊन रुपभावानी मातेचे दर्शन घेतलं. रविवारी पहाटे पाच वाजताच आमदार प्रणिती शिंदे आपल्या सातरस्ता येथील निवासस्थानापासून तुळजापूर रस्त्यावरील रुपभवानी मंदिरात जाण्यासाठी कार्यकर्त्यांसह बाहेर पडल्या. … Read more

परभणी जिल्ह्यात ‘युती’ पाठोपाठ ‘आघाडी’ला देखील बंडखोरीची लागण

परभणी प्रतिनिधी। परभणी जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि भाजपा ‘युती’ला बंडखोरीचा मोठा फटका बसला आहे. युतीच्या बंडखोरांनी बंडाचा झेंडा उगारल्यानंतर आता याच बंडखोरीची लागण ‘आघाडी’तील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला देखील लागलेली दिसत आहे. परभणी विधानसभेसाठी रविराज देशमुख यांचे नाव घोषित झाल्यानंतर, काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या सुरेश नागरे यांनी आता बंडाचा पवित्रा घेतला आहे. मागील अनेक दिवसांपासून परभणी … Read more

‘हा’ आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार

मुंबई प्रतिनिधी। विधानसभा निवडणूक अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. आता पर्यंत महाराष्ट्रातील सर्वच उमेदवारांचे निवडणूक उमेदवारी अर्ज भरून झाले आहेत. दरम्यान, या उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांची संपत्तीची माहिती आता समोर आली आहे. त्यातुन महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. … Read more