१५ वर्षात पवारांनी महाराष्ट्राला काय दिले? – अमित शहा

‘पंधरा वर्षात केंद्रात आणि राज्यात ‘आघाडी’ची सत्ता असताना त्यांनी महाराष्ट्राला काय दिले?’ असा सवाल गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांना कोल्हापूरातील सभेत विचारला आहे. ”चार लाख करोड रुपयांची मदत केवळ पाच वर्षात भाजप सरकारने महाराष्ट्रला दिल्या”चे त्यांनी यावेळी नमूद केलं.

निवडणूक फक्त आठ दिवसांवर, उमेदवारांच्या पायांना भिंगरी!

आठ दिवसांवर येऊन ठेपलेली विधानसभा निवडणूक, गतिमान प्रचार यंत्रणा आणि उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधून वाड्या वस्तीवर राबवलेला प्रचार, हे सर्व चित्र सध्या संपूर्ण शाहूवाडी तालुक्यातील वाडी वस्तीवर पाहायला मिळत आहे. जोरदार प्रचार, जोडण्या, वाटाघाटी, फोडाफोडी जोडाजोडी अशा घटना ग्रामीण भागात गतिमान होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या रात्री जागु लागल्या आहेत. त्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी आता ‘रात्रीस खेळ चाले..’ ही राजकीय जोडण्यांची मालिका पुढील आठ दिवस सुरू राहील.

भाजप उमेदवाराचा गृहराज्यमंत्र्याना घरचा आहेर

अकोला जिल्ह्याताल मुर्तिजापूरचे भाजप आमदार आणि उमेदवार हरिश पिंपळे यांचं एक भाषण सध्या चांगलंच गाजत आहे. तसंही आमदार पिंपळेंची भाषा वऱ्हाडी अन बोलणंही अघळपघळ. त्यामुळे पिंगळे यांचं भाषण म्हणजे नेहमी चर्चेचा विषय. मात्र, मुर्तिजापुरात आपल्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी पिंगळे यांनी केलेलं ताज भाषण जिल्हा भाजपातील गटबाजी कोणत्या थराला गेली आहे याचेच संकेत देणारे आहे.

कहर!! आचारसंहिता भंगाच्या १ हजार १९२ तक्रारी

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणुकांची आचारसंहिता लागू आहे. आदर्श आचारसंहितेचा पालन व्हावं यासाठी आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी सह्जरित्या करण्यासाठी ‘सी व्हिजील’ हे अँप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आलं आहे. या अँपवर गुरुवारपर्यंत विविध प्रकारच्या १ हजार १९२ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

‘काँग्रेस हे भुरटे चोर तर भाजपवाले डाकू आहेत’- प्रकाश आंबेडकर

“काँग्रेस म्हणजे भुरटे चोर होते, तर भाजपवाले डाकू आहेत”, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. आंबेडकर चंद्रपूरमधील बल्लारपुरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलत होते. “आम्हाला भाजपची बी टीम म्हणणारे काँग्रेस अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याशी चर्चेची वाट बघत होते,” असा धक्कादायक खुलासाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.

मुख्यमंत्र्यांच्या ‘या’आदेशाने राधाकृष्ण विखे पाटील कात्रीत

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आता शिर्डी मतदारसंघातूनच भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणुकीत उतरले आहेत. अहमदनगरमधील कोपरगावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी, ‘भाचीला मोठ्या मताधिक्यान निवडून आणा’, असा सूचना वजा आदेश मुख्यमंत्र्यांनी विखे पाटलांना दिला.

जेव्हा उदयनराजे आणि अतुल भोसलेंना पण काढावा लागतो वडापावावर दिवस

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रचाराला आता रंगत चढली आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उदयनराजेसुद्धा तयारीत असताना प्रचाराच्या घाई-गडबडीत दोन नेत्यांनी वडापाव खात आपली भूक भागवून घेतली.

वाढीव वीज बिला विरोधात गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या इशारा

संपूर्ण ठाण्यातील महावितरणच्या ग्राहकांना वाढीव बिले येत आहेत. अचानक वाढलेल्या या बिलांच्या विरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत यावर तोडगा काढला गेला नाही, तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा दिलाय. या अगोदरही अनेक वेळा या कंपनी विरोधात आंदोलन केली होती.

नारायण राणेंना पक्ष विलीनीकरणाचा मुहूर्त मिळाला?

गेली अनेक दिवस भाजपात जाण्यासाठी नारायण राणे वाट पाहत आहेत. अखेर आपल्या स्वाभिमानी पक्षाचे विलीनीकरण करण्यासाठी राणेंना मुहूर्त मिळाला आहे. लवकरच राणेंच्या पक्षाचे भाजपात विलीनीकरण होणार आहे. या बहुप्रतीक्षित विलनीकरणाचे संकेत सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी दिले.

‘टेंभूची पुर्ती यामुळे माझा विजय नक्की’ – आमदार अनिल बाबर

 ‘विरोधक तसेच त्यांच्या हस्तकांनी टीका करताना किमान एकमताने तरी करावी. गेल्या पाच वर्षांत मी केलेली विकासकामे, सोबतच टेंभूची पुर्ती यामुळे माझा विजय नक्की आहे हे माहित असल्यामुळेच विरोधक आणि त्यांचे हस्तक एकाच मुद्दयावर वेगवेगळी मते मांडत आहेत.’ असे सांगत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी टेंभू योजनेचे श्रेय घेत विरोधकांवर सडकून टीका केली. बाबर हिंगणगादे येथे आयोजित प्रचारसभेमध्ये ते बोलत होते.