शरद पवारांचा कोकण दौरा अचानक रद्द! सत्तास्थापनेसाठीच्या हालचाली वाढल्या

राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नसताना जाणता राजा म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांच्या भूमिकेकडे शेवटपर्यंत सर्वांचेच लक्ष लागून राहिलेलं पहायला मिळतंय. कराड दौऱ्यावर आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यानंतर कोकण दौऱ्यावर निघालेल्या शरद पवार यांनी आपला कोकण दौरा अचानक रद्द केला असून कोकणातील शेतकरी भात काढणीत व्यस्त असल्यामुळे आपण हा निर्णय घेतला असल्याचं पवार म्हणाले.

देशात काँग्रेसची अवस्था चाय पेक्षा किटली गरम असल्या सारखी – लक्ष्मण सौदी

‘राष्ट्रवादी व काँग्रेसला उमेदवार न मिळाल्यानेच त्यांना इतरांची मदत घ्यावी लागली. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीची चहापेक्षा किटली गरम झाली असल्या सारखी आहे. अशी टीका कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांनी सांगली येथील भाजपच्या प्रचार सभेत बोलताना केली. दरम्यान सौदी यांनी सांगलीतील व्यापाऱ्यांशी सुद्धा संवाद साधला.

बंडखोर भाजप आमदाराने काढली आक्रोश रॅली, तिकीट वाटपात दलाली झाल्याचा केला आरोप

उदगीर विधानसभा मतदारसंघातून तब्बल दोन वेळा निवडून आलेल्या आमदार भालेराव यांचा पत्ता भाजपनं कापल्यानंतर चिडून बंडखोरी करत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तसेच आपले अस्तित्व नमूद करण्यासाठी पहिल्यांदाच भालेरावांनी उदगीर शहरात आक्रोश रॅली काढत आपलं आव्हान कायम असल्याचं सांगितलं.

महाराष्ट्रात शत्रुघ्न सिन्हा करणार विरोधकांना ‘खामोश’

एकेकाळी भाजपची स्टार शॉटगन असणारे शत्रुघ्न सिन्हा आता काँग्रेसच्या बाजूने विरोधकांना खामोश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुक प्रचाराच्या राजकीय शिमग्यात विरोधाकांना प्रचारात नामोहरम करण्यासाठी शत्रुघ्न सिन्हांच्या रूपाने काँग्रेसला त्याच्यासाठी नवा चेहरा मिळाला आहे.

टी.पी मुंडे यांचा भाजपमध्ये प्रवेश, धनंजय मुंडे यांना मोठा धक्का

काँगेसचे प्रदेश सरचिटणीस टी. पी मुंडेनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने धनंजय मुंडे यांना ही निवडणूक अवघड जाणार असल्याचे चित्र दिसत आहे

खडसेंचे समर्थक असल्यामुळे भाजप आमदाराला तिकीट नाकारलं..!!

नंदुरबार प्रतिनिधी । विधानसभा निवडणूक जस जश्या जवळ येत आहेत तसे नेत्यांचे राजकीय पक्षांमधील इनकमिंग आणि आऊटगोईंग जोरदार सुरु झाल्याचे दिसत आहे. भाजपाकडून उमेदवारांच्या दोन याद्या आतापर्यंत जाहीर झाल्या आहेत. जाहीर झालेल्या यादीत आपले नाव नसल्यामुळे बहुतेकांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे शहादा विधानसभेचे विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी या गोष्टीला अपवाद राहिले नाही … Read more

अहेरीत भाजपकडून पुन्हा अंबरीश आत्रामच; ग्रामसभेचा उमेदवार निर्णायक भूमिका बजावणार

गडचिरोली प्रतिनिधी। भाजपाच्या पहिल्याच उमेदवार यादीत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्राची उमेदवारी दोन्ही विद्यमान आमदारांना जाहिर करण्यात आली होती. मात्र अहेरी विधानसभा क्षेत्राचा या यादीत समावेश नव्हता. यामुळे अहिरीचे विद्यमान आमदार राजे अम्ब्रीश आत्राम यांचा पत्ता कट होणार की काय अशी अशी शंका आत्राम समर्थकांना वाटत होती. शेवटी भाजपाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत … Read more

निवडणूक आयोगाने लोकप्रिय ‘लुडो’ चिन्हाचा समावेश करत विधानसभेसाठी 197 चिन्ह दिली

मुंबई प्रतिनिधी। निवडणुकांचा प्रचार खऱ्या अर्थाने निवडणुकीतील चिन्हांमुळे रंगात येतो. राजकीय पक्षाच्या उमेदवारांची चिन्हे आधीच निश्‍चित असतात. पण, अपक्ष उमेदवारांना अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी चिन्हाचे वाटप होते. त्यामुळे त्यांना कमीत कमी कालावधीत आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे कठीण काम यशस्वीपणे करावे लागते. त्यामुळे रोजच्या वापरातील आणखी ओळखीच्या चिन्हाला अपक्ष उमेदवारांची मागणी असते. त्यामुळे यंदा निवडणूक आयोगाने … Read more

परभणी जिल्ह्यात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात महायुतीच्या मित्रपक्षांनी केली घुसखोरी

परभणी प्रतिनिधी| गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेच्या जागेसाठी राजकीय पक्षांकडून तिकीट वाटपामध्ये अनपेक्षित उलटापालट झाली असून जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये राजकीय बंडखोरांच्या ‘इंट्री’मुळे बहुरंगी निवडणूक लढती होणार आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात यावेळी महायुतीच्या मित्रपक्षांनी घुसखोरी केल्याने सेनेचे पाथरी आणि जिंतूर बालेकिल्ले मात्र लढती पूर्वीच ढासळले आहेत. महायुतीच्या जागा वाटपामुळे शिवसेनेची स्वतःच्या घरात चांगलीच गोची झाली आहे. … Read more

‘माझी हक्काची जागा मला मिळाली, हे कोणाचे उपकार नाहीत’- विजय शिवतारे

पुणे प्रतिनिधी। ‘महायुतीच्या जागा वाटपामध्ये काही सूत्र ठरले होते. त्यानुसार, माझी हक्काची जागा मला मिळाली. महायुतीमधील पक्षाच्या विद्यमान आमदारांच्या जागा त्याच पक्षाकडे राहतील, हे निश्चित होते. त्यामुळे आज जागा वाटप झाल्यानंतर पुरंदरचा विद्यमान आमदार असल्याने ही माझी हक्काची जागा मला मिळाली. ती देऊन कोणी माझ्यावर उपकार केलेले नाहीत’, असा टोला शिवसेनेचे मंत्री आमदार विजय शिवतारे … Read more