मॉब लिंचिंग महाराष्ट्रात सहन करणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । गेल्या ५ वर्षांपासून देशात ठिकठिकाणी मॉब लिंचिंग झालंय. त्यात आता आपल्याला जायचं नाही. पालघरमध्ये घडलेल्या घटनेबद्दल सरकार काय करतंय हे मला सांगायचंय मॉब लिंचिंग प्रकार अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्रात असा प्रकार अजिबात सहन करणार नाही. मी वचन देतोय. पालघर घटनेला जबाबदार जे गुन्हेगार असतील त्यांनी हत्या केली आहे. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. … Read more

भाषण नको, रेशन हवे, वेतन हवे! कामगार संघटना पाळणार केंद्र सरकार विरोधात देशव्यापी ‘निषेध दिवस’

नवी दिल्ली । कोरोनाच्या संकटानं केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन लागू केला. लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका मजूर-कामगार वर्गाला बसला आहे. उद्योगधंदे बंद असल्यानं उदरनिर्वाहाचं मोठं संकट त्यांच्या पुढं उभं आहे. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेले अनेक कामगार शहरांमध्ये अडकून पडले आहेत. तर सरकारी यंत्रणेतील इतर कर्मचाऱ्यांवर कोरोनामुळे ताण वाढला आहे. असं असताना, केंद्र सरकारनं कामगार, कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी … Read more

VIP संस्कृती! लेकीला घरी आणण्यासाठी लॉकडाऊनमध्ये भाजप आमदाराचा कारने २ हजार किमीचा प्रवास

नवी दिल्ली । लॉकडाऊनमध्ये सर्व वाहतूक बंद असल्याचा फटका लाखो स्थलांतरित मजुरांना बसला. अनेक मजूर कल्पना येण्याच्या आत देशातील विविध शहरांमध्ये उपाशीपोटी राहण्यास मजबूर झाले. यांतील बहुसंख्य लाखो मजूर बिहार आणि उत्तरप्रदेश मधील आहेत. या मजुरांनी वारंवार विनवण्या करूनही दोन्ही राज्यांच्या सरकारांनी लॉकडाऊन आणि कोरोनासंसर्गाच्या धोक्यामुळं त्यांना घरी आणण्यास असमर्थता दर्शवली. दरम्यान, अशा सर्व परिस्थितीत … Read more

लॉकडाउन कायम मात्र आजपासून ‘या’ सेवा सुरु होणार

नवी दिल्ली । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने सर्व राज्यांचे अर्थकारण ठप्प पडलं आहे. याचा आर्थिक फटका राज्यांना बसत आहेत. म्हणूनच लॉकडाउनमुळे थांबवेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारने काही गोष्टींना लॉकडाउनमधून सवलत दिली आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या सुधारित निर्देशानुसार आजपासून नागरिकांच्या गरजांचा विचार करून काही अत्यावश्यक व गरजेच्या सेवांसाठी सूट देण्यात आली … Read more

अजित पवार ऍक्शनमध्ये! पुणे, पिंपरी-चिंचवड ८ दिवस पूर्ण बंदचे दिले आदेश

पुणे । पुण्यात वाढत जाणारे कोरोना बाधित रुग्ण व मृत्यू दर पहाता पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढता कामा नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे दिले. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ … Read more

वर्तमानपत्रांना लॉकडाऊनमधून सूट मात्र घरोघरी वितरणास मनाई

मुंबई । राज्यात कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्यात आली असून नव्या सुधारणेनुसार, २० एप्रिल २०२० पासून मुद्रित माध्यमांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. मात्र वृत्तपत्रांचे घरोघर वितरण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सर्व विभागाच्या आयुक्तालयातील आयुक्तांना तसेच संचालनालयातील संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्यास नव्या सुधारणेनुसार सांगण्यात आले आहे. कोरोनाचा … Read more

बांधकाम मजुरांना राज्य सरकारचा दिलासा; २ हजार रुपयांची मदत जाहीर

मुंबई । कोरोनाच्या उद्रेकामुळं ३ मे पर्यंत देशभरात लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. अशात या लॉकडाउनचे सर्वाधिक चटके मजूर वर्गाला बसत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील १२ लाख बांधकाम मजुरांना प्रत्येकी २ हजारांची मदत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. सध्या राज्यात सगळ्या प्रकारची बांधकामं बंद आहेत. त्यामुळे या मजुरांवर बेकारीचं संकट ओढवलं असून त्यांना आर्थिक अडचण … Read more

खबरदार! मुंबई-पुण्यावरून येणाऱ्यांना न सांगता आसरा दिला तर.. परभणी प्रशासनाचा कारवाईचा इशारा

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे लॉकडाऊन काळात चोरून लपून पुणे,मुंबई, औरंगाबाद येणारे व्यक्ती ,नातेवाईक व इतर लोकांना आश्रय देत माहिती लपवून ठेवली असेल तर अशा परभणी जिल्हातील लोकांविरूध्द आपती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतीबंधक अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या चोरुन लपून येणाऱ्या व्यक्ती बद्दल प्रशासनाला माहीती देणे शहाणपणाचे ठरणार आहे. दोन दिवसापूर्वी … Read more

टोल वसुली पुन्हा सुरु होणार; वाहतूक संघटना नाराज

नवी दिल्ली । देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर केंद्र सरकारने २५ मार्चपासून टोल वसुली अनिश्चित काळासाठी बंद केली होती, जेणेकरुन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा. पण ही वसुली आता पुन्हा सुरू होणार आहे. मात्र आता तोल वसुली २० एप्रिलपासूनच सुरू करणार असल्याचं केंद्रानं सांगितलं आहे. एनएचएआय म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यांवर टोल वसुली सुरू केली जाणार … Read more

पालकांना दिलासा! शालेय ‘फी’ची सक्ती नको, शिक्षण विभागाचे आदेश

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात पालकवर्गाला मोठा दिलासा देणारा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. कोणत्याही शैक्षणिक संस्थेने पालकांवर नवीन शैक्षणिक वर्ष किंवा मागील शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरण्याची सक्ती करू नये असे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. या आधी यासबंधी परिपत्रक काढण्यात आले असले तरीही काही शाळा विद्यार्थी व पालकांवर फी भरण्यासाठी … Read more