केंद्रीय मंत्री संजय धोत्रेंची सभा रणजित पाटील समर्थकांनी उधळली

अकोला प्रतिनिधी । अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर विधानसभेचे उमेदवार हरीष पिंपळे यांनी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. याचाच जाब केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांना रणजित पाटील समर्थकांनी त्यांना विचारला. यातून एकच गोंधळ उडवत पाटील समर्थकांनी अखेर धोत्रेंची सभा उधळली. पिंजर इथं आयोजित सभेत हा सर्वप्रकार घडला.

निवडणूक निशाणी असलेल्या ‘हेलिकॉप्टर’मधूनच अपक्ष उमेदवाराने केला प्रचाराचा समारोप

ज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता. परभणीत सर्वच उमेदवारांनी मैदानात उतरत रॅली काढत चारही विधानसभा मतदार संघात मोठं शक्तिप्रदर्शन केल. त्यामध्ये जास्तीत जास्त मतदारांना आपल्याकड आकर्षित करण्यासाठी, उमेदवारांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या. गंगाखेड विधानसभेतील संतोष मुरकुटे या अपक्ष उमेदवाराने तर, आपली निवडणूक निशाणी असलेल्या हेलिकॉप्टर मधूनच, प्रचार करत आजच्या प्रचाराचा समारोप केला.

परभणी जिल्ह्यात प्रचार तोफा थंडावल्या…

विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया २१ ऑक्टोबर रोजी राज्यभरात पार पडणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निकालापर्यंत पारदर्शीपणे पार पाडावी, मतदात्यांना निर्भयपणे मतदान करता यावे आणि कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत.

दिव्यांग मतदारांसाठी २५० व्हीलचेअरर्स; सोलापूर महानगरपालिकेचा उपक्रम

येत्या २१ तारखेला संपूर्ण राज्यासह सोलापूर शहर मध्य, उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. याकरिता सोलापूर शहर प्रशासन सज्ज झाले आहे. मतदानाला येणाऱ्या दिव्यांग मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून सोलापूर महानगरपालिकेकडून दिव्यांग मतदारांसाठी २५० व्हीलचेअर्सची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

नितेश राणेंच्या प्रचारात ‘तडीपार’ आरोपी सहभागी; शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा आरोप

राज्यातील विविध भागांतील हद्दपार झालेले आरोपी नितेश राणे यांच्या प्रचारात सहभागी आहेत. आणि ते राजरोसपणे पैसे वाटण्याचे काम करत आहेत असा आरोप सतीश सावंत यांनी केला. सावंत यांच्या आरोपानंतर मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले आहे.

भाजपच्या बंडखोर उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहात पकडले

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या दोन समर्थकांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटताना रंगेहात पकडले आहे. जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे शुक्रवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला असून, याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबनराव लोणीकरांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

जालन्यातील परतुरचे भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यातील सेवली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वायरल विडिओ मधील भाषणाच्या आधारावर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद पवारांच्या ‘त्या’ सभेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जोश! ट्विटर द्वारे व्यक्त केले मत

राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी केवळ काही तास शिल्लक आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला असून सर्वच पक्ष मतदारराजापर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करताना दिसत आहे. अनेक पक्षांच्या सभा वेगवेगळ्या कारणाने गाजत आहेत. अशीच एक सभा सध्या शुक्रवार रात्रीपासून तुफान चर्चेत आहे ती म्हणजे साताऱ्यामध्ये झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची सभा.

महाराष्ट्रातील दुष्काळ काँग्रेस-राष्ट्रवादी निर्मित- नितीन बानगुडे पाटील

महाराष्ट्रातील दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस निर्मितआहे . या दोन्ही काँग्रेसने राज्यात ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केला आहे. हा घोटाळा झाला नसता तर महाराष्ट्रातील इंच-इंच जमीन ही सिंचनाखाली आली असती , ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे. शेतकरी मोडून पडला हे पाप काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. असा आरोप शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे पाटील यांनी बुलढाणा येथे केला.

अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे महापूर आला नसल्याचा खुलासा

कर्नाटकचे पाणी जतला मिळाले पाहिजे. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी कर्नाटकचे पाणी जतला देणार म्हणतात. ते शक्य वाटत नाही. दोन्ही राज्यांनी एकत्रित बसून निर्णय घेणे आवश्यक आहे. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे याबाबतीत मौन आहे. त्यामुळे भाजपचे हे खोटे आश्वासन ठरणार असल्याचा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी पत्रकार बैठकीत केला. तर अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे महापूर आला नसल्याचे त्यांनी सांगितले.