अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे महापूर आला नसल्याचा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
कर्नाटकचे पाणी जतला मिळाले पाहिजे. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी कर्नाटकचे पाणी जतला देणार म्हणतात. ते शक्य वाटत नाही. दोन्ही राज्यांनी एकत्रित बसून निर्णय घेणे आवश्यक आहे. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे याबाबतीत मौन आहे. त्यामुळे भाजपचे हे खोटे आश्वासन ठरणार असल्याचा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी पत्रकार बैठकीत केला. तर अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे महापूर आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी कर्नाटकचे पाणी जतला देणार म्हणतात. परंतू ते शक्य वाटत नाही. ते निव्वळ खोटे आश्वासन देत आहे. जतला पाणी जरूर मिळाले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. परंतू केवळ येडीयुराप्पा बोलून उपयोग नाही. दोन्ही राज्यांनी एकत्र बसून त्याबाबत निर्णय घेतला पाहिजे. दोन्ही राज्यात भाजपची सत्ता आहे. परंतू येडीयुराप्पाच बोलत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस काहीच बोलत नाहीत. ईडी, आयकरच्या धाडीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी या धाडी राजकीय दबावातून असू नयेत. निव्वळ कायदेशीर धाडी असल्यातर काही हरकत नसल्याचे उत्तर दिले. ईव्हीएम वरील मतदान शंका घेण्यासारखे आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या बदल करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, कर्नाटकात कॉंग्रेसला ३८ टक्के तर भाजपला ३६ टक्के मते मिळाली आहेत. भाजपला तिथे सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी तिथे कॉंग्रेसच मजबूत आहे. सत्ता गेल्यानंतरही कॉंग्रेसची ताकद कायम आहे. १५ जागांवर तिथे पोटनिवडणूक होणार आहे. त्यानंतर सर्वात जास्त कॉंग्रेसच्या जागा असतील. तसेच कर्नाटकात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता जास्त आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीतही खऱ्या प्रश्नांपासून मतदारांचे लक्ष विचलित करून हिंदूत्व, कलम ३७०, सर्जिकल स्ट्राईककडे लक्ष वेधले जात आहे. भावनात्मक गोष्टीवर दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

Leave a Comment