धनगर समाजाचा अपमान करणाऱ्या भाजपला धडा शिकवा – मुख्यमंत्री सिध्दरामय्या

धनगर समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मात्र पाच वर्षात त्यांनी आरक्षण दिले नाही. त्यामुळे भाजपबद्दल समाजबांधवांच्या मनात द्वेेष निर्माण झाला पाहिजे. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री व मुख्यमंत्री हे खोटारडे आहेत. ते समाजाला आरक्षण देणार नाहीत. समाजाचा अपमान करणाऱ्या भाजपला समाजबांधवांनी मतदान करू नये, देशाच्या एकात्मतेसाठी कॉंग्रेसला मतदान करावे, असे आवाहन कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केले. सांगली विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ धनगर मेळाव्याचे आयोजन वारणा मंगल कार्यालयात केले होते. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला रामहरी रूपनवर, कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.

महाराष्ट्रात मोदी-शहांच्या सभांचा धुराळा ! सोनिया गांधी, प्रियांका गांधी आहेत तरी कुठे?

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे. एकीकडे भाजप – शिवसेनेला त्यांची सत्ता टिकवून ठेवायची आहे, तर दुसरीकडे ‘आघाडी’साठी ही निवडणूक त्यांचं राजकारणातील भविष्य ठरवणारी आहे. मात्र, असं असलं तरी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारापासून दूरच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकांकडे सोनिया गांधींनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे.

‘यांच्या’ सल्ल्यानेच मी निवडणूक लढवत आहे!- आदित्य ठाकरे

‘मी निवडूक लढवावी अशी पहिली इच्छा आ.अनिल बाबर यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आपण या ठिकाणी आमदार बाबर यांच्यासाठी नाही तर स्वतःच्या प्रचारासाठी आलो आहोत. अनिल बाबर यांना मत म्हणजेच मला मत. आजची सभा ही प्रचाराची सभा नसून आमदार अनिल बाबर यांची विजयी सभा आहे. निवडणूकीनंतर तीन महिन्यात टेंभूपासून वंचित गावांना पाणी देणार असून मुख्यमंत्री, अथवा आमदार अशा पदापेक्षा नवा महाराष्ट्र घडवायचाय, पुर्वी महाराष्ट्रात निवडणूकीचे वातावरण तरी दिसायचे पण आता सर्वत्र भगवे वातावरण झाले आहे, यावेळी विरोधी पक्ष शिल्लक आहेच कुठे? अशी बोचरी टीका युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. विटा येथील महात्मा गांधी विद्यामंदिराच्या मैदानावर महायुतीचे उमेदवार आमदार अनिल बाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

काश्मिरचे राहु दे; वाढती महागाई, रोजगार, भ्रष्टाचारावर बोला!- विश्वजीत कदम

महाराष्ट्राच्या निवडणुकीत कश्मिरमधील कलम ३७० चा उल्लेख भाजपच्या नेत्यांकडून होत आहे. राज्यातील वाढती महागाई, रोजगार, भ्रष्टाचार, बंद पडलेले उद्योगधंदे या विषयावर एक शब्द उच्चारला जात नाही. केवळ जनतेची दिशाभूल करून भावनिक मुद्द्यांना हात घातला जात आहे. जनतेने भाजपचे आता कारस्थान ओळखावे व सांगली पुन्हा कॉंग्रेसच्या विचाराची करण्यासाठी पृथ्वीराज पाटील यांना निवडून द्यावे, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ.विश्वजीत कदम यांनी केले. सांगली विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ कर्नाळ येथे सभा पार पडली. या सभेत विश्वजीत कदम बोलत होते.

भाजपचा जाहिरनामा नव्हे तर जुमलानामा आहे- काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

भाजपने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपला जाहीरनामा संकल्पपत्र नावाने प्रसिध्द केला आहे. मात्र हा प्रसिध्द करण्यापूर्वी त्यांनी सन २०१४ च्या निवडणुकीचा जाहिरनामा पहायला हवा होता. २०१९ मध्ये प्रसिध्द केलेल्या जाहिरनाम्यातील अनेक आश्वासने ही २०१४ च्या निवडणुकीत दिलेली होती. मग ही आश्वासने पाच वर्षात का पूर्ण केली नाहीत? त्यांचे हे अपयश आहे, यावर्षीचा त्यांचा जाहिरमाना म्हणजे ‘जुमनलानामा’ असल्याचा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार बैठकीत लगावला.

पालघरमध्ये निवडणुकी आधीच मोठी उलथापालथ !माजी मंत्री मनीषा निमकर यांचा भाजपात प्रवेश

शिवसेना पक्षातून पालघर मतदारसंघात हॅट्रिक साधलेल्या पालघरच्या माजी आमदार व राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मनीषा निमकर यांनी बहुजन विकास आघाडीला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. जव्हार येथील प्रचारसभेत हा पक्षप्रवेश पार पडला.

सावरकरांना भारतरत्न देणे हा भगतसिंगचा अपमान आहे – कन्हैय्या कुमार

नगर शहर मतदारसंघातील भाकपचे उमेदवार बहिरनाथ वाकळे यांच्या प्रचारार्थ दिल्ली येथील जेएनयू विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष आणि भाकपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कन्हैय्या कुमार यांची गुरुवारी नगरमध्ये सभा पार पडली. नगर शहर मतदारसंघातून भाकप कडून बहिरनाथ वाकळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गुरुवारी सकाळी ११ वाजता वाकळे यांच्या प्रचारार्थ कन्हैय्या कुमार यांची सभा आयोजित करण्यात आली होती . यावेळी कन्हैया कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मी सिंधिया नाही तर ‘शिंदे’च आहे तेव्हा बहीण प्रणितीला विजयी करा – ज्योतिरादित्य सिंधिया

भारताच्या राजकारणात जरी मी सिंधिया असलो तरी महाराष्ट्राच्या राजकारणात मी शिंदेच आहे. असं मत मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केलं. आज सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी त्यांची सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी बहीण प्रणिती शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन केलं.
 

साताऱ्याला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांनी आता माघार घेतली आहे – नरेंद्र मोदी

‘साताऱ्याला आपला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांना आज इथून माघार घ्यावी लागली आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये भेद असल्याचे सांगत हे विकास काय करणार? अशा शब्दांत त्यांनी टीका केली. साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी प्रचार सभा घेतली यावेळी ते बोलत होते. साताऱ्यात प्राचारासाठी येणारे मोदी हे पाचवे पंतप्रधान आहेत.

धुळ्यात युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफुसच, सेनेच्या बॅनर वरून भाजप कार्यकर्त्यांचे फोटो गायब  

धुळ्यात शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतु या सभे दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे वावडे असल्याच उघड झालं आहे. आदित्य ठाकरे ज्या मंचावरून मतदारांशी संवाद साधणार आहेत. त्या मंचावर लावलेल्या बॅनरवर भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांचा फोटो शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावण्याच टाळलं.