शिवसेनेनं NDA ला पाठिंबा दिल्याने ‘मविआ’त बिघाडी?? काँग्रेसने व्यक्त केली नाराजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रपती पदाच्या निवडणूकी साठी शिवसेनेनं NDA उमेदवार द्रौपदी मुर्मु याना आपला पाठिंबा जाहीर केला. यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस नाराज असून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून ज्यांनी शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले, अशा परिस्थितीत शिवसेनेचा हा निर्णय अनाकलनीय आहे … Read more

विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर; ‘मविआ’ ला मोठा धक्का

rahul narvekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार राहुल नार्वेकर यांनी बाजी मारली आहे. विधिमंडळात आज मतदान प्रक्रिया पार पडली असता राहुल नार्वेकर याना भाजप आणि शिंदे गट यांची एकत्रित मिळून तब्बल 164 मते मिळाली. तर महाविकास आघाडीच्या राजन साळवी याना फक्त 107 मते मिळाली त्यामुळे राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत. मतदानावेळी शिंदे गटाने … Read more

बंडखोर आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढला

Eknath Shinde Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या बंडखोर आमदारांनी राज्यातील महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला आहे. 38 आमदारांनी पाठिंबा काढल्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे असा दावा शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून काही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. … Read more

छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीचे मनाचा ठाव घेणारे असे असावे,  हे स्मारक पाहणाऱ्यांच्या मनात उमटावेत इतके भव्य, देखणे आणि अर्थपूर्ण असावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक शिरूर तालुक्यातील वढू (बु.) व हवेली तालुक्यातील तुळापूर येथे प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा … Read more

राज्यसभा निवडणूक : समाजवादी पक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 10 जूनला राज्यसभेसाठी मतदान होणार असून शिवसेना आणि भाजपने आपला सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. प्रत्येक आमदारांचे मत यावेळी महत्त्वपूर्ण असून लहान लहान पक्ष आणि अपक्षांची मते निर्णायक ठरणार आहेत. त्याच दरम्यान, समाजवादी पक्षाने आपली दोन्ही मते महाविकास आघाडीला देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची विजयाची वाट … Read more

महाविकास आघाडी सुसाट…. बैठकीला 12 अपक्षांच्या उपस्थितीने विजयाचा मार्ग सुकर??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभा निवडणूकच राजकारण तापलं असून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा महाविकास आघाडीने आपल्या एकीचे प्रदर्शन दाखवत कोणी कितीही प्रयत्न केले तरी आपला चौथा उमेदवार निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला. मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला … Read more

ज्यादिवशी सत्ता जाईल… त्या दिवशी परतफेड व्याजासह : महाविकास आघाडीला चित्रा वाघ यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आ. रवि राणा दाम्पत्यावरील कारवाईनंतर भाजपाच्या महिल्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. ज्या दिवशी तुमच्या हातून सत्ता जाईल त्यादिवशी विनातक्रार परतफेड करायला तयार रहा…तीही व्याजासह..! असे ट्विट करण्यात आले आहे. मात्र, या ट्विटनंतर चित्रा वाघ यांना जोरदार ट्रोल करण्यात … Read more

उद्धव ठाकरेंनी गृहखाते स्वतःकडे घ्यावे; शिवसेना नेत्याची मागणी

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्याच्या कारभारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती समोर येत होती तसेच राष्ट्रवादी कडे असलेले हे गृहखाते शिवसेनाला हवं आहे अशाही बातम्या समोर येत आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवावे अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना … Read more

राष्ट्रवादीकडील गृहखाते शिवसेनेला हवंय?? भाजप नेत्यांवर कारवाई होत नसल्याने शिवसेना नाराज

sharad pawar uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये धुसपूस पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्यावर शिवसेना नाराज असून आता स्वतःकडे गृहखाते असावे अशी शिवसेनेची इच्छा असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांवर एकामागून एक ईडी कारवाई होत असताना गृहखात्याने मात्र आक्रमक भूमिका घेतली नाही असे शिवसेनेचे म्हणणं आहे. … Read more

नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; किमान समान कार्यक्रमाची करून दिली आठवण

nana patole uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकार वर काँग्रेसचे 25 आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांना किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिली आहे. या पत्रात सीएमपीद्वारे दलित मागासवर्गीय (ओबीसी) आणि अल्पसंख्याक यांच्या कल्याणासाठीच्या योजनाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली … Read more