बंडखोर आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या बंडखोर आमदारांनी राज्यातील महाविकास आघाडीचा पाठिंबा काढला आहे. 38 आमदारांनी पाठिंबा काढल्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे असा दावा शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे.

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून काही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यामध्ये 38 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढल्याचे म्हंटल आहे. तसेच उपाध्यक्ष यांचा चुकीचा वापर राज्य सरकार करत असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.

येवडच नव्हे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनाही पत्र पाठवत सरकारचा पाठिंबा काढल्याचे सांगितले आहे. तसेच सरकारने बहुमत सिद्ध करावे अस आव्हान दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार समोर मोठा पेच निर्माण झाला आहे

एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 हुन अधिक समर्थक आमदारांसोबत शिवसेनेतून बंडखोरीं केली होती. काँग्रेस- राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करावी असा आग्रह या गटाचा आहे. शिवसेनेतील जवळपास 2 तृतीयांश पेक्षा अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याने उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर गेलं आहे. आता शिंदे गटाने सरकारचा पाठिंबा काढल्यामुळे राज्यपाल काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल

Leave a Comment