‘नथुराम गोडसेचं मंदिर बांधणाऱ्यांकडून अजून काय अपेक्षा करणार?; भाजपच्या टीकेला मंत्री अस्लम शेख यांचे प्रत्युत्तर

मुंबई : काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांचा समावेश उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात केल्याने भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका होत आहे. देशद्रोही अस्लम शेख आता देशभक्त झाले, अशी टिका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज केली आहे. भाजपच्या या टीकेला स्वतः मंत्री अस्लम शेख यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नथुराम गोडसेंच मंदिर बांधणाऱ्यांकडून अजून काय अपेक्षा करणार? अशी … Read more

माझा पक्ष सोडून सर्वच पक्षात घराणेशाही – रामदास आठवले

सातारा : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साताऱ्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी राजकीय फटकेबाजी केली.माझा पक्ष सोडून सर्व पक्षात घराणेशाही आहे असे मत आठवले यांनी यावेळेस व्यक्त केले. त्यांनी आपल्या खास शैलीत कविता देखील सादर केली. त्यांनी म्हंटले की, मी नाही नाराज म्हणून साताऱ्यात आलोय आज. आठवले म्हणाले की, महाविकास आघाडी … Read more

वाघासारखी डरकाळी फोडणारी शिवसेना बकरी सारखी झाली – रामदास आठवले

सातारा : वाघासारखी डरकाळी फोडणारी शिवसेना आता बकरी सारखी झाली आहे, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. सातारा दौऱ्यावर असताना आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले की, स्वातंत्र्य वीर सावरकरांबाबत राहुल गांधी यांनी फार कठोर भूमिका घेतली होती. यावर मात्र शिवसेनेने तडजोडीची भूमिका घेतली आहे. सत्तेसाठी शिवसेना गुलामगिरी करत आहे. … Read more

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

महाविकासआघाडीचा राज्य मंत्रिमंडळ विस्तार आज झाला. गेल्या महिनाभरापासून उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा महाराष्ट्राला होती. त्यानुसार आज शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा विधानभवनात संपन्न झाला. कायद्यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यांसह ४३ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ करता येते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यावेळी पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांसह ७ जणांचा समावेश करण्यात आला होता. तर आजच्या विस्तारात ३६ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये २६ जणांची वर्णी कॅबिनेटपदी लागली तर १० जणांना राज्यमंत्रीपद मिळाले.

ज्येष्ठांना डावलून ‘या’ तरुण चेहर्‍यांना मिळणार मंत्रीपद, पहा संभाव्य मंत्र्यांची यादी

मुंबई | उद्या 30 डिसेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. शिवसेनेच्या खात्यातून बच्चू कडू यांना मंत्रिपद दिले जाईल. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेल्या अदिती तटकरे यांची राज्यमंत्रीपदी वर्णी निश्चित समजली जाते. … Read more

‘देवेंद्र यांच्या नशिबात काय ते सटवीलाच माहित’; शेलारांची खंत

देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी  निवड करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीनंतर सत्ताधारी नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

संजय राऊत यांचे ‘हे’ ट्विट सध्या चांगलंच गाजत आहे

गेला महिनाभर चालू असलेल्या राजकीय नाट्यावर काल अखेर पडदा पडला. अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर भाजपा सरकार कोसळले. याचा परिणाम म्हणून बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि राज्यामध्ये ‘महाविकासआघाडी’ चे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले. आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनतील. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे. या सर्व घडामोडींवर शिवेसना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं असून एक शेर पोस्ट केला आहे.