समुद्रावरील सर्वात जास्त लांबीच्या पुलाच्या कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज १५ जानेवारी रोजी मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या(मुंबई ट्रान्स हार्बर लिंक)समुद्रातील पुलाच्या पहिला गाळा उभारणी कामाचा शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे,खासदार अरविंद सावंत,आमदार अजय चौधरी उपस्थित होते. या पुलाची लांबी २२ किमी असून हा देशातील समुद्रावरील सर्वात जास्त लांबीचा पूल ठरणार आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पामध्ये … Read more

सावरकर-गोडसेंबाबत अपशब्द वापरले गेले तेव्हा राऊत गप्प का बसले? – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी,सतेज औंधकर : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस सेवा दलाकडून सावरकर आणि गोडसे यांचे शारीरिक संबंध होते असे सांगण्यात आले त्यावेळी संजय राऊत यांची बोलती बंद का होती? त्यावेळी त्यांनी ट्विट का केले नाही? असे सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले. तसेच … Read more

शिवसेनेचे नाव ‘ठाकरे सेना’ करा : उदयनराजेंचे टीकास्त्र

मुंबई : माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावर भाष्य केले. यावेळेस त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. आता शिवसेना हे नाव काढून ठाकरे सेना करा, अशी टीका उदयनराजे यांनी केली. शिवसेनेने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सोईचे राजकारण केले. महाशिवआघाडीतील ‘शिव’ का काढून टाकले, असा … Read more

उद्धवसाहेब, हा खेकडा शिवसेना पोखरतोय, वेळीच नांग्या मोडा; तानाजी सावंतांविरोधात निष्ठावंत शिवसैनिकाची पोस्टरबाजी

सोलापूर | उद्धवसाहेब हा खेकडा तर शिवसेना पोखरतोय, वेळीच नांग्या मोडा अशी मागणी एका निष्ठावंत शिवसैनिकाने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात एका निष्ठावंत शिवसैनिकाने ही पोस्टरबाजी केली आहे. उद्धव साहेब हा खेकडा तर सोलापूर व धाराशिवची शिवसेना पोखरत आहे.. वेळीच नांग्या मोडा – निष्ठावंत शिवसैनिक,” असे … Read more

मला कोणत्याच जिल्हयाचे पालकमंत्री पद नको – बाळासाहेब थोरात

मुंबई : काल पालकमंत्री पदाचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र मला कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री पद नको अशी भूमिका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. पालकमंत्री पदाचे वाटप होण्यापूर्वी देखील त्यांनी हे मत व्यक्त केले होते. कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांची अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती … Read more

उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता; शिवसेना आमदार तानाजी सावंत यांची बंडखोरी

उस्मानाबाद प्रतिनिधी : मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज असलेले शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी शिवसेनेवरच ‘तीर’ मारला. उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी करत तानाजी सावंतांनी भाजपला साथ दिली. भाजप-शिवसेनेच्या युतीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांची निवड झाली. उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप आमदार … Read more

अब्दुल सत्तारांना ग्रामविकास तर बच्चू कडूंना शालेय शिक्षण व कामगार; पहा संपूर्ण खातेवाटप

मुंबई | कृषी खाते कोणाकडे जाणार यावरून काँग्रेस व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर कृषी खाते शिवसेनेकडे गेले आणि शिवसेनेचे दादा भुसे कृषी मंत्री झाले. खाते वाटपा संबंधी अधिकृत घोषणा झाली नसली तरी सूत्रांकडून मिळालेली यादी अंतिम मानली जात आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांना कोणते खाते मिळाले हे अद्याप स्पष्ट झाले नसले … Read more

अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण; पहा संभाव्य खातेवाटप यादी

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तार होऊन दोन दिवस होउन देखील अजून खातेवाटप झालेले नाही आज संध्याकाळी खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यात दोन दिवस झालेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर खात्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ व नियोजन विभाग मिळू शकेल, असे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरे … Read more

महाविकासआघाडीत कोणतीही कुरबूर नाही,संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल -संजय राऊत

महाविकासाआघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार होऊन तीन दिवस उलटून गेले तरी खातेवाटपाचा मुहूर्त काही निघत नाही आहे. खातेवाटपाबाबत महाविकासाआघाडीतील तिन्ही पक्षात बैठकांचे सत्र पार पडत आहेत. मात्र खातेवाटप कधी होणार यावर अजून सस्पेंस कायम आहे. खातेवाटपासंबंधी नेमकं कोण उशीर करत आहे यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. याबाबत आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राऊत म्हणाले, “खातेवाटपावरून महाविकास आघाडीत कोणतीही कुरबूर नाही. तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटप झालेलं आहे. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांकडून विलंब झालेला नाही. आज सायंकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल,” अशी माहिती राऊत यांनी दिली.

काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास? 1 जानेवारी 1818 रोजी असे काय घडले, ज्यामुळे लाखो दलित बांधव या ठिकाणी येतात? वाचा सविस्तर

  हॅलो महाराष्ट्र टीम । पुणे प्रशासनाने राजकीय पक्षांना भीमा-कोरेगाव येथे कोणताही कार्यक्रम आयोजित करू नये, असे सांगितले आहे. शासकीय पातळीवर सरकारकडून येथे कार्यक्रम घेण्यात येईल. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे घटनास्थळावर नजर ठेवली जाईल. खबरदारीचा उपाय म्हणून काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी … Read more