महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावर परिणाम करणारी बातमी ; एमआयएम , वंचितच्या तलाकनाम्यावर ओवेसींची सही

मुंबई प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय एमआयएमने घेतला आहे. यासंदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी एक पत्रक काढून घोषणा केली होती. मात्र यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी ओवेसी जोपर्यंत युती तोडण्याच्या निर्णयावर काही बोलत नाहीत तोपर्यंत कोणत्याही वावड्या खऱ्या मानू नका असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. मात्र आज ओवेसींनी देखील हात वर केले आहेत. त्यामुळे … Read more

Breaking | उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी ; काँग्रेस सोडण्याचे सांगितले ‘हे’ कारण

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढून पराभूत झालेल्या सिनेअभिनेत्या उर्मिला मातोंडकरांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेत आहे असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हणले आहे. आपल्याला रोखण्याचा प्रयत्न काँग्रेसचे लोकच करत आहेत. मी यासंदर्भात काँग्रेस नेतृत्वाला पत्र देखील लिहले होते. मात्र मी ज्यांच्याबद्दल तक्रार … Read more

म्हणून मी शिवसेनेची साथ देणार : लक्ष्मण माने

सोलापूर प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडी भाजप  आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मदत करत असल्याचा आरोप करून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्त्वातील वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण माने वंचितमधून बाहेर पडले होते. मात्र, आता त्यांनी शिवसेना आणि आपले काही वावडे नसल्याचं म्हणले आहे तसेच ते शिवसेनेला मदत करणार असल्याचे बोलले आहे.

लक्ष्मण माने म्हणाले, “प्रबोधनकार ठाकरे हे आमच्या चळवळीचे नेते आणि माझे गुरु होते. त्यांचा मुलगा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चूक केली. मात्र, नातवंडे सुधारत असतील तर त्यांना मदत करण्याची माझी तयारी आहे.” म्हणजेच आगामी विधानसभा निवडणुकीत ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा साथ देणार असं म्हणत आहेत.

माने यांनी सोमवारी (9 सप्टेंबर) सोलापुरात पत्रकार परिषद घेत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला मदत करणार असल्याचे म्हणाले.
[youtube https://www.youtube.com/watch?v=9TZnNiR7oFQ&w=560&h=315]

हर्षवर्धन पाटील यांच्या बद्दल सुप्रिया सुळे म्हणतात

हिंगोली प्रतिनिधी |  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना आज पुन्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर भाष्य केले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी आज प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी पाटील असे का बोलले त्यांची भूमिका नेमकी काय आहे हे जाणण्यासाठी मी त्यांना फोन केला … Read more

सेना भाजपच्या मेगा भरतीमुळे युतीच्या जागावाटपात आला आहे हा नवा सस्पेन्स

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून अनेक नेत्यांची मेगा भरती भाजप आणि शिवसेनेने करून घेतली. त्यामुळे शिवसेना आणि भाजप युतीत परंपरेने लढवत असलेल्या जागांवर आता टाच आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेना भाजपच्या जागा वाटपात २० ते २५ जागांची अदला बदली होण्याची शक्यता आहे. युतीचे जागा वाटप ; बार्शीची जागा भाजपला सुटणार ; आमदार दिलीप सोपलांच्या … Read more

तर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल : प्रकाश आंबेडकर

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे करत आहे. पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असे देखील बोलले जाते आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. आदित्य ठाकरे यांना जर मुख्यमंत्री करायचे असेल तर शिवसेनेने हा मुद्दा रेटून धरला पाहिजे अन्यथा त्यांचा राहुल गांधी होण्यास उशीर लागणार नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. … Read more

उदयनराजे भाजपमध्ये जाणार नाहीत ; हि असणार त्यांची नवी भूमिका

पुणे प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू होत्या. उदयनराजे भाजपमध्ये गेल्यास ते लोकसभेचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार होते. मात्र त्यांनी आता युटर्न घेतला असल्याची माहिती समोर येते आहे. युतीच्या इतिहासात प्रथमच शिवसेना होणार लहान भाऊ ; जागा वाटपाच्या या फॉर्म्युल्यावर होणार शिक्का मोर्तब उदयनराजे यांनी … Read more

युतीच्या इतिहासात प्रथमच शिवसेना होणार लहान भाऊ ; जागा वाटपाच्या या फॉर्म्युल्यावर होणार शिक्का मोर्तब

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना भाजप यांची युती १९८९ सालापासून आज तागायत आहे. २०१४ च्या निवडणुकीचा अपवाद सोडला तर शिवसेना विधानसभेच्या मागील ५ निवडणुकासोबत लढली आहे. तर सेना भाजपची युती ३० वर्षांपासून अखंडित आहे. मात्र युतीच्या आजवरच्या इतिहासात शिवसेना कधीच भाजपपेक्षा कमी जागा घेऊन विधानसभा निवडणुकीला सामोरे गेली नाही. परंतु आगामी निवडणुकीला भाजपचा दिग्विजय पाहून शिवसेना नरमली … Read more

काँग्रेस सोबत निवडणूक लढवायची की नाही या बाबत प्रकाश आंबेडकरांनी केले अंतिम विधान

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धूळ चारत मोठी ताकद म्हणून समोर आलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू होती. मात्र, आज त्यावर पूर्णविराम लागला. आंबेडकर … Read more

सोपलांना बाळासाहेब ठाकरेंनी धूळ चरायला सांगितली होती ती आम्ही चारणार ; नाराज शिवसेना नेत्यांचा पक्षासोबत असहकार

बार्शी प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार असणाऱ्या दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावर नाराज असणाऱ्या भाऊसाहेब आंधळकर यांनी सोपल यांच्या प्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिलीप सोपल यांचे काम करणार नाही असे म्हणत त्यांचा आम्ही पराभव घडवून आणणार असे म्हणले आहे. “मी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देऊन राजकरणात आलो. शिवसेनेचा भगवा खांदयावर … Read more