Thursday, March 30, 2023

उदयनराजे भाजपमध्ये जाणार नाहीत ; हि असणार त्यांची नवी भूमिका

- Advertisement -

पुणे प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू होत्या. उदयनराजे भाजपमध्ये गेल्यास ते लोकसभेचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार होते. मात्र त्यांनी आता युटर्न घेतला असल्याची माहिती समोर येते आहे.

युतीच्या इतिहासात प्रथमच शिवसेना होणार लहान भाऊ ; जागा वाटपाच्या या फॉर्म्युल्यावर होणार शिक्का मोर्तब

- Advertisement -

उदयनराजे यांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांची पुण्यात बैठक बोलावली होती. त्या बैठकीत कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीतच राहणे योग्य राहील असा उदयनराजेंना सल्ला दिला. त्यानंतर उदयनराजे यांनी भाजप प्रवेशाचा कार्यक्रम बसनात गुंडाळला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या पूर्व प्रदेशाध्यक्षाचं ठरलं ! १३ सप्टेंबरला करणार शिवसेनेत प्रवेश

उदयनराजे नेमके काय करणार हे कोणालाच ताडता येत नसताना उदयनराजे देखील या विषयावर उघड बोलत नाहीत. मागे त्यांनी आपण राष्ट्रवादीत राहणार नाही मात्र कोठे जाणार हे आत्ताच स्पष्ट करणार नाही असे विधान केले होते.राष्ट्रवादी उदयनराजे यांच्यावर दबाव वाढवत असल्यानेच त्यांनी पक्षांतर थांबवले असे बोलले जात आहे. उदयनराजे जर भाजपमध्ये गेले असते तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना उतरवण्याच्या तयारीत होती. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेल्यास आपल्याला धोका होईल या भावनेने उदयनराजे राष्ट्र्वादीतच राहिले असावेत असे राजकीय जाणकार सांगत आहेत.