ऐन निवडणुकीत भाजपने मनसे उपाध्यक्ष फोडून त्याला दिली उमेदवारी

नाशिक प्रतिनिधी| राजकरणात कधी काय होईल हे काहिच सांगता येत नाही. कारण उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच अवघे काही तास शिल्लक असतानाच भाजपने मनसेचे उपाध्यक्ष राहुल ढिकले यांना नाशिक पूर्व मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तुम्ही बातमी वाचत असताना त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरलेला असेल. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज … Read more

राज ठाकरेंची मनसे विधानसभा निवडणूक लढणार ; स्वतः राज ठाकरेंनी केली उमेदवारांची घोषणा

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस राष्ट्र्वादीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आज मनसे विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील हे मनसेकडून विधानसभा निवडणूक लढणार आहेत असे स्वतः राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. … Read more

मनसेचे नितीन सरदेसाईंची ईडीकडून चौकशी; राज ठाकरे नंतर देसाईंचा नंबर

वृत्तसंस्था | कोहिनूर स्क्वेअरप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चौकशीनंतर ईडीनं मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांची चौकशी सुरू केली आहे. ईडीनं सरदेसाई यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार सरदेसाई हे ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत.ईडीनं या आधी कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सुपुत्र उर्वेश जोशी यांची चौकशी केली होती. त्यानंतर मनसे अध्यक्ष … Read more

रिझर्व्ह बँकेबाबत राज ठाकरेंचं भाकित खरं ठरलं ? व्हिडिओ शेअर करत मनसेचा दावा

टीम, HELLO महाराष्ट्र |नोटाबंदी आणि जीएसटीमुळे पार विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला रिझर्व्ह बँकेच्या‘रिझर्व्ह’चं ठिगळ लागणार, हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं भाकित खरं ठरलं, असं ट्वीट मनसेने केलं आहे. 9 ऑगस्टला राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत हा दावा करण्यात आला आहे. ‘नोटबंदी आणि जीएसटीमुळे पार विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेला रिझर्व्ह बँकेच्या ‘रिझर्व्ह’चं ठिगळ लागणार’… हे राजसाहेबांचं … Read more

मनसेच्या कट्टर समर्थकाची आत्महत्या

नांदेड प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुंबईबाहेरील पहिला समर्थक असणाऱ्या संभाजी जाधव यांनी आत्महत्या केली आहे. संभाजी जाधव विद्यार्थी दशेपासूनच राज ठाकरे यांच्या संपर्कात होते. विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून संभाजी जाधव यांनी नांदेडमध्ये चांगलं काम केलं होतं. व्यवसायाने शेतकरी असलेल्या संभाजी जाधव यांच्या शेतीवरील कर्ज वाढलं होतं. त्या नैराश्यातून 46 वर्षीय संभाजींनी जीवनयात्रा … Read more

राज ठाकरे चौकशीला निघालेत की सत्यनारायनाच्या पुजेला…? एवढं नाटक कशासाठी? – अंजली दमानिया

मुंबई प्रतिनिधी । मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी ईडी ने नोटिस बजवल्यानंतर आज राज चौकशीला सामोरे गेले. याप्रसंगी संपूर्ण परिवार ईडी च्या कार्यालयात त्यांच्या समवेत उपस्थित होता. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चांगलाच समाचार घेतला. राज ठाकरे हे चौकशी साठी गेलेत की सत्यनारायनाच्या पुजेसाठी गेलेत..का एवढा ड्रामा.. सगळे मिळून माहिती देणार आहेत … Read more

राज ठाकरे यांची आज ईडीकडून चौकशी

टीम, HELLO महाराष्ट्र| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी ईडीकडून चौकशी होणार आहे. या कारवाईमुळे मनसैनिकांत असंतोष असून त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. या यंत्रणांना मी योग्य ती उत्तरे देईनच; तुम्ही टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन राज यांनी केले आहे. ईडीने राज यांना चौकशीस हजर राहण्यास बजावल्यानंतर … Read more

ईडी नोटिसीचे ‘राज’कारण ; २२ ऑगस्टला मनसे ईडी कार्यालया समोर करणार शक्तिप्रदर्शन

मुंबई प्रतिनिधी |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर मिल भूखंड प्रकरणी नोटीस पाठवून २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. कोहिनूर मिल भूखंड विक्री संदर्भात काही तरी काळेबेरे आहे असा ईडीला संशय आहे. म्हणूनच ईडीने राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र या सर्व प्रकारात मनसेने राजकारण करण्याचा चांगलाच इरादा केला असून मनसे शक्तिप्रदर्शन … Read more

उन्मेष जोशींची ईडीने केली ७ तास चौकशी

मुंबई प्रतिनिधी | माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे चिरंजीव आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांची कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने सात तास चौकशी केली. चौकशी समाधानकारक झाल्याचा दावा उन्मेष जोशींनी केला असून ईडी पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याचे ते म्हणाले. उन्मेष जोशी यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार उन्मेष हे … Read more

राज ठाकरेंना ईडीने पाठवलेल्या नोटिसीवर मुख्यमंत्री म्हणतात

मुंबई प्रतिनिधी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर मिल भूखंडाच्या प्रकरणात नोटीस पाठवली आहे. त्या प्रकरणी मनसेने भाजप सूडाचा डाव खेळत असल्याचे म्हणत भाजपवर सडकून टीका केली आहे. तर याच प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी याबद्दल म्हणले की ईडी एक स्वायत्त संस्था आहे. राज ठाकरे यांना आलेल्या नोटिसी बद्दल मला फक्त … Read more