हृतिक रोशनच्या ‘क्रिश 4’ च शुटिंग लवकरच होणार सुरू

मुंबई । बॉलिवूड चित्रपट अभिनेता हृतिक रोशनने आपल्या चाहत्यांना एक चांगली बातमी दिली आहे.  हृतिक रोशनने आपल्या ‘क्रिश 4’ चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. ‘क्रिश 3’ च्या प्रचंड यशानंतर आणि चित्रपटात नेत्रदीपक स्टंट करून लोकांची मने जिंकणार्‍या हृतिक रोशनने सुपरहिरो फ्रॅंचायझी ‘क्रिश’ चा चौथा हप्ता बनवण्याची तयारी सुरू केली आहे. या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन … Read more

विद्या बालनचा शकुंतला देवीवरील चित्रपट ‘या’ महिन्यात होणार रिलिज

मुंबई | विद्या बालनच्या ‘शकुंतला देवी’ चित्रपटाची रिलीज डेट अखेर समोर आली आहे. हा चित्रपट सिनेमागृहात नव्हे तर अमेझॉन प्राइम व्हिडिओवर चित्रपट प्रदर्शित होत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मने आज जाहीर केले की ते या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 जुलै रोजी रिलीज करणार आहे. हे 200 देशांचे मुख्य सदस्य 31 जुलैपासून टीव्ही सेट, मोबाईल, लॅपटॉपवर पाहण्यास … Read more

KGF च्या प्रतीक्षेत असणाऱ्या चाहत्यांनी स्वत: बनवला चित्रपटाचा ट्रेलर; सोशल मिडियावर व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केजीएफ हा दाक्षिणात्य सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमाचा दुसरा भाग कधी येईल या प्रतीक्षेत सिनेमाचे चाहते आहेत. हा सिनेमा जुलै महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र आता ही तारीख ऑक्टोबर २०२० ला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘केजीएफ चॅप्टर – १’ हा आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय दाक्षिणात्य चित्रपटांपैकी एक आहे. सुपरस्टार … Read more

‘मला वेडी म्हणवून माझा अपमान केला; कंगना रनौतचा पूजा भट्टवर हल्ला

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये nepotism चर्चा तीव्र झाली आहे. या वादात प्रत्येकजण पुढे येत आपला मुद्दा पुढे करत आहेत. अशा परिस्थितीत उद्योगातच दोन मतांतरे येत आहेत. आता बॉलिवूडचे अनेक दिग्गज एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यातच आज पूजा भट्ट आणि कंगना रनौत यांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु केले आहेत. खरं तर, नुकतीच … Read more

कलाकारांचे मानधन लांबवणाऱ्यावर भडकली हेमांगी; मांडल्या अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या व्यथा

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे बंद पडलेले चित्रीकरण आता सुरु झाले आहे. मात्र सिनेमा, मालिका यांच्यामध्ये काम करणाऱ्या अनेक कलाकारांचे मानधन वेळेवर दिले जात नाही. यावर भडकलेल्या हेमांगीने फेसबुकवर पोस्ट करत आपला राग व्यक्त केला आहे. आणि आता तरी ३० दिवसांचे क्रेडिट ठेवा असे ती म्हणाली आहे. ‘बऱ्याच मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झालीये…छान … Read more

हॅम्लेट, हैदर आणि हिंदू

चित्रपट परीक्षण । विशाल भारद्वाज माझे आवडते दिग्दर्शक नाहीत. पण तरीही त्यांचे सिनेमे मी बघतो कारण व्यावसायिक हिंदी सिनेमांच्या उथळ भाऊगर्दीत बॉक्स ऑफिसकडे लक्ष न देता सिनेमा बनवणारे ते मोजक्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत. तसेच इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळे मला नेहमीच इंग्रजी साहित्यावरील रूपांतरे कशी होतात याची उत्सुकता असते. विशाल भारद्वाज सातत्याने शेक्सपिअरच्या नाटकांची रूपांतरे करत … Read more

अशी झाली होती शाहीदची १२ वर्षांनी लहान असणार्‍या मिरा राजपूतशी भेट; गुपचूप केले होते लग्न

मुंबई | शाहिद कपूर आणि मीरा राजपूत बॉलीवूडमधील सर्वात चमकदार जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. या दोघांमध्ये जबरदस्त बॉन्डिंगही आहे. शाहिद ने आजच्याच दिवशी म्हणजे 7 जुलै रोजी मीरा राजपूतशी लग्न केले. मीरा शाहिदपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे आणि तिचे लग्न झाले तेव्हा ती 21 वर्षांची होती. चला आम्ही तुम्हाला त्यांच्या प्रेमकथेबद्दल काही खास गोष्टी … Read more

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण: संजय लीला भंसाळी बांद्रा पोलिस स्टेशनला दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. यावेळी भन्साळी एकट्यानेच नाही तर त्यांची पूर्ण लीगल टीमही येथे त्यांच्याबरोबर होती. अलीकडेच सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणात संजय लीला भन्साळी यांची चौकशी केली जाऊ शकते, अशी माहिती एका मोठ्या पोलिस सूत्रांकडून मिळाली होती. संजय … Read more

‘त्यावेळी मलाही चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला’- प्रियांका चोप्रा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १४ जून रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड मध्ये असलेल्या घराणेशाहीचा वाद बाहेर आला. बॉलिवूड मधील अनेक दिग्ग्ज कलाकारांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटना यावेळी सांगितल्या. काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिने देखील बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या वादावर एक वक्तव्य केले होते. तिलाही … Read more

चायनीज अ‍ॅपच्या बंदीनंतर काय आहे सोशल मीडियाचा ट्रेंड?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीयांचा रोष उसळला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी चीन ऍपच्या माध्यमातून भारतीय नागरिकांची माहिती इतर देशांना देत असल्याची माहिती दिल्यानंतर सरकारने काल चीनच्या ५९ ऍपवर बंदी घातली आहे. यामध्ये TikTok, UC Browser यासारखी ऍप देखील आहेत. यावरून ट्विटरवर व्होकल फॉर लोकल अंतर्गत अनेक ट्रेंड सुरु आहेत. त्या … Read more