55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनो घरीच थांबा! मुंबई पोलीस आयुक्तांचे निर्देश

मुंबई । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी रात्रंदिवस ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या ३ दिवसात मुंबई पोलीस दलातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले होते. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वयस्क पोलिसांना कोरोनाचा धोका लक्षात घेत पोलीस आयुक्तांनी तातडीने पावलं उचलत … Read more

जाणून घ्या राज्यातील जिल्हा व मनपानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी; एका क्लीकवर..

मुंबई । महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण रोज कमी अधिक असले तरी साथीवर अद्याप नियंत्रण मिळवता आलेले नाही. राज्यात करोनाबाधित रुग्णांचा आकडा आज साडेआठ हजारपार गेला आहे.राज्यात आज कोरोनाबाधित ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या ८हजार ५९० झाली आहे. आज ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण … Read more

मुंबईत आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू; रुग्णालयात बेडसाठी फिरावं लागलं होत वणवण

मुंबई । कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या मुंबई पोलीस दलाला आणखी एक धक्का बसला आहे. कोरोनाशी लढणाऱ्या कुर्ला पोलीस ठाण्यात वाहूतक शाखेत कार्यरत असणाऱ्या शिवाजी सोनावणे यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट करत शिवाजी सोनावणे यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. कोरोनामुळे राज्य पोलीस दलातील पहिला बळी शुक्रवारी रात्री गेला होता. मुंबईच्या वाकोला … Read more

दुर्दैवी! मुंबईत कोरोनाग्रस्त पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

मुंबई । राज्यभरात लॉकडाऊनच्या काळात पोलीस दिवसरात्र डोळ्यांत तेल घालून पहारा देत आहेत. स्वत:च्या आरोग्याची पर्वा न करता पोलीस सेवा बजावत आहेत. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिसांनावरही कोरोनाने आता झडप घातली आहे. मुंबईत एका ५७ वर्षीय करोनाबाधित पोलीस कॉन्स्टेबलचा आज नायर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनामुळे पोलिसाचा झालेला … Read more

मुंबई-पुण्यात ‘या’ तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो

मुंबई । सध्या देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु आहे. हा लॉकडाउन येत्या ३ मे रोजी संपणार आहे. येत्या ४ मे रोजी देशासह राज्यातील लॉकडाऊन कदाचित मागे घेतला जावू शकतो. पण मुंबई आणि पुण्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता या दोन्ही शहरात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो. कदाचित या दोन्ही शहरांमधील कंटेन्मेंट झोनपर्यंत हा निर्णय मर्यादित … Read more

महाराष्ट्र नाही तर देशातील ‘या’ राज्यात सर्वात वेगाने पसरतोय कोरोना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतामध्ये कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत ७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २३ हजाराहून अधिक लोकांना या धोकादायक विषाणूची लागण झालेली आहे. दरम्यान, देशभरात चालू असलेल्या या लॉकडाऊनला एक महिना पूर्ण झाला आहे. अशा परिस्थितीत आयआयटी दिल्लीने डेटाच्या आधारे एक अहवाल तयार केला आहे. यानुसार, कोरोनाचे दोन तृतीयांश रुग्ण हे देशभरातील या … Read more

राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ६ हजार ८१७ वर

मुंबई । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही नियंत्रणात आला नसून राज्यातील को रोनाबाधित रुग्णांची संख्या ६ हजार ८१७ वर पोहोचली आहे. शुक्रवारी राज्यात करोनाचे ३९४ नवे रुग्ण आढळले असून १८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ३१० झाली असून ९५७ जणांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे कोरोना संसर्गाचे केंद्रबिंदू … Read more

धक्कादायक! एका महिन्यात मुंबईतील रुग्णसंख्या शंभर पटीने वाढली

मुंबई । संपूर्ण देशाला कोरोनाने जखडून ठेवलं आहे. दिवसागणिक कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत जाऊन अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. देशात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात सापडले आहेत. महाराष्ट्रात कोरोना प्रसारच मोठं केंद्र बनलेल्या मुंबापुरी म्हणजेच मुंबईत कोरोनाने हैदोस घातलं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या मुंबईत संपूर्ण देशाच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण आहेत. एवढंच नव्हे … Read more

चिंताजनक! मुंबईत 7 वॉर्डमध्ये 200 पेक्षा अधिक कोरोनाबाधित

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५ हजारांच्या वर पोहोचला आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी निम्म्यापेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. मुंबईतील ७ वॉर्डमध्ये 200 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण असून 100 जास्त कोरोनाबाधित असलेले एकूण वॉर्ड 13 आहेत. मुंबईतील जी साऊथ प्रभागात (वरळी, प्रभादेवी, लोअर परळचा परिसर) सर्वाधिक 487 रुग्ण आहेत. तर त्यातल्या त्यात … Read more

मुंबईत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आज प्रथमच घट; काल रात्रीपासून आढळले फक्त ६ रुग्ण

मुंबई । कोरोनाशी प्रखर लढा देणाऱ्या राज्य सरकारला दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाची चिंता वाढवणाऱ्या मुंबईतील संसर्ग हळूहळू कमी होत असल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन किंवा तीन अंकी आकड्यांमध्ये रुग्ण वाढ नोंदवणाऱ्या मुंबईतील बाधितांच्या संख्येत आज प्रथमच घट झाली आहे. काल रात्रीपासून आतापर्यंत मुंबईत फक्त ६ नवे रुग्ण आढळले आहेत. … Read more