परळीत घुमला ‘मोदी’ नाद, थकलेल्या नेत्यांना आता घरी बसवा – नरेंद्र मोदी
भाजपच्या नेत्यांनी केलेल्या प्रत्येक कामाला काँग्रेस राष्ट्रवादीने नावं ठेवलीत. आज त्यांना कुणीच विचारत नाही कारण कृती करण्याचं धाडस ते दाखवू शकत नाहीत असं मोदी पुढे म्हणाले.
भाजपच्या नेत्यांनी केलेल्या प्रत्येक कामाला काँग्रेस राष्ट्रवादीने नावं ठेवलीत. आज त्यांना कुणीच विचारत नाही कारण कृती करण्याचं धाडस ते दाखवू शकत नाहीत असं मोदी पुढे म्हणाले.
शिवाजी महाराजांच्या भुमीवरुन राजकीय स्वार्थासाठी आजकल महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये कलम ३७० चं काय घेणंदेणं असे सवाल विचारले जात आहेत. मात्र, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की महाराष्ट्राचा असा एकही जिल्हा नसेल जिथल्या जवानांनी काश्मीरमधील शांततेसाठी बलिदान दिले आहे. मग, याच शांततेसाठी हटवलेल्या कलम ३७०चा महाराष्ट्राशी संबंध कसा नाही?, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला विचारला आहे. राज्यात कलम ३७०वरुन विरोधकांनी भाजपाला टार्गेट केल्यानंतर मोदी या मुद्दावरुन आक्रमक झाले आहेत. अकोला येथे महायुतीच्या प्रचारा दरम्यान ते बोलत होते.
पश्चिम विदर्भातील भाजप सेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकोल्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तामिळनाडूमधील महाबलीपुरमच्या समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिक वेचतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावरून चांगल्या वाईट प्रतिक्रिया उमटत आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी मात्र, यावरून सुरक्षा यंत्रणांना धारेवर धरले आहे. प्रकाश राज म्हणाले, “आपल्या नेत्याची सुरक्षा कुठे आहे. सुरक्षा यंत्रणांनी त्यांना स्वच्छता करण्यासाठी एकट का सोडलं. तेही एका कॅमेरामॅनसोबत. परदेशी शिष्टमंडळ भेटीवर येणार असतानाही संबंधित विभागाने स्वच्छता का केली नाही. त्यांची हिंमत कशी वाढली, “असा सवाल त्यांनी केला.
विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार संपूर्ण राज्याचा दौरा करत आहेत. दरम्यान कन्नड येथील सभेत उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या निवडणूक प्रचारातील ३७० च्या मुद्द्यावर टीका केली. देशात कलम ३७० पेक्षा माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल हा खरा प्रश्न आहे. असे सांगत पवार यांनी आपले मत जाहीर सभेत प्रकट केले.
आम्ही तुम्हाला मैदानात दिसत नाही कारण आम्ही तुमच्याशी नाही तर पैलवानांशी कुस्ती खेळतो असा पलटवारदेखील शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. अमित शहा हे नाव ५ वर्षांपूर्वी कुणी ऐकलं नाही आणि कुणी त्यांना पाहिलंही नव्हतं.
जीएसटी,नोटबंदीचे भयानक परिणाम आजही देश भोगत असून सध्या देश आर्थिक संकटातून जात असताना ज्यांना खरचं मदतीची आवश्यकता आहे, त्यांना मदत करण्याऐवजी धनदांडग्यांना मदत करण्याचं काम सरकार करत असल्याचं राहुल पुढे म्हणाले.
तमिळनाडूतील महाबलीपूरम या सातव्या शतकातील स्मारके असलेल्या तटवर्ती शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग दोन दिवसांच्या अनौपचारिक परिषदेसाठी शुक्रवारी दुपारी दाखल झाले. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाबलीपूरम येथील समुद्र किनाऱ्यांवार फेरफटका मारत किनाऱ्याची साफसफाई केली. मोदींच्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून इतरांनाही सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे असं मोदींनी म्हटलं आहे.
मोदींच्या कटआउट्चे पाय धरून मदतीची याचना करताना ही महिला, ‘विदेशात जाऊन तुम्ही मदत करता. आमचंही भलं करा. आम्ही तुम्हाला मतं दिली आहेत. भीक मागायची वेळ आली आहे. आमचा पैसा मिळवून द्या.’ असं म्हणत आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून राज्यात त्यांच्या नऊ प्रचार सभा होणार आहेत.