क्रूझमधील रेव्ह पार्टीवर केलेली कारवाई नक्की कुणाची?; नवाब मलिकांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी, 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने (NCB) छापा टाकला. याठिकाणी सुरु असलेल्या पार्टीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अन्य 9 जणांवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाई प्रकरणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप … Read more

राज्यपाल कोश्यारींचे भवन हा राजकीय अड्डा; नवाब मलिकांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून अनेकवेळा राज्यपालांवर निशाणा साधण्यात आला आहे. राजभवन हे भाजपचे कार्यालयच असल्याची टीका यापूर्वीही करण्यात आल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपाल व भाजप कार्यकर्ते यांच्या भेटीवरून राज्यपालांवर टीका केली आहे. राज्यपाल भवन आता तर राजकीय अड्डाच झालेला आहे. … Read more

आधी स्वतःची मुले काय करतात ते पाहावे; मलिकांचा सोमय्यांवर पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले होते. याप्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांवर पलटवार केला. सोमय्या यांनी आधी स्वतःच्या … Read more

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राष्ट्रवादीचा प्रतिसाद; गर्दी होईल असे राजकीय कार्यक्रम टाळणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी होईल असे राजकीय कार्यक्रम टाळा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात येणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. राज्यातील सर्व राजकीय … Read more

आमदार नियुक्तीच्या यादीतून राजू शेट्टींचे नाव वगळले??नवाब मलिक म्हणतात…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली यादी बदलल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीने स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचं नाव वगळल्याची माहिती समोर येत असतानाच आता अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांसहित तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी काल राज्यपालांची भेट घेऊन राज्यपाल नियुक्ती आमदारांविषयी चर्चा केली असून ती … Read more

ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत….; राष्ट्रवादीने स्पष्ट केली भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत राज्यातल्या निवडणुका घेऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली. मुंबईत आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ओबीसी आरक्षण … Read more

अनिल परब यांच्यावरील कारवाई हि सूडबुद्धीने; नवाब मालिकांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब याना ईडीची नोटीस आल्यांनतर महाविकास आघाडीने भाजपवर टीका केली आहे . अनिल परब यांच्यावरील कारवाई हि सूडबुद्धीने करण्यात येत आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक म्हणाले, नारायण राणे याना अटक झाल्यानंतर अनिल परब याना … Read more

आता राज्यपाल 12 आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेतील; मलिकांचा टोला

malik koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयात राज्यपाल भगतसिह कोशारी यांना मंत्रिमंडळाचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवता येणार नसल्याची भूमिका मांडली. न्यायालयाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यपाल भगतसिह कोशारी यांच्यावर निशाणा साधला असून आता तरी राज्यपाल 12 आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेतील, असा टोला मलिकांनी लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते … Read more

राज्यपालांविरोधात कोर्टात जाणे म्हणजे आमच्या घटनेचे दुर्दैवच ; राऊतांचा राज्यपालांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयात राज्यपाल भगतसिह कोशारी यांना मंत्रिमंडळाचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवता येणार नसल्याची भूमिका मांडली. त्यानंतर राज्यपालांवर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून निशाणा साधला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांना टोला लगावला असून त्यांनी “राज्यपालांविरोधात कोर्टात जाणे म्हणजे हे आमच्या घटनेचे दुर्दैवच म्हणावे लागेल, असे राऊत म्हणाले … Read more

केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण बंद करावे लागत आहे; नवाब मलिकांचा आरोप

nawab malik modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राला जेवढा लसीचा पुरवठा आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात लसीचा पुरवठा केंद्र सरकारकडून होत नसल्याने लसीकरणाची केंद्र बंद करावी लागत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक म्हणाले की, कोरोना लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लोकांची संख्या २० लाख असून पहिला डोस घेणाऱ्या लोकांची … Read more