रोहित पवार आमदार व्हावेत, तरूणांचे रायगडवर जाऊन जगदिश्वराला साकडे

पुणे प्रतिनिधी | विधानसभेेसाठी अवघे 100 दिवस शिल्लक राहिले आहेत. रोज नवनविन घडामोडी घडत असताना 5 युवकांनी शरद पवारांचे नातू रोहित पवार आमदार व्हावेत यासाठी चक्क राजधानी किल्ले रायगड येथे जाऊन जगदिश्वराला साकडे घातले आहे. आकाश झांबरे पाटील, साहिल रायकर, ओमप्रसाद कत्ते, धिरज घुटे, परिक्षित तळोलकर अशी त्या युवकांची नावे आहेत. रोहित पवार सारख्या तरुण … Read more

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सोळाजण इच्छूक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सात विधानसभा मतदारसंघांसाठी सोळाजण इच्छूक आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, आ.सुमनताई कदम, माजी आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, विष्णू माने आदींचा समावेश आहे , मात्र सांगली विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कडून एकाही इच्छुकाने अर्ज भरलेला नाही. दाखल झालेल्या सर्व इच्छुकांचे अर्ज प्रदेश राष्ट्रवादीकडे पाठविण्यात आले … Read more

वंचितसोबत येऊन राज ठाकरेंनी भाजपला दणका द्यावा

सांगली प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडी सोबत राज ठाकरे यांनी येऊन भाजपला दणका द्यावा असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. राजू शेट्टी यांनी मतविभाजन टाळण्यासाठी वंचितने महाआघाडी सोबत गेले पाहिजे असे मत देखील व्यक्त केले आहे. राज ठाकरे यांची राजू शेट्टी यांनी त्यांच्या निवासस्थळी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. या … Read more

इस्लामपूर प्रांत कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  महसूल खात्यातील प्रलंबित कामे व सामान्य माणसांच्या अडवणुकी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर येथील प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. एक महिन्याच्या आत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून सामान्य जनतेस उत्तम सेवा द्या. अन्यथा तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागेल असा इशारा जयंत पाटील यांनी दिला. प्रांताधिकारी … Read more

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराने दिला राजीनामा ; करणार शिवसेनेत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार पक्षाला सोडून चालल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे. आज राष्ट्रवादीला असाच एक धक्का सहन करावा लागला आहे. राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी आज आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सादर केला आहे. त्यांनी राजीनामा सादर केला त्यावेळी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे त्यावेळी त्यांच्या सोबत उपस्थितीत होते. पांडुरंग बरोरा … Read more

माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर!

माढा प्रतिनिधी| लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची पळता भुई थोडी केल्याने राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आपली आमदारकी वाचवण्यासाठी चिंतीत असल्याचे बोलले जाते आहे. त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी करण्याची ऑफर आल्याची आणि शिंदे कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. विश्वचषक २०१९ | भारत ठरला ‘१ नंबर’ ; या देशांत रंगणार सेमी फायनलचे सामने … Read more

महेश लांडगेंना पराभूत केल्या शिवाय शेंडीची गाठ बांधणार नाही

पुणे प्रतिनिधी | विधान सभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून पावसाच्या सरी बरोबर राजकीय आरोपप्रत्यारोपाच्या सरी देखील बरसू लागल्या आहेत. अशातच भोसरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे पालिकेतील गटनेते दत्त साने यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर घणाघात केला आहे. आपण महेश लांडगेंना जोपर्यंत पराभूत … Read more

विधानसभा निवडणूक २०१९ : बीडनंतर महाराष्ट्रातील या मतदारसंघात चुलत्या पुतण्याची युद्धाची तयारी

औरंगाबाद प्रतिनिधी | दिवंगत माजी आमदार कैलास पाटील यांना वर्ग वैजापूर तालुक्यात आजही अस्तित्वात आहे असे म्हणत भाऊराव पाटील यांचे पुतणे अभय पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. भाऊसाहेब पाटील यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मागितल्याने पक्षाला वैजापूर मतदारसंघातून उमेदवारी देताना गृहकलहाचा सामना करावा लागणार आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थापना दिवसाच्या सभेत सांगितले … Read more

… ‘त्या’ खेकड्याला तरी अटक करा – आमदार जितेंद्र आव्हाड

मुंबई प्रतिनिधी । तिवरे धरण फोडून ज्याने तेविस माणसे मारली , त्या खेकडयाला तरी राज्य शासनाने आता अटक करावी व मृत वा जखमी झालेल्या लोकांना व त्यांच्या नातेवाइकांना निदान न्याय तरी मिळवून द्यावा. असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. “खेकड्यांनी पोखरल्यामुळे भगदाड पडले आणि तिवरे धरण फुटले” असा अजब दावा … Read more

लक्ष्मण मानेंचा बोलवता धनी वेगळाच आहे : गोपीचंद पडळकर

पुणे प्रतीनिधी | लक्ष्मण माने यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राजीनामा मागितल्याने वंचित बहुजन आघाडीचे राजकारण ढवळून निघाले आहे. अशात वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर हे प्रकाश आंबेडकर यांची भूज सांभाळण्यासाठी पुढे सरसावले आहेत. लक्ष्मण माने यांचे राष्ट्रवादीशी संबध आहेत. त्यामुळे त्यांचे बोलवते धनी वेगळे आहेत असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. मी राष्ट्रीय … Read more