व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सोळाजण इच्छूक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सात विधानसभा मतदारसंघांसाठी सोळाजण इच्छूक आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, आ.सुमनताई कदम, माजी आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, विष्णू माने आदींचा समावेश आहे , मात्र सांगली विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कडून एकाही इच्छुकाने अर्ज भरलेला नाही. दाखल झालेल्या सर्व इच्छुकांचे अर्ज प्रदेश राष्ट्रवादीकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अविनाशकाका पाटील यांनी दिली. 

विधानसभेच्या निवडणुका ऑक्टो बरमध्ये होणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रदेश राष्ट्रवादीने जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय इच्छुकांचे अर्ज दाखल करून घ्यावेत, अशा सूचना जिल्हाध्यक्षांना दिल्या होत्या. राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाशकाका पाटील यांनी इच्छुकांनी जिल्हा कार्यालयात सचिव मनोज भिसे यांच्याकडे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन केले होते. त्यानुसार मुदतीत सोळा इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
त्यामध्ये इस्लामपूर-वाळवा मतदारसंघासाठी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी आ.सुमनताई पाटील व शिराळा विधानसभा मतदारसंघासाठी माजी आ. मानसिंगराव नाईक यांनी अर्ज दाखल केला.