भाजपाचा ‘हा’ खासदार आपला खासदारकीचा संपूर्ण पगार देणार लोककार्यासाठी

नवी दिल्ली |आपल्या समाजकार्याने सतत इतरांना प्रेरणा देणारे आणि दिल्लीतून लोकसभेवर खासदार असणारे भारतीय क्रिकेट टीमचे माजी फलंदाज गौतम गंभीर आपला संपूर्ण पगार दिल्लीमधील स्मशानभूमीच्या कामासाठी देणार आहेत.क्रिकेटमध्ये फटकेबाजी करणारे गंभीर हे राजकीय पटलावर देखील चांगलीच फटकेबाजी करत असल्याचे चित्र सध्या दिसते आहे. सुरुवातीला ते कमीच राजकीय टिप्पणी देत होते. मात्र आता त्यांनी राजकीय भाष्य करायला … Read more

राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी काँग्रेसने आणला नवीन फॉर्मुला

नवी दिल्ली |लोकसभा निवडणुकीत झालेल्या पक्षाच्या वाताहतीमुळे राहुल गांधी यांनी पक्ष अध्यक्ष पदाचा नवीन फॉर्मुला आणला आहे. प्रत्येक महासचिवांना मुख्य महासचिव के.सी वेणुगोपाल यांनी बंद लिफाप्यात चार नावे देण्याची विनंती केली आहे. या चार नावांच्या यादीतून फक्त चार नावे काँग्रेसच्या कार्य समितीसमोर ठेवली जाणार आहे. काँग्रेस कार्य समिती या चार नावांमधून अध्यक्षांची निवड करणार आहे. मात्र … Read more

मराठा आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

नवी दिल्ली | मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात प्रसिद्ध विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा आव्हान दिले आहे. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. या खटल्याकडे संपूर्ण मराठा समाजाचे आणि महाराष्ट्रातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर! मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण हे … Read more

राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट ; नव्या समीकरणाची होणार नांदी

नवी दिल्ली | राज ठाकरे यांनी आज काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. सोनिया गांधी यांनी राज ठाकरे यांच्याशी अर्धा तास महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली आहे. या भेटीनंतर राज ठाकरे आणि काँग्रेसचे संबंध चांगले सुधारतील अशी अशा व्यक्त केली जात आहे. भाजप सरकार घालवण्यासाठी राज ठाकरे यांनी काँग्रेसची साथ देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे … Read more

नवी दिल्ली | राज ठाकरेंनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन केली ‘हि’ मागणी

नवी दिल्ली | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेऊन निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. देशभरात जर ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात असेल तर निवडणूक हि बॅलेट पेपरवर घेतली जावी अशी मागणी राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाच्या ऑफिसमधून बाहेर येताच राज ठाकरे यांनी माध्यमांशी … Read more

तुमच्या आमच्या हृदयात भगवा आहे ; दिल्लीत गेलो तरी लढाई जिंकू : उद्धव ठाकरे

मुंबई प्रतिनिधी | मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या खटल्याचा निकाल हा सरकारने केलेल्या कायद्याच्या बाजूने दिला आहे. इथून पुढे मराठा समाजाला नोकरीत १२ टक्के तर शिक्षणात १३ टक्के आरक्षण देण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या दृष्टीने कायदा करण्यासाठी फडणवीस सरकारने केलेले प्रयत्न फळाला आले आहेत असे बोलले जाते आहे. तर मराठा आंदोलनाचा देखील हा विजय आहे … Read more

पेट्रोल डीझेल होणार महाग | पाणी संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकार लावणार पेट्रोल डिझेलवर कर

नवी दिल्ली |देशभर या वर्षी दुष्काळाचे संकट होते. या संकटावरमात करण्यासाठी केंद्र सरकार नवीन योजना आखण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार या योजना पूर्ण करण्यासाठी पेट्रोल डिझेलवर अतिरिक्त कर लावण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात येत्या अर्थ संकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींनी निवडणुकीत घोषणा केल्या प्रमाणे नव्याने शपथ घेतल्या बरोबर नवीन जल मंत्रालय निर्माण केले आहे. त्या … Read more

खुशखबर ! आता कोणत्याही रेशन दुकानातून रेशन खरेदी करता येणार

नवी दिल्ली | आता कोणत्याही रेशन दुकानातून रेशन खरेदी करता येणार असल्याची संकल्पना देशात राबवली जाणार आहे. एक देश एक राशन या नावाने हि संकल्पना राबवली जाणार आहे. या संकल्पनेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल असे देखील सांगितले जात आहे. तर कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या लोकांना सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचाही लाभ घेता येणार आहे. या बाबत … Read more

हिंसेच्या ‘त्या’ मुद्द्यावर प्रथमच बोलले नरेंद्र मोदी

नवी दिल्ली  | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेचा समारोप करताना मॉब लीन्चींगच्या मुद्द्यावर बोट ठेवले आहे. मॉब लीन्चींग हि सामाजिक समस्या आहे. त्याचा विमोड निश्चित केला पाहिजे. दोषींना कठोरातील कठोर शिक्षा दिली पाहिजे. मात्र या मुद्द्याचे राजकरण करणे उचित नाही दोषींवर खटला दाखल करून हा प्रकार न्यायपालिकेवर सोडला पाहिजे असे नरेंद्र मोदी … Read more

५१ खासदारांनी विनवणी करूनही राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत सपाटून पराभूत झाल्या नंतर पराभवाची जबादारी स्वीकारून राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस कमिटीने त्यांचा राजीनामा एक महिन्यासाठी स्थगित करून त्यांना अध्यक्ष पदी कायम राहण्यासाठी सांगितले. याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांच्या अध्यक्षते खाली आज ५१ खासदारांची बैठक आज पार पडली. या बैठकीत ५१ खासदारांनी विनवणी करूनही राहुल … Read more