व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी काँग्रेसने आणला नवीन फॉर्मुला

नवी दिल्ली |लोकसभा निवडणुकीत झालेल्या पक्षाच्या वाताहतीमुळे राहुल गांधी यांनी पक्ष अध्यक्ष पदाचा नवीन फॉर्मुला आणला आहे. प्रत्येक महासचिवांना मुख्य महासचिव के.सी वेणुगोपाल यांनी बंद लिफाप्यात चार नावे देण्याची विनंती केली आहे. या चार नावांच्या यादीतून फक्त चार नावे काँग्रेसच्या कार्य समितीसमोर ठेवली जाणार आहे.

काँग्रेस कार्य समिती या चार नावांमधून अध्यक्षांची निवड करणार आहे. मात्र काँग्रेस आपला राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यास करत असलेल्या विलंबामुळे काँग्रेसवर चौफेर टीका केली जात आहे. तर काँग्रेसमध्ये दोन गट सक्रिय असल्याच्या चर्चा देखील वेगवान झाल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यास काँग्रेसला उशीर होण्याचे मुख्य कारण हे की काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांना वाटते की पक्षाचा अध्यक्ष हा जेष्ठ झाला पाःईजे. तसेच राहुल गांधी यांनी तरुणांच्या बांधलेल्या फळीला वाटते कि आपल्यामधील एकाद्या व्यक्तीलाच अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली पाहिजे.

दरम्यान अध्यक्ष कोण होणार हा प्रश्न जरी अनुत्तरित असला तरी राहुल गांधी यांना अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास पक्षातीलच लोकांनी भाग पाडले अशी देखील चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष विरुद्ध गांधी घराणे असा सूक्ष संघर्ष नव्याने पुढे येतो आहे का किंवा अध्यक्ष निवडीच्या आड हि हाच संघर्ष येतो आहे का असा सवाल सर्वत्र विचारला जात आहे.

नवनीत राणांची खासदारकी जाणार?

‘या’ कारणांमुळे भारतीय संघ विश्वचषकातून पडला बाहेर

विश्वचषकातून भारत बाहेर ; सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सोळाजण इच्छूक

काँग्रेस नेत्यांकडून आमच्या जीवाला धोका ; आमदारांचे पोलिसांना पत्र

राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी काँग्रेसने आणला नवीन फॉर्मुला