अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2020 रोजी सादर करणार अर्थसंकल्प

नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2020 रोजी आपले दुसरे बजेट सादर करणार आहेत. अर्थसंकल्प तयार करण्याच्या टीममध्ये सहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राजीवकुमार यांच्या नेतृत्वात ही टीम अर्थसंकल्प बनवेल. सुब्रमण्यम, मुख्य आर्थिक सल्लागार जुलैमध्ये सुब्रमण्यमच्या पहिल्या आर्थिक सर्वेक्षणात लाख कोटी रुपयांचे अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी 8 टक्के व्याधी दर साध्य करण्यासाठी आणि राखण्यासाठी अनेक निराधार … Read more

जेएनयूवरील हल्ला वेदनादायी, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर यांची खंत

जेएनयूमधील अनेक विद्यार्थ्यांवर शनिवारी सायंकाळी काही गुंडांकडून जीवघेणा हल्ला झाल्याचं समोर आलं. देशभरात या घटनेचे संतप्त पडसाद उमटत असून समाजकारण, राजकारण यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींकडून निषेधाच्या प्रतिक्रिया बाहेर येत आहेत. जेएनयूचे माजी विद्यार्थी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी झालेला प्रकार वेदनादायी असल्याची भावना व्यक्त केली आहे.

मोदी सरकारकडून नवीन वर्षाची भेट, बँकेशी संबंधित ‘ही’ सेवा 1 जानेवारीपासून मोफत

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान त्यांनी मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) फी चा खर्च सरकार उचलणार असल्याची माहिती दिली. या दरम्यान त्या म्हणाल्या की, जानेवारीपासून 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना रुपे डेबिट कार्ड आणि यूपीआय क्यूआरमार्फत पेमेंटची सुविधा … Read more

देशातील नागरिकांनी हिंसाचार,भीती पसरवणाऱ्यांपासून सावध रहावे; सोनियांच्या आरोपाला सीतारमण यांचे प्रत्युत्तर

संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडल्यापासूनच विरोधी पक्षकाडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर नागरिकांनीही रस्त्यावर उतरून मोठा विरोध दर्शविला आहे

परदेशी आईचा मुलगा राष्ट्रभक्त होऊ शकत नाही; भाजप खासदाराची राहुल गांधींवर टीका

राहुल गांधींनी केलेल्या विधानाचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. ज्या पक्षाच्या अध्यक्ष स्वतः महिला आहेत, त्यांच्या मुलानं असं विधान करणं त्यापेक्षा दुर्दैवं ते काय?. तसेच राहुल गांधींच्या विधानानं मी दुःखी असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे

कांदे कमी खायला सांगणारं सरकार गेलेच पाहिजे – पी. चिदंबरम

कांद्याच्या भावाबाबत देशात खळबळ उडाली आहे, परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे म्हणणे आहे की मी कांदा खात नाही. म्हणून मला काही फरक पडत नाही. अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आक्रोश वाढला आहे. त्यामुळे १०६ दिवसांनंतर तुरूंगातून बाहेर आलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी निर्मला सीतारमण यांच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. पी. चिदंबरम म्हणतात की ज्या सरकारने कमी कांदा खाण्यास सांगितले आहे. ते सरकार गेले पाहिजे.

जीएसटी नुकसान भरपाई न मिळाल्यास ५ राज्यांनी दिला केंद्र सरकारला न्यायालयात जाण्याचा इशारा

वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांचा संताप वाढत आहे. पूर्वी ५ राज्यांनी प्रश्न उपस्थित केले होते, मात्र आता ७ राज्यांनी केंद्र सरकारच्या या वृत्तीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. जर गरज पडली तर आम्ही त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ, अशी धमकीही केरळ या राज्याने दिली आहे.

भाजपा सरकार रेल्वे सुद्धा विकेल; ‘कॅग’च्या रेल्वे अहवालावरून प्रियंका गांधीची टीका  

रेल्वेच्या कामगिरीबाबत कॅगने दिलेल्या अहवालावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सरकारने नरेंद्र मोदींच्या प्रवासाचे ४५८ कोटी रुपये थकवले !

सरकारने अती महत्वाच्या व्यक्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, परदेशी पाहुणे, पंतप्रधान यांच्या प्रवासाचा खर्च एअर इंडियाला दिलच नसल्याची धक्कदायक माहिती समोर आलेली आहे.

सीतारामन यांच्या पतीची आर्थिक धोरणांवरून सरकारवर टीका; शरद पवारांकडूनही अकलूजच्या सभेत कानउघाडणी

“नेहरुंची आर्थिक धोरणं राबवायची नाहीत असं भाजपनं ठरवून टाकलं आहे. अर्थव्यवस्था संकटात आणायला हे एक प्रमुख कारण आहे. नेहरुंची धोरणं लागू करायची नाहीत, हे जरी निश्चित असलं तरी त्याला पर्याय म्हणून काय धोरणं राबवायची, याचं उत्तर सरकारकडे नाही हे प्रभाकर यांनी खेदानं नमूद केलं. अर्थव्यवस्था सुधारायची असेल तर मनमोहन सिंग यांच्या मॉडेलचा वापर करण्याशिवाय गत्यंतर नाही असं मतही प्रभाकर यांनी व्यक्त केलं.