प्रेयसीला भेटायला पाकिस्तानला निघालेल्या उस्मानाबादच्या तरुणाला BSFने घेतलं ताब्यात

उस्मानाबाद । सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) भारत-पाक सीमेवरुन एका 20 वर्षीच्या मुलाला पकडले आहे. हा मुलगा उस्मानाबादचा असल्याची माहिती आहे. त्याला रात्री पाकिस्तानी सीमेवर 9.30 वाजता पोलिसांनी पकडले. कमालीची बाब म्हणजे हा पठ्ठया आपल्या कथित प्रेयसीला भेटायला दुचाकीवरुन पाकिस्तानला निघाला होता. याबाबतचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिल आहे. देशभरात कोरोनामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊन … Read more

अखेर पाकिस्तानने घेतलं नमतं; कुलभूषण जाधव यांना भेटण्याची दिली परवानगी

इस्लामाबाद । हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कैदेत असलेल्या कुलभूषण जाधव यांना भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी पाकिस्ताननं दिली आहे. भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना कुठल्याही अटी-शर्थीविना कुलभूषण जाधव यांना भेटू द्यावे, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली होती. त्यानुसार इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाला भेटीसाठी ४ वाजताची वेळ देण्यात आली आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये २० जुलै फेरविचार याचिका दाखल … Read more

चीनशी करार केल्यानंतर चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला काढून इराणने दिला मोठा धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराण आणि चीनमधील 400 अब्ज डॉलरच्या कराराचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. चीनशी हातमिळवणी केल्यावर इराणने भारतला चाबहार रेल्वे प्रकल्पातून बाहेर सोडत एक मोठा धक्काच दिला आहे. कराराच्या 4 वर्षानंतरही भारत या प्रकल्पाला वित्तपुरवठा करीत नाही असा आरोप इराणने केला आहे. अशा परिस्थितीत, आता ते स्वत: हा प्रकल्प पूर्ण करतील. … Read more

पाकिस्तानचा दावा: कुलभूषण जाधव यांचा शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार

इस्लामाबाद । पाकिस्तानच्या कैदेत असलेलं भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी पाकिस्तानने आता मोठा दावा केला आहे. आपल्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास त्यांनी नकार दिला असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. हेरगिरी आणि दहशतवादविरोधी कलमांतर्गत पाकिस्तानच्या कोर्टाने कुलभूषण जाधव यांना फाशीची सुनावली असून पाकिस्तानच्या दाव्यामुळे खळबळ माजली आहे. दरम्यान, त्यांना दुसरा कॉन्सुलर अ‍ॅक्सेस … Read more

आणि इरफान पठाण ‘त्या’ तरुणीच्या कमेंटमुळे झाला दुःखी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इरफान पठाण याने नुकतेच एका मुलाखतीत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटर आणि माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांना त्याचे करिअर खराब करण्यासाठी दोषी ठरविणे चुकीचे असल्याचे म्हंटले होते. त्याच्या या वक्तव्यामुळे तो चर्चेत होता. एका वृत्तवाहिनीने त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून त्याचे हे विधान प्रसारित केले होते. यावर अनेकांनी कमेंट केल्या होत्या. त्यावर एका तरुणीने केलेल्या … Read more

पाकिस्तानमध्ये कृष्ण मंदिराविरोधात कट्टरपंथीयांकडून फतवा, म्हणाले-“इस्लाममध्ये यासाठी परवानगी ​​नाही”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पहिल्या हिंदू मंदिरासाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये वाद सुरू झाला आहे. इस्लामिक शैक्षणिक संस्था जामिया अश्रफिया मदरशाच्या मुफ्ती यांनी या कृष्णा मंदिराविरूद्ध फतवा काढला आहे. या फतव्यात असे म्हटले आहे की इस्लाम नवीन मंदिरे बांधू देत नाही आणि ते मदिनाचा अपमान ठरेल. या मंदिराचे बांधकाम थांबविण्यासाठी एका वकिलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल … Read more

बब्बर खालसाच्या वाधवा सिंह सोबत ९ जणांना गृह मंत्रालयाने केले आतंकवादी घोषित 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बब्बर खालसा च्या वाधवा सिंह सहित ९ जणांना  मंत्रालयाने आतंकवादी घोषित केले आहे. गृह मंत्रालयाकडून आज ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार पाकिस्तानच्या दहशतवादी संघटन शिख युथ फेडरेशनचे चिफ लखबर सिंहना देखील दहशतवादी यादीमध्ये घालण्यात आले आहे. या नऊ लोकांना बेकायदेशीर हालचाली अधिनियम(UAPA ऍक्ट, १९६७) अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. … Read more

आतंकवादी हल्ल्यातून वाचलेल्या मुलाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू काश्मीर मधील बारामुला इथे दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यात सीआरपीएफ चा एक जवान शहीद झाला आहे तसेच एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. या दहशतवादी हल्ल्यातून एका लहान मुलाला सैनिकांनी वाचवले आहे. त्याला त्याच्या घरी घेऊन जात असतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये हा घाबरलेला मुलगा हुंदके देऊन … Read more

बलुचिस्तानचा संघर्ष नक्की काय आहे, गेल्या 73 वर्षांपासून त्यांना पाकिस्तानपासून वेगळे का व्हायचे आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या अतिरेक्यांनी पाकिस्तानच्या लाहोर शहरावर हल्ला केला. यात चार दहशतवाद्यांसह 10 जण ठार झाले. वास्तविक, फाळणीच्या काळापासूनच बलुचिस्तानमधील लोक वेगळ्या देशाची मागणी करीत आहेत. पाकिस्तानात राहण्याचे त्यांनी कधीच मान्य केले नाही, यामुळे ते सतत संघर्ष करत आहेत. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही या मागणीला पाठिंबा देणारी एक अतिरेकी संघटना आहे, … Read more

ताज हॉटेल उडवून देण्याची पाकिस्तानमधून धमकी; मुंबई पोलीस हायअलर्टवर

मुंबई । मुंबईतील ताज हॉटेल पुन्हा एकदा दशवाद्यांच्या रडारवर आलं आहे. कारण ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानमधून दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारा फोन आला होता. याची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांनी ताज हॉटेल आणि आजुबाजूच्या परिसरातील सुरक्षेत वाढ केली आहे. धमकी देणारा फोन पाकिस्तानमधील नंबरवरुन आला होता. फोन आल्यानंतर पोलिसांनी सुरक्षा … Read more