परभणीत उपमपौरांच्या घरावर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची धाड

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून या दरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. परभणीचे उपमहापौर माजू लाला यांच्या शाही मस्जिद येथील निवासस्थानी बुधवारी संध्याकाळच्या सुमारास निवडणूक विभागाच्या पथकाने धाड टाकली

कोषागार कार्यालयाच्या ‘या’ धोरणामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दिवाळीचा गोडवा संपणार ?

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळी सणापुर्वी करणे बाबत १५ ऑक्टोबर रोजी शासनाने निर्णय जारी केल्यानंतर विविध कार्यालयाने कर्मचाऱ्यांच्या वेतनाची ऑनलाईन बिडीएस बिल काढुन १६ ऑक्टोबर रोजी कोषागार कार्यालयात दाखल करणेसाठी पाठवले होते. परंतू कोषागार कार्यालयाने ते बिल स्विकारले नाही.यामुळे कोषागार कार्यालयाने शासन निर्णयास बगल दिल्याने विविध कार्यालय प्रमुखांसह कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

‘हा देश कोणाच्या बापाची जहागिरी नाही’; इम्तीयाज जलीलांची सत्ताधाऱ्यांना तंबी

आजचे देशातील सत्ताधारी मुस्लिमांना दहशतवाद्यांच्या नजरेतून बघतात. सिमी काय, आयसिस काय, मुजाहिद्दीन काय, दहशतवादी म्हटलं की आम्हालाच टार्गेट करतात. पण एक भारतीय मुस्लीम म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो, हा देश कोणाच्या बापाची जहागिरी नाही. हा देश जेवढा तुमचा आहे तेवढाच आमचाही आहे असा घणाघाती पवित्रा एमआयएमच्या खासदार इम्तियाज जलील यांनी आज परभणीत घेतला.

वंचित उमेदवाराचा एसटीत ‘चालता बोलता’ प्रचार

जिल्ह्यातील जिंतूर व सेलु मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मनोहर वाकळे यांनी आज येलदरी ते जिंतूर पर्यंत चक्क बसने प्रवास करत चालता बोलता प्रचार केला. प्रवासादरम्यान वाकळे यांनी बस मधील प्रवाश्यांच्या समस्या जाणून घेत ,येणाऱ्या काळात आपण ह्या सर्व अडी अडचणी दूर करु असे आश्वासन दिले .त्याच बरोबर माध्यमांशी बोलतांना ,रस्त्याचे प्रश्न फार गंभीर झाले असून यावर तोडगा काढण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, त्याचबरोबर मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याची १९ वर्षांची नौकरी सोडून, समाजसेवेसाठी आपण पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

परभणी जिल्ह्यात सात जणांना मारहाण, जखमींमध्ये एका गरोदर महिलेसहित तीन महिलांचा समावेश

जमिनीचा जुना वाद विकोपाला गेल्याने पाथरी तालुक्यातील उमरा येथे सात जणांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेमुळे गाव आणि परिसरामध्ये दहशतीचं वातावरण तयार झाल आहे. पाथरी तालुक्यातील उमरा गावात राहणाऱ्या, शेळके कुटुंबाला त्याच गावातील काही जणांनी जमिनीच्या जुन्या वादातून जबर मारहाण केली.

परभणी जिल्ह्यात पोलिसांनी लाखो रुपयांच्या गुटख्याने भरलेला ट्रक पकडला

परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील आठवड़ी बाजार परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत गुटख्याने भरलेला ट्रक पकडला. या कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. पाथरी पोलिसांनी पहाटे ४ च्या सुमारास ही कारवाई केली.

परभणी जिल्ह्यात शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात महायुतीच्या मित्रपक्षांनी केली घुसखोरी

परभणी प्रतिनिधी| गजानन घुंबरे परभणी जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेच्या जागेसाठी राजकीय पक्षांकडून तिकीट वाटपामध्ये अनपेक्षित उलटापालट झाली असून जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये राजकीय बंडखोरांच्या ‘इंट्री’मुळे बहुरंगी निवडणूक लढती होणार आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात यावेळी महायुतीच्या मित्रपक्षांनी घुसखोरी केल्याने सेनेचे पाथरी आणि जिंतूर बालेकिल्ले मात्र लढती पूर्वीच ढासळले आहेत. महायुतीच्या जागा वाटपामुळे शिवसेनेची स्वतःच्या घरात चांगलीच गोची झाली आहे. … Read more

अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने दिला आत्महत्येचा इशारा

परभणी प्रतिनिधी। जिंतूर तालुक्यातील सावरगाव येथील एका शेतकऱ्याला पाझर तलावासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी मागील १० वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे ‘मागील दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांच्या संगनमताने अडवणूक करत असल्याचे निवेदन भूसंपादन अधिकाऱ्यांच्या मार्फत दिनांक २८ सप्टेंबर रोजी संबंधित शेतकऱ्याने दिले असून मोबदला तत्काळ द्यावा अन्यथा आत्महत्या केल्याशिवाय … Read more

गंगाखेड येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचे ‘आत्मक्लेश आंदोलन’

परभणी प्रतिनिधी । भाजपा च्या कोट्यातील जागा ‘शिवसेने’ला सोडल्याने गंगाखेड विधानसभेतील इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत.  या नाराजीतून आज गंगाखेड येथे इच्छुक उमेदवार ,कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ‘आत्मक्‍लेश आंदोलन’ केले आहे. परभणी जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेच्या जागा कोणता पक्ष , कोणत्या उमेदवाराला देणार याविषयी प्रत्येक पक्षाकडून कमालीची गोपनीयता ठेवण्यात आली होती. … Read more

परभणी विधानसभा मतदारसंघात विकासाचा मुद्दा भावनिक होणार का ?

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे परभणी विधानसभा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. मागील तीस वर्षांपासून पक्षाने हा बालेकिल्ला अभेद्य ठेवला आहे. विरोधी पक्षाने प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यांना हा गड काही उध्वस्त करणं शक्य झालं नाही पण तरीदेखील दरवेळी विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून रणनीती आखून शिवसेनेला कोंडी धरायचा प्रयत्न केला जातो. त्याला यावेळी तरी यश मिळतं का ? … Read more