ढेबेवाडीत वांग नदीच्या संगमावर अज्ञात इसमाचा मृतदेह

कराड | कराड- ढेबेवाडी मार्गावर असलेल्या वांग नदीत अज्ञात इसमाची मृतदेह सापडला आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी गावात प्रवेश करणाऱ्या वांग पुलानजीक असलेल्या दोन नदीच्या संगमावर पाण्यावर नदीत तरंगत वाहत चालेला मृतदेह दिसून आला आहे. मुंद्रुळ कोळेकडून एका नदी पात्र व दुसरी नदीचे पात्र मराठवाडी धरणातून दुसरे पाण्याचे पात्र येत आहे. दोन्ही नदीचे पात्र एकत्र वांग … Read more

केर- बोंद्री विकास सेवा सोसायटी पाटणकर गटाकडे बिनविरोध

पाटण | तालुक्यातील केर -बोंद्री विकास सेवा सोसायटी या संस्थेची  पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून सोसायटीवर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाची सत्ता अबाधित राहिली आहे. सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक पदी सर्वसाधारण प्रवर्ग मधून दिलीपराव पाटणकर, सुभाष यादव, बाळासो पाटील, प्रकाश यादव, गुलाब यादव, गोपाळ पवार, आनंदा पवार, कृष्णत पवार, महिला राखीव मधून  हौसाबाई यादव, अनुसया चव्हाण, … Read more

मल्हारपेठ- मुंद्रुळहवेली सोसायटी देसाई गटाकडे 12-0 बिनविरोध

कराड | मल्हारपेठ- मुंद्रुळहवेली येथील लोकनेते बाळासाहेब देसाई विकास सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. पाटण तालुक्यातील मल्हारपेठ, मंद्रुळहवेली व परिसरातील 12 वाड्या वस्त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी सेवा सोसायटी मल्हारपेठ (मंदुळहवेली) या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 12-0 अशी बिनविरोध करण्यात आली. प्रथम परस्पर दोन्ही गटातून 13 पैकी 1 जागा रिक्त आहे. त्यामुळे … Read more

कलावंताच्या शुभेच्छा : शरद पवारांना 81 वाढदिवसानिमित्त 81 शुभेच्छापत्रे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना 81 पोस्टकार्ड शुभेच्छा पत्रे पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील कलावंत डाॅ. संदीप डाकवे यांनी पाठवली आहेत. शरद पवार यांच्याविषयी चपखल बसणारा शब्द कॅलिग्राफी मध्ये लिहून डाॅ. डाकवे यांनी वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवारांचा जनसंपर्क खेडोपाड्याात कानाकोपऱ्यात … Read more

महा -आवास अभियान पुरस्कारात पाटण तालुका टाॅप “वन”

सातारा | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सातारा महा -आवास अभियान ग्रामीण अंतर्गत पुरस्कार वितरण सन 2020-21 मध्ये सर्वच स्तरावर जिल्ह्यात पाटण तालुक्याने बाजी मारली आहे. प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ठ तालुका, सर्वोत्कृष्ठ क्लस्टर, सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत आणि विशेष पुरस्कार घटकांत पाटण तालुक्याचा पहिला नंबर आलेला आहे. जिल्हा महा-आवास अभियान सन 2020-21 पुरस्कार वितरण व महा -आवास अभियान … Read more

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी बिबट्या

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील मरळी- दाैलतनगर गावातील बंगल्यामध्ये मंगळवारी दि. 7 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. अचानक आलेल्या या बिबट्यामुळे सर्वांचीच भांबेरी उडाली. शंभूराज देसाई हे या बंगल्यात काही कार्यकर्त्यांसोबत चर्चा करत बसले असताना या बंगल्याच्या आवारात हा बिबट्या आला. त्या नंतर लोकांनी आरडा- … Read more

निवडणूक : पाटण नगरपंचायतीसाठी पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

पाटण | येथील नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी दि.1 रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाडे यांनी दिली. नगरपंचायत निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार … Read more

बाळासाहेब देसाई कारखाना : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते उद्या बॉयलर अग्निप्रदिपन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 च्या 48 व्या गळीत हंगाम व बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ उद्या सकाळी 10.30 वाजता शुक्रवार दि.15 ऑक्टोंबर, 2021 रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व स्मितादेवी शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते तसेच  मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई व युवानेते यशराज देसाई यांचे … Read more

पाटण तालुक्यातील आंबळे गावातील दोन तरूणांचा अपघातात मृत्यू

Accideant

सातारा | पुणे-बंगळूर महामार्गावरील शेंद्रेजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील पाटण तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला. सचिन बाळू दीक्षित (वय- 39) आणि वसंत विलास घाडगे (वय- 28, रा. आंबळे, ता. पाटण) अशी त्यांची नावे आहेत. दोघांच्या मृत्यूने आंबळे गावावर शोककळा पसरली आहे. साताऱ्यावरून सचिन दीक्षित आणि वसंत घाडगे हे दोघे दुचाकीवरून आंबळे गावी येत असताना … Read more

युवक काॅंग्रेसच्या निवडी जाहीर : अध्यक्षपदी नरेंद्र पाटणकर तर जगदीश पाटील, उदयसिंह चव्हाण उपाध्यक्षपदी

पाटण | पाटण तालुका युवक काँग्रेस समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. युवक काॅंग्रेसच्या दिवशी बुद्रुक येथील अध्यक्षपदी नरेंद्र पाटणकर तर उपाध्यक्षपदी सुपने येथील जगदीश पाटील आणि कुंभारगावचे उदयसिंह चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पाटण युवक काॅंग्रेसची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : सरचिटणीस- मयूरेश साळुंखे, मयूर वनवे, स्वप्नील पवार, सागर चव्हाण, तोफिक पटेल. चिटणीस- अक्षय घाडगे, … Read more