महा -आवास अभियान पुरस्कारात पाटण तालुका टाॅप “वन”

सातारा | जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सातारा महा -आवास अभियान ग्रामीण अंतर्गत पुरस्कार वितरण सन 2020-21 मध्ये सर्वच स्तरावर जिल्ह्यात पाटण तालुक्याने बाजी मारली आहे. प्रधानमंत्री आवास योजना सर्वोत्कृष्ठ तालुका, सर्वोत्कृष्ठ क्लस्टर, सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत आणि विशेष पुरस्कार घटकांत पाटण तालुक्याचा पहिला नंबर आलेला आहे.

जिल्हा महा-आवास अभियान सन 2020-21 पुरस्कार वितरण व महा -आवास अभियान ग्रामीण 2.0 (सन 2021-22) चा शुभारंभ पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी विनय गौडा, अर्थ व शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला व बाल विकास समितीच्या सभापती सोनाली पोळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे, राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष शहाजी क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माधव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, मनोज जाधव, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुषमा देसाई आदी उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यात 20 नोव्हेंबर 2021 ते 5 जून 2021 या कालावधीत कामाबद्दल पुरस्कार देण्यात आले. पहिले तीन क्रमांक पुढीलप्रमाणे – सर्वोत्कृष्ठ प्रधानमंत्री आवास योजना- तालुका – पाटण, फलटण व माण, सर्वोत्कृष्ठ क्लस्टर – पाटण (गोकुळ तर्फ हेळवाक), माण (बिदाल), सातारा (नागठाणे), सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत – पाटण (नाव), खटाव (वाकळवाडी), फलटण (हणमंतवाडी), जिल्हास्तरीय विशेष पुरस्कार- पाटण, सातारा व खंडाळा या तालुक्यांना मिळाला आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (100 टक्के मंजुरी देणे) ग्रामीणमध्ये कराड, सातारा, खंडाळा यांचा क्रमांक आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेत (ग्रामीण) संख्यात्मक प्रगतीनुसार तालुक्यात पाटण, माण, खटाव तर ग्रामीण (100 टक्के भाैतिकदृष्ट्या पूर्तता) पाटण, वाई, खंडाळा. गंवडी प्रशिक्षणात पाटण, माण व फलटण तालुक्यांना पहिल्या तीन क्रमांकात स्थान आहे.

राज्य पुरस्कृत योजनेत- सर्वाेत्कृष्ठ तालुके- पाटण, खंडाळा, खटाव. सर्वोत्कृष्ठ क्लस्टर – पाटण, सातारा, कोरेगाव. सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत – पाटण (गोठणे), वाई (पांडे), खंडाळा (भादे). ग्रामीण (100 मंजूरी देणे)- पाटण, खटाव व वाई. (ग्रामीण) संख्यात्मक प्रगतीनुसार तालुक्यात – पाटण, माण व कराड. ग्रामीण (100 टक्के भाैतिकदृष्ट्या पूर्तता) – पाटण, महाबळेश्वर व कोरेगाव यांचा समावेश आहे.